लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

Submitted by ह.बा. on 8 December, 2010 - 04:05

एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्‍याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.

"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"

याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.

कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.

गुलमोहर: 

निल्सन तुमच्या भावावर आणी वहिनीवर योग्य ते उपचार वेळ्च्यावेळी होवोत आणी ते यातुन बाहेर यावेत. तुम्हाला शुभेच्छा.

निल्सन तुमच्या भावावर आणी वहिनीवर योग्य ते उपचार वेळ्च्यावेळी होवोत आणी ते यातुन बाहेर यावेत. तुम्हाला शुभेच्छा. >> ++१

ह.बा यांनी उपक्रमाचे पुढील तपशील लिहिलेले दिसले नाहीत.

निल्सन, तुम्हाला खुप शुभेच्छा.त्तुम्हाला लागेल ती मदत लगेच मिळो.

निल्सन, आम्ही प्रार्थना करत आहोतच. सर्व काही ठिक होइल!!!

काळजी घ्या. मेडीकल रेकॉर्ड्स इथून पुढे जपून ठेवायला सांगा.

निल्सन, परिस्थितीला फारच खंबीरपणे सामोर्‍या जात आहात. प्लीज काळजी घ्या. सर्व सुरळीत पार पडू देत अशी देवापाशी प्रार्थना.

हा बाफ मी आज वाचला. चांगली माहिती वाचायला मिळाली.

खूप वर्षापूर्वी आम्ही श्रीरामपूरला असताना आम्ही ज्यांच्या घरात भाड्याने राहायचो ते मालक आम्हाला म्हणाले होते की ते त्यांच्या मुलं, मुली, पुतणा आणि पुतणीचे लग्न करायच्या आधी HIV टेस्ट करणार आणि समोरच्या पार्टीलापण आग्रह करणार की आम्हाला ही टेस्ट करायचीय, कारण हे हल्ली खूप ऐकायला येतं, फसवणूक होते. त्याप्रमाणे त्यांनी २००६ मध्ये त्यांच्या मुलीचं लग्न ठरवताना हि अट घातली आणि तिच्या सासरच्यांनी ती मान्य केली आणि दोघांच्या टेस्टस केल्या. मला खरंच कौतुक वाटलं तेव्हा, कारण फार शिकलेले असे ते नव्हते पण जागरूक होते, त्यांच्या नातेवाईकात थोडा विरोधाचा सूरपण होता पण ते ठाम होते. त्यांचं नातेवाईकांनापण सांगणं असायचं, हे गरजेचं आहे. आज हा बाफ वाचतांना ते मालक अगदी आठवले.

तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांना यश आले, भाऊ आणि वहिनीच्या मुलाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे Happy

सध्यातरी घरातील सगळे द्विधा मनस्थितीत आहेत, वातावरण गढुळ आहे पण निवळेल हळुहळु.

जाणकारांकडुन अजुन एक माहिती हवी होती.

जर HIV + व्यक्तीचे रक्त अन्नात मिसळले तर इतरांना त्याचा धोका आहे का? (म्हंजे जर स्वयंपाक करताना बोट चिरुन रक्त आले आणि ते रक्त अन्नपदार्थात सांडले वैगरे तर)
एडस वा HIV चे विषाणु शरीराबाहेर जिवंत राहु शकतात का?

तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांना यश आले, भाऊ आणि वहिनीच्या मुलाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे >>>> अरे वा!

वहिनी कशी आहे आता?

>> जर HIV + व्यक्तीचे रक्त अन्नात मिसळले तर इतरांना त्याचा धोका आहे का? (म्हंजे जर स्वयंपाक करताना बोट चिरुन रक्त आले आणि ते रक्त अन्नपदार्थात सांडले वैगरे तर)
एडस वा HIV चे विषाणु शरीराबाहेर जिवंत राहु शकतात का?
>> बहुतेक नाही. डॉ. ना स्पष्ट विचारून खात्रि करुन घ्या.

तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांना यश आले, भाऊ आणि वहिनीच्या मुलाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे>>> मस्त!

तुम्ही खूप धीराने घेतलंत! पुढेही सगळं नीट होईल. शुभेच्छा! Happy

वहिनी कशी आहे आता? >>> तिला स्वत:पेक्षा मुलाची काळजी जास्त होती त्यामुळे आता बरचं टेन्शन कमी झालं आहे तिचे.

सिव्हिलमध्ये वहिनीची ट्रिटमेंट सुरु झाली का? >> हो. तिघांची रक्ततपासणी तिथेच झाली. वहिनीची सीडी ४ केली काल, रिपोर्ट २ दिवसांनी मिळणार आहेत त्यानंतर औषधे सुरु करणार आहेत.

वाह! फारच छान बातमी दिलीत! पुढच्या उपचारांसाठी शुभेच्छा!
माझ्या माहितीप्रमाणे HIV चे विषाणू शरीराबाहेर फार काळ जीवंत रहात नाहीत पण त्याचवेळी HIV positive व्यक्तीला कोणतीही जखम होणे जोखमीचे आहे. कारण जंतूसंसर्गाचा धोका असतो.

छान बातमी निल्सन! खूप बरे वाटले वाचून. तुमच्या वहिनीचीही ट्रिटमेंट व्यवस्थित होइल. शुभेच्छा आणि प्रार्थना!

Pages