लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

Submitted by ह.बा. on 8 December, 2010 - 04:05

एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्‍याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.

"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"

याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.

कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.

गुलमोहर: 

तश्या शंका बर्‍याच असतात हो पण शेकडो चुकिच्या रिपोर्ट मधे एखादा बरोबर दिला जाईलच की त्यातही आपल्या कामाचं समाधान मिळेल. तुमच्या मतांचं स्वागत आहे पण मला कामाच्या आधी अडचणींची चर्चा........>>>> काम चालु करायच्या आधीच काय काय अडचणी येवु शकतात आणि त्या दुर करायला काय करता येइल यावर आधीच विचार केलेला बरा.... अशी संस्था चालु करायची असेल तर १००मधे एखादा बरोबर रिपोर्ट हा रेशो योग्य नसुन १००मधे एखादाच चुकिचा रिपोर्ट असाच रेशो असायला हवा... सध्यातरी या बाबतीत्ल अडचण येनार नाही...

झट मंगनी वाल्यांचे काय करणार ???? >>> अश्यांकरता PCR टेस्ट वापरता येइल.. यात व्हायरस चा जिनोम डिटेक्ट केला जातो.. पण कदाचीत यातही १-२ आठवड्यांचा काळ असा असतो की त्यामधे hiv infection असुनही टेस्ट निगेटिव्ह येवु शकते (मला नीट आठवत नाहिये याबाबतीत)

त्या क्षणी ज्याना असा अजार आहे. त्यांच्या नियोजीत वर्/वधुचं तरी कल्याण होईल ना?>>>> १००% सहमत...

शहरी भागात ह्याची गरज बिंबवणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळवणे(प्रत्यक्ष सहभागा बाबतीत) फारसे कठीण होऊ नये >>>> शहरी भागातही याबाबतीत प्रचंड कठीण आहे..

.

अशी संस्था चालु करायची असेल तर १००मधे एखादा बरोबर रिपोर्ट हा रेशो योग्य नसुन १००मधे एखादाच चुकिचा रिपोर्ट असाच रेशो असायला हवा... >>> अर्थात तो रेशो तसाच रहावा म्हणून आपण सजग राहू.

त्या दुर करायला काय करता येइल यावर आधीच विचार केलेला बरा....>>> नक्कीच, पण मला इतकेच म्हणायचे आहे की वहायच्या आधी वळणे कशी आहेत याचा जो अंदाज येईल त्यापेक्षा वाहता वाहता अनुभवाने पक्का रस्ता सापडेल.

जर recent इन्फेक्शन असेल तर PCR टेस्ट पॉसिटिव्ह येते... जर ELISA (यात HIV antibody डिटेक्ट करतात) negative आली तर परत ३ महिन्याने टेस्ट करावी लागते.. आणि दुसरी टेस्टही निगेटिव्ह आली आणि मधल्या काळात HIV शी संबंध आला नसेल तरच ती व्यक्ती HIV निगेटिव्ह आहे असं म्हणता येईल..

वहायच्या आधी वळणे कशी आहेत याचा जो अंदाज येईल त्यापेक्षा वाहता वाहता अनुभवाने पक्का रस्ता सापडेल.>>>> तसं नको.. सुरुवातीपासुनच जेव्हडे जमतील तेव्हडे प्रॉब्लेम्स माहित असलेले बरे.. कारण प्रत्यक्ष काम करताना कधिही विचार केले नसतील असे प्रॉब्लेम्स समोर येतात..

ओके चिमुरी,
तुम्हाला ज्या अडचणी येतील असे वाटते आहे त्या तुम्ही सलग मांडा. मांडताना हे लक्षात ठेवा की

आपण लोकांना १. लग्नापुर्वी ही तपासणी किती व का महत्वाची आहे २. तपासणीची शास्त्रीय माहिती ३. ती तपासणी उपलब्ध असणारी ठिकाणे व खर्च ४. आजार होण्याची कारणे व अशा आजारापासून दूर राहण्याचे मार्ग इ. माहिती पुरविणार आहोत. आपले महत्वाचे काम असेल लोकांची मानसिकता बदलून एक प्रथा म्हणून ही तपासणी विवाहसंस्थेत रुजविणे. त्यासाठी आपल्याला गरज आहे ज्ञानाची, तज्ञांची, आपल्या संभाषण कौशल्याची आणि काम करण्याच्या बिनशर्त, निस्वार्थ तयारीची.

इथल्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या... विचार चांगला आहे.
मला एक शंका आहे, समजा ठरल्याप्रमाणे दोन्ही बाजूंची एच आय व्ही टेस्ट करून घेतली... मुलगी किंवा मुलगा एकाची पॉझिटिव्ह आली, लग्नं मोडलं, तर दुसर्‍या बाजूच्या मंडळींकडून सिक्रसी मेंटेन करण्याची गॅरेंटी कोण घेऊ शकेल? त्यासाठी काही कायदा सुव्यवस्था? तो ज्याच्या त्याच्या मॅच्यूरिटीचा प्रश्न आहे हे खरं... पण समाजात शाब्दिक आग लावणारे लोक कमी नसतात. आधीच एच आय व्ही डिटेक्ट झाला म्हणून अर्धमेली झालेली माणसं, बदनामीमुळे अजून दबली जाऊन सामुहिक आत्महत्या पण करू शकतील..

आधीच एच आय व्ही डिटेक्ट झाला म्हणून अर्धमेली झालेली माणसं, बदनामीमुळे अजून दबली जाऊन सामुहिक आत्महत्या पण करू शकतील..
>>> कदाचित नाहित पण करणार, शक्यतांवर विसंबून चालणार नाही. एचआयव्ही पॉसिटीव्ह आहे यात दोष किंवा अनावधान त्या व्यक्तिचे आहे. त्याने व त्याच्या कुटूंबाने ही गोष्ट मान्य करायला हवी. वर जेव्हा हे एका संस्थेच्या माध्यमातून समोर येईल तेव्हा ती संस्था त्याना मानसिक आधार शास्त्रीय माहिती व पुढचे मार्गदर्शन करेलच. पण जर ते सामुहिक आत्महत्या करू शकतात म्हणून तपासणीच टाळली तर निर्दोष मुलिचा/मुलाचा खून होईल त्याचं काय? त्याच मुलाने ही गोष्ट दडवून आपल्याच नातेवाईकातली मुलगी पाहिली व ही गोष्ट आपल्याला कळाली तर तीला वाचविणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याला एड्स झाला हा त्याचा दोष असेल किंवा नसेलही पण जर त्याने कळाल्यानंतरही लग्नाचा विचार केला तर तो गुन्हा/घात आहे.

हबा माझा प्रश्न वेगळाच आहे... मी सिक्रसी मेंटेन करण्याविषयी विचारलंय..
मानसिक आधार तर प्रत्येक जण आपापल्या परिने मिळवेलंच...

मी सिक्रसी मेंटेन करण्याविषयी विचारलंय..
>>> ती मेंटेन करणं ज्या वेळी कुणाच्यातरी जीवासाठी धोकादायक ठरेल तेव्हा ती करू नये. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उगाच बदनामी करत फिरणार्‍यांना एड्सच लागतो असे नाही. निर्व्यसनी मुलाला अट्टल दारूडा घोषित केले जाते. बालब्रह्मचार्‍याची दहाबारा लफडी रसभरीत वर्णन करून सांगितली जातात. हे प्रकार आहेतच पण समाजाच्या व्यापक फायद्यासमोर अशा गोष्टींचा विचार करणे अयोग्यच ठरावे असे वाटते.

तरीही तुम्ही विचारताय म्हणजे अशा गोष्टींवर काही उपाय / पर्याय तुमच्याकडे असेलच तो मांडलात तर अधिक बरे होईल.

चांगला विचार आहे. आपण 'विवाह सुचक मंडळांना' सुचवु शकतो की मुला-मुलिंची नाव नोंदणी करुन घेतानाच HIV Test Report बंधनकारक करावा आणि लग्न जमत असेल तर पुन्हा एकदा Test करायला सांगावी. तसेच लग्न अजुन जमले नाहिये पण सुरुवातिला दिलेल्या report ची validity संपली असेल तर पुन्हा report submit केल्याशिवाय त्यांना पुढे कुठल्या मुला/मुलिंची माहिती / संपर्क देवु नये.
खेड्यात माहिती नाही पण शहरात तरी याचा काही फायद होऊ शकतो कारण शहरातही आपल्यासारखे सुशिक्शित सुद्धा HIV Test बद्दल अजुन तेवढे जागरुक नाहियेत.......... जागरुकता चर्चा करण्यापुर्तीच आहे.

आपण 'विवाह सुचक मंडळांना' सुचवु शकतो की मुला-मुलिंची नाव नोंदणी करुन घेतानाच HIV Test Report बंधनकारक करावा आणि लग्न जमत असेल तर पुन्हा एकदा Test करायला सांगावी. तसेच लग्न अजुन जमले नाहिये पण सुरुवातिला दिलेल्या report ची validity संपली असेल तर पुन्हा report submit केल्याशिवाय त्यांना पुढे कुठल्या मुला/मुलिंची माहिती / संपर्क देवु नये.
>>> खूपच चांगला विचार आहे. १०००१% अनुमोदन!!!

विषय चांगला आहे.... पण या विषयाचा आवाका फार मोठा आहे.

लग्ना आधी ही चाचणी करावी की नाही हा स्वेच्छेचा प्रश्न झाला. मुळात ही चाचणीच ऐच्छिक आहे. म्हणून ही चाचणी मोफत करण्यात येणार्‍या केंद्रास व्हीसीटीसी सेंटर ( व्हॉलुंटरी टेस्टींग अँड काउन्सेलिंग सेंटर ) असं म्हटलं जातं. पीसीआर ( पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन ) ने बिनचूक निदान होते व त्यात इन्फेक्शन विंडो पीरीयड मधे असलं तरी कळू शकतं ..म्हणजे टेस्ट तरीही पॉझिटिव्ह येते.

बरं याचा अर्थ एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तींनी लग्न करु नये असा होत असेल तर ते योग्य नाही. ते सुद्धा लग्न करु शकतात.. म्हणजे नवरा -बायको दोघे जरी पॉझिटीव्ह असले तरी ते एचआयव्ही निगेटीव्ह बाळाला जन्म देवू शकतात.मग त्यांचं वैवाहिक जीवन त्यांना उपभोगू न देणं गैर ठरेल.

पण स्वतःच पॉझिटीव्ह स्टेटस लपवून दुसर्‍यास फसवणं निश्चित चूक आहे..... दुर्दैवानं त्यासाठी कायदा अस्तित्वात नाही,कायदा होवू शकत नाही.

सरते शेवटी इतकंच म्हणेन की,आपल्या देशात कायदा तितक्या पळवाटा आहेत. प्रत्येक वाहनाला पीयुसी प्रमाणपत्र अनिवार्य आहे...... पण ते कश्या पद्धतीने मिळतं हे सांगायची गरज नाही. एचआयव्ही निगेटीव्ह प्रमाणपत्र सुद्धा असंच कशावरुन मिळणार नाही?

एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी आणखी माहिती इथे मिळेल.

www.nacoonline.org

www.avert.org

अजून माहिती हवी असेल... एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी,तर मला विपूतून संपर्क करा...... नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर या विभागापुरता हा पूर्ण कार्यक्रम माझ्या कडून राबविला जातो.

एचआयव्ही पॉसिटीव्ह आहे यात दोष किंवा अनावधान त्या व्यक्तिचे आहे.
>> एचआयव्ही हा साध्या सिरिंज वा रक्तातुन पसरु शकतो. दक्षिणा म्हणते त्याप्रमाणे
secrecy ठेवणे आवश्यक केले पाहिजे. मला वाटते लग्न ठरले असताना वा नसतानाही general blood tests सर्वान्नी ३ वर्षातुन एकदा atleast करणे चांगले. HIV वाइटच पण मधुमेह जास्त जणांना मारतो.

असा कायदा व्हावा असे मनापासुन वाटते.
दक्षिणाचे म्हणणे ही पटले. म्हणुनच लग्नाला उभे रहाण्यापुर्वीच जर मुला मुलींनी स्वतःची टेस्ट करुन घेतली तर अशी बेइज्जती टळू शकेल. नाहीतर लग्न ठरल्यावर टेस्ट करुन ती पॉझिटीव्ह आल्यास ते सगळीकडे पसरणारच. अर्थात पण कोणाची तरी सीक्रसी जपण्यासाठी दुसर्‍या निरपराध माणसाचा जीव धोक्यात जात असेल तर त्या सीक्रसीची चिंता करणे मलातरी मुर्खपणाचे वाटते.

कायद्यातुन पळवाटा काढणारे , तो न मानताच पुढे जाणारे खुप लोक असतील परंतु त्या आधाराने एका व्यक्तीचा जरी जीव वाचु शकला तरी त्या कायद्याचे सार्थक होईल.
अता लग्नाचे किमान वय, हुन्डाबंदी असे कायदे आहेतच की आणि ते तोडणारे पण आहेत. तरीही त्या कायद्यांचा कुठेनाकुठे थोडाफार फायदा होतोच आहे.
तसेच HIV चा पण कायदा झाल्यास हळू हळू का होईना पण फायदाच होईल. शिवाय अत्ता मनात असुन सुद्धा या विषयावर बोलणे, असा आग्रह धरणे मुला किन्वा मुलीकडच्यांना अवघड वाटू शकते. तेव्हा कायदा झाला तर ते सोप्पे होईल.
अता इथे मायबोलीवर लिहिणारे सर्व उच्चशिक्षित आहेत पण ज्यांची गेल्या १० वर्षात लग्ने झाली आहेत त्यापैकी किती जणांनी अशा टेस्ट करुन घेतल्या आहेत ? माझ्या माहीतीत तर आजपर्यंत कोणीही नाहीये. हेच चित्र कायदा झाला तर नक्कीच बदलू शकेल.

---HIV वाइटच पण मधुमेह जास्त जणांना मारतो.----
अगदीच चुकीची तुलना आहे. मधुमेह हा संसर्गजन्य रोग नव्हे. तुमच्यामुळे तुमच्या पार्टनरला होणार नाही. तसे इतरही अनेक आजार आहेत की ज्यात भरपुर लोक मरतायेत , मलेरिया, कावीळ,कॅन्सर सारखे. पण त्याची तुलना HIV बरोबर करु नये.

शहरी भागात ह्याची गरज बिंबवणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळवणे(प्रत्यक्ष सहभागा बाबतीत) फारसे कठीण होऊ नये >> माझी एक अत्यंत जवळची मुंबईत वाढलेली मैत्रिण लग्नासाठी मुलं बघत होती.. तिला विचारलं की तुला एखादा मुलगा लग्नायोग्य वाटला तर त्याला असं सर्टिफिकेट मागशील का.. ती म्हणाली की तिला असं वाटत नाही की कुठला मुलगा हे अ‍ॅक्सेप्ट करेल..
समोरच्याच्या इगोकरता आख्खं आयुष्य पणाला लावणं मला तरी बरोबर वाटलं नाही! मी समजवण्याचा प्रयत्न केला .. पण तिला लॉजिकली ते पटलं तरी she was not ready to go ahead with that. Sad
त्यामुळे कायदा आला तरच बदल शक्य होईल (हळूहळू का होईना)
डेलिया, तू म्हणतेस ती माणसं "मॅच्युअर" कॅटेगरीतली असतात. माहित असूनही फसवणारेच जास्त सापडतील.
विवाहसूचक मंडळाचा उपाय चांगला वाटतो - पण तो बिझनेस असल्यानं येणार्‍या उपवर लोकांनीही मान्य केलं तरच हे रुजलं जाण्याची शक्यता जास्त. कायदा हाच उत्तम उपाय.. काहीजण पळवाटा शोधतीलही.. पण काही जण वाचू शकतील.. जितका जास्त काळ जाईल तितका हा विचार समाजात रुजेल..

--डेलिया, तू म्हणतेस ती माणसं "मॅच्युअर" कॅटेगरीतली असतात. माहित असूनही फसवणारेच जास्त सापडत---- बरोबर, पण ते वाक्य मी दक्षिणाच्या पेशंटच्या 'सिक्रसी' च्या मुद्याला उद्देशुन लिहिले होते. पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी आणि आपल जीव धोक्यात टाकावा नाही का.

--माझी एक अत्यंत जवळची मुंबईत वाढलेली मैत्रिण लग्नासाठी मुलं बघत होती.. तिला विचारलं की तुला एखादा मुलगा लग्नायोग्य वाटला तर त्याला असं सर्टिफिकेट मागशील का.. ती म्हणाली की तिला असं वाटत नाही की कुठला मुलगा हे अ‍ॅक्सेप्ट करेल..
समोरच्याच्या इगोकरता आख्खं आयुष्य पणाला लावणं मला तरी बरोबर वाटलं नाही! मी समजवण्याचा प्रयत्न केला .. पण तिला लॉजिकली ते पटलं तरी she was not ready to go ahead with that ---

हे बहुतेक सगळ्यांच्याच बाबतीत होते. इथे 'टेस्ट हवी' लिहीणार्‍यांपैकी तरी कोणी टेस्ट केलीये का लग्नाआधी ? आम्ही तर नाही. अत्तापर्यंत एकानेही लिहिले नाहीये की आम्ही अशी टेस्ट करुन घेतली होती म्हणुन. लोकांना सांगायला सगळेच पुढे असतात पण स्वतःवर वेळ आली की सगळेच विसरायला होते. म्हणुनच तर कायदा हवा.

बरोबर आहे डेलिया. मुलांना साधी मेडीकल करु म्हटलं तरी तयार होत नाहीत, एचायव्ही टेस्टकरता तयार होणं म्हणजे अशक्यच वाटतंय मला. कायदा असेल तर त्याचं पालन तरी केलं जाईल. (आशा ठेवायला काय हरकत आहे?)

---HIV वाइटच पण मधुमेह जास्त जणांना मारतो.----
अगदीच चुकीची तुलना आहे. मधुमेह हा संसर्गजन्य रोग नव्हे. तुमच्यामुळे तुमच्या पार्टनरला होणार नाही.

>> पण तुलना चुकीची नाही कारण मधुमेह आहे हे माहित असुन न सांगता लग्न केले तर फसवणुक नाही? २४ व्या वर्शी तरी मला ती फसवणुकच वाटली असती.

आम्ही लग्नपुर्वी दोघांची blood test केली आणि दर वर्शी करतो. लग्नापुर्वी Rh compatibility पण पहाणे महत्वाचे असते. हा मोठा प्रश्न नाही पण मुल हवे असल्यास Rh incompatible जोडप्यांनी योग्य ट्रीट्मेंट घेतल्यास बरीच complications टळु शकतात.

सिक्रेसी ला भारतात खुप अर्थ नाही आहे. सहज पणे माहिती परभारे सांगितली जाते, एखाद्याने सांगितली तरी आपण त्या प्रकाराला खुप गंभीर गुन्हा मानत नाही (येथे सरळ नोकरी जाते).

लग्ना करण्या अगोदर दोघांनाही परस्परांच्या HIV बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कुंडली दाखवण्याच्याही आधी हा योग जुळवणे. मी माझी (वा भावी पत्निची) परिक्षा केलेली नव्हती पण म्हणुन मी चांगला सल्ला देण्याची संधी दवडणार नाही :स्मित:. मला आज लग्न करायचे असेल तर जरुर परिक्षा करेल.

कायद्याने खुप काही साधता येईल या बद्दल मी साशंक आहे. गर्भजल परिक्षेवर बंदीचे काय होते? किती लोकं त्यांचे पालन करतात ? आता डॉ. च्या हालचालींवर नजर ठेवायला अजुन एक रोबोट आला आहे.

जर तुम्ही देशाबाहेर असाल आणि blood test करुन घ्यायची असेल तर काहीतरी sick visit करून अशी टेस्ट करा जर well visit असेल तर insurance कव्हर करणार नाही (HIV तर अजिबात नाही). लग्नानंतर पहिल्या वर्शी बिल ५००० डॉलर्स आले नंतर हा मुर्खपणा कधीच केला नाही.

बरोबर, पण ते वाक्य मी दक्षिणाच्या पेशंटच्या 'सिक्रसी' च्या मुद्याला उद्देशुन लिहिले होते. पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी आणि आपल जीव धोक्यात टाकावा नाही का. >> आपला मुद्दा सारखाच आहे म्हणजे!

हे बहुतेक सगळ्यांच्याच बाबतीत होते. इथे 'टेस्ट हवी' लिहीणार्‍यांपैकी तरी कोणी टेस्ट केलीये का लग्नाआधी ?
>> आम्ही लग्न करायचं असं कॉलेजच्या दिवसात ठरवलेलं.. ठरवलं तेव्हा HIV बद्दल काहीच जागरूकता नव्हती.. शब्दही ऐकला असेल जेमतेम. त्यामुळे तसा काही प्रश्नच नव्हता! (आणि हबांच्या मैत्रिणीचं उदाहरणच बघ ना.. तिनं केली नव्हती टेस्ट लग्नाआधी - पण म्हणून तिनं लोकांना सांगायचं नाही का? इन फॅक्ट तिला त्याचे परिणाम चांगलेच माहिती आहेत, त्यामुळे ती जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते!)

आज इतकी जागृती झालेली असताना, अशा केसेस माहित असताना केवळ समाजाच्या भितीनं तसं पाऊल न उचलणं पटत नाही..

पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी आणि आपल जीव धोक्यात टाकावा नाही का.
---- HIV आहे हे अगोदर माहित असेल तर असणारी व्यक्ती टेस्ट करणारच नाही वा ते करण्याची टाळाटाळ करतील. बहुतेक +ve घटनांत त्या व्यक्तीला पण आपण व्याधी ग्रस्त आहोत हे प्रथमच समजणार असेल (म्हणुन धक्कादायकच असेल). प्रत्येक घटना फसवणुक नसणार आहे, त्यामुळे समाजाने सिक्रेसीची, सहानभुतीची तसेच आधाराची चिंता जरुर करायला हवी असे वाटते. लग्न नका करु पण एक मित्र मैत्रिण बनुन आधार जरुर देता येतो. स्वत:चा काही दोष नसतांना पण HIV होण्याची शक्यता असते.

भारतात काय उदय इथे पण HIV झालेल्यांबरोबर काम करायला लोक घाबरतील. व्याभिचारामुळे HIV होतो हाच तर मोठा गैरसमज आहे HIV हा साध्या flue shot ची सिरींज (नीडल नव्हे) डबल use केली तरी होउ शकतो आणि हा प्रकार कित्येक clinics मध्ये पैसे वाचवायला आणि व्हॅक्सिन फुकट जाउ नये म्हणुन सर्रास चालतो.
>> पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी >> जर ते अशा टेस्टला तयार झाले तर ते फसवु पहाणारे कसे. माहित असणारे तयार होतिल का? जर कायदा कोणाला अशा टेस्ट साठी Force करणार असेल तर अशी सिक्रसी पण फोर्स करावी.

प्रत्येक घटना फसवणुक नसणार आहे, त्यामुळे समाजाने सिक्रेसीची, सहानभुतीची तसेच आधाराची चिंता जरुर करायला हवी असे वाटते. >> ह्या बाबतीत वेगळ्या पातळीवर जनजागृती होणं गरजेचं आहे..
आमच्या पुण्यातल्या कामवाल्या बाईचा नवरा एडस नं गेला हे सोसायटीत पसरलं आणि बर्‍याच जणांनी तिला कामावरून काढून टाकलं. असं सरसकट वाळीत टाकणं अगदीच बरोबर नाही.. आधीच ती व्यक्ती मानसिक/शारिरीक/आर्थिक रित्या खचलेली असू शकते - त्यात पुन्हा असं बाकीच्यांनी वागणं अगदीच चूक..

व्याभिचारामुळे HIV होतो हाच तर मोठा गैरसमज आहे >> मुळात कुठल्याही कारणामुळे रोग झाला तर वाळीत टाकणं बरोबर नाही.. हा तर संसर्गजन्य रोगही नाहीये की सहज स्पर्शातून, श्वासातून होईल..समाजाच्या कुष्ठरोगाचं आधुनिक रूप झालं हे!

पण HIV ग्रस्त/एडसग्रस्त लोकांशी समाजाची वागणूक आणि लग्नाआधी HIV positive असून आणि हे माहित असून दुसर्‍या व्यक्तीला मृत्यूच्या दारात पाठवणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माहित असूनही फसवणूक करणारे महाभाग कमी नाहीत - हे होऊ नयेत म्हणून कायदा होणं गरजेचं.
(HIV ग्रस्त/एडसग्रस्त लोकांशी समाजाची वागणूकीकरता जनजागृतीची गरज आहे- हे अगदी मान्य! )

"वेल said नानबा" तु मुलगी आहेस हे मला उशीरा कळले, माझा id पण मी नवर्याबरोबर आणि पुर्वी भावाबरोबर शेअर करायची.

लग्नाआधी HIV positive असून आणि हे माहित असून दुसर्‍या व्यक्तीला मृत्यूच्या दारात पाठवणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
>> मला वाटते जर योग्य पुरावा असेल तर खुनाचा प्रयत्न म्हणुन केस करता येउ शकते.

हिवरे बाजार या गावाचे नाव तेथिल सुधारणांमुळे बरेच चर्चेत आहे. इतर सुधारणांबरोबरच त्या गावात लग्नापुर्वी HIV टेस्ट करुन घेण्याचा पंचायतीने\गावकर्‍यांनीच नियम बनवला आहे. आणि तो पाळला ही जातो असे ऐकले. अशा सुधारणांसाठी सुशिक्षित असण्याची नव्हे तर समंजस असण्याची गरज आहे.

Pages