लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

Submitted by ह.बा. on 8 December, 2010 - 04:05

एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्‍याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.

"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"

याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.

कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.

गुलमोहर: 

हिवरे बाजार या गावाचे नाव तेथिल सुधारणांमुळे बरेच चर्चेत आहे. इतर सुधारणांबरोबरच त्या गावात लग्नापुर्वी HIV टेस्ट करुन घेण्याचा पंचायतीने\गावकर्‍यांनीच नियम बनवला आहे.
>> हे फारच चांगले तुझ्या मैत्रिणीला पण थोडे युक्तिने घ्यायला सांग HIV चे सर्टिफिकेट मागितले तर काही मुले आणि मुली रागावत अस्तिलही पण तिने जर प्रेग्नन्सीत complication होउ नये म्हणुन टेस्ट करुया असे सांगितले आणि मग HIV, blood sugar, Hepatysis असे इतर पण करतोयच तर करुया बोलुन अ‍ॅड केले तर बहुतेक कोण रागावणार नाही.

कायदा हवा हे पटतय पण अर्थात आपण तो करणार नाहिये तर सरकारला तो करावा लागणार आणि ती गोष्ट व्हायला शेकडो वर्षे वाट पहावी लागणार असे झाले तर?
त्यामुळे सामान्य माणूस म्हणुन काय करता येइल तो विचार आपण करावा. (ह्यात कायदा करण्यासाठी सरकारवर दबाव आणणे हे पण होउ शकते)..
पण जाहिराती, पोस्टर्स, लोकांशी बोलणे, पत्रके वाटणे अशाप्रकारे, म्हणजे सतत लोकांसमोर ही गोष्ट येत रहावी असे केले, "HIV टेस्ट करा,करा,करा" ह्याचा लोकांवर सतत मारा होत राहिला तरच हळुहळु लोक त्यावर मनात विचार करु लागतील व अंमलात पण आणतील. एखाद्या गोष्टीची चर्चा उघडपणे समाजात होउ लागली तर लोक पण 'अरे बाप रे!! हे काय?' असा विचार करायचे कमी करतील.
आम्ही पण केली नव्हती टेस्ट... पण आज विचार केला तर कळते, ह्या टेस्टबद्दल सर्रास सर्वकडे बोलले गेले असते तर आपोआप तो विचार आधीच मनात आला असता व टेस्ट केली गेलीअसती, एक रुटीन म्हणुन.
हबा., चांगला बीबी. आतापासुन माझ्या ओळखीत कोणी लग्न जमवत असेल तर मी त्या व्यक्तिला हे सुचवेन.

हबा, ह्याचं शिर्षक जरा विचित्र वाटतंय. पटल्यास बदलून 'लग्नापूर्वी एच आय व्ही तपासणी करावी का?' वगैरे करणार का?

http://mahasacs.org/48%20NGO%20MARATHI%20LIST.pdf

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेसोबत काम करणार्‍या अशासकीय संस्थांची यादि. यात या संस्थांचे पत्ते,फोन्,फॅक्स इ.इ. सगळं काही आहे.

मोफत समुपदेशन व चचणी केंद्रे महाराष्ट्रात सर्वत्र आहेत.उदा.ठाणे जिल्ह्यात असलेल्या केंद्रांची यादि खालील प्रमाणे.

LIST OF ICTC CENTRES ( THANE)

Mahatma Gandhi Missions Med. College, Navi Mumbai

Padmashree Dr. D.Y.Patil Med. Col., Navi Mumbai

Terna Medical College, Navi Mumbai

Rajiv Gandhi Medical College, Thane

Civil Hospital, Thane

Civil Hospital, Thane

Corporation Hospital, Vashi, New Mumbai

Central Hospital, Ulhasnagar

Kalyan Dombivali Corp. Hospital

SDH, Wada

SDH, Dahanu cottage

SDH, Kasa (RH)

SDH, Manor

SDH, Virar

SDH, Murbad

SDH,Palghar

SDH, Mokhada

Indira Gandhi Hospital, Bhiwandi

General Hospital, Sector 10, Navi Mumbai

Rukhminibai Hospital, Kalyan.

SDH,Talasari

SDH,Vikramgad

SDH,Goveli

Ulhasnagar Maternity Home, Camp 4, Ulhasnagar

Airoli MCH, Navi Mumbai

Nerul MCH, Navi Mumbai

Turbhe MCH, Navi Mumbai

Sutikagriha Hospital, Tilak Path, Dombivali (W), Kalyan

Vartak Nagar Mat. Home, Thane

Health Centre, Miraroad

S.Meenathai Thakare Mat. Home, Mumbra, Thane

Health Centre, Bhayender

Mahatma Phule, Kalyan

Balkum Mat. Home, Thane

SDH, Shahapur

RH, Jawahar

महारा ष्ट्रातील सर्व केंद्रांची यादि इथे मिळेल.

http://mahasacs.org/INNER1.HTM

एच.आय.व्ही.टेस्ट आणि प्रसाराबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती इथे मिळेल.

http://www.hivtest.org/

http://www.thebody.com/testing.html

निलिमा मस्तंच आयडिया.. Happy
घी जब सिधी उंगली से नही निकलता....

असो पण मुलंच काय, कधी कधी मुली सुद्धा टेस्ट करायला नकार देऊ शकतात.
त्याचं काय करायचं? त्यांना मुलांनी काय कारणं द्यायची?

माझ्या ओळखीत आहेत २-३ जोड्या लग्नाआधी HIV अन इतर तपासण्या केलेल्या. आम्ही दोघांनीपण केली होती ही टेस्ट अन इतरही काही रुटीन तपासण्या लग्नाआधी.
आपल्याकडे एकंदरीतच एडस या शब्दाला जो सोशल स्टिग्मा आहे, त्यामूळे हे सिक्रसी वैगरे सगळं येतं. नुसता कायदा करून खूप काही होणार नाही, (आणि कायदा म्हटलं की पळवाटा पण येतात)तर सतत बोलल्याने, चर्चेने ही बाब सगळ्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.

सिक्रसीबद्दल म्हणायचं तर याबद्दल खरचं अतिशय वेगळे कायदे आहेत. स्वेच्छा रक्तदान शिबिरांमधून रक्त गोळा केल्यावर त्यावर ही टेस्ट केली जाते. जर एखाद्या सँपलचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर ती बॅग डीस्ट्रॉय केली जाते, पर्म्तू त्या रक्तदात्याला तो /ती HIV पॉझिटिव्ह आह ही माहिती दिली जात नाही. अशी माहिती देणे कायद्याने गुन्हा आहे. अगदी रक्तदान केल्यानंतर जर एखाद्याने रक्तपेढीत येवून विचारले तरी त्याला सांगता येत नाही बहूतेक. त्याला टेस्ट करायचा सल्ला दिला जातो.
आमच्या कॉलेजात ज्यावेळी रक्तदान शिबिरं व्हायचं त्यावेळी तिथले प्राचार्य आईला सांगून ठेवायचे की जर एखादं सँपल पॉझिटिव्ह आलं तर कळवा. वैयक्तिक संबंधांमूळे अशावेळी प्राचार्यांमार्फत आणि यावर काम करणार्‍या मेडिकल सोशल वर्करच्या मार्फत अशा विद्यार्थ्याच्या पालकांना त्याची परत टेस्ट करवण्यासाठी समजवावे लागे. परंतू हे खरंतर कायद्यात बसत नाही.
(आई शासकिय रक्तपेढीत मेडिकल सोशल वर्कर आहे, म्हणून ही थोडीशी माहिती मिळाली)

आपण खरच काही उद्योग केले असतील तर दुसर्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा करायचा आपल्याला हक्क नाही हे जाणून टेस्ट करायला काय हरकत आहे...आणि नसेलही काही केलं तरी दुसरीकडुनही एड्स होण्याची शक्यता आहेच म्हणुनच मी आणि माझ्या नवर्याने टेस्ट केली होती...विशेष काय त्यात?

डॉक्टर, मस्त माहिती... जमल्यास HIV/AIDS बद्दलच्या समज-गैरसमजांविषयी सोप्या मराठीत एखादा लेख लिहा ना... यात टेस्ट्स, शास्त्रिय माहिती पण सर्वांना समजेल अश्या भाषेत देता येइल....

अजुन एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, काही वेळा निरोगी लोक HIV vaccine च्या clinical trial साठी volunteer असतात.. अश्यावेळेस अश्या व्यक्तींची टेस्ट HIV infection नसतानाही पॉसिटिव्ह येते ...

डॉक्टर तुमची मोलाची मदत होते आहे. आपण मान्यता दर्शविलीत त्याबद्दल आभारी आहे.

मी आणि माझी बायको लग्नापुर्वी सात वर्षे आणि लग्नांतर तीन वर्षे अशी एकूण १० वर्षे एकमेकांना ओळखतो. विश्वास आहेच पण तरीही टेस्ट आम्ही केली होती. कोल्हापुरात असताना तिने आकाशवाणीवर याविषयी एक कार्यक्रमही केला होता.

मी यापुर्वी काही संस्थांसाठी कामे केली. अनाथाश्रम, विटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या संस्थेतल्या मुलांसाठी स्पर्धा घेतल्या त्याना मदत केली. थोडं बहुत काम केलं आहे. आपल्या मित्रा-मित्रांची अशी संस्था असावी अशी माझी मनिषा आहे. मी एकदा शिरोळच्या महापुरात नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी चार पाच मित्रांसोबत गेलो तर तिथे आम्हाला कोणत्या संस्थेतून आला? ओळ्खपत्र दाखवा इ. प्रश्न विचारून आमची मदतही घेतली नाही. तुम्ही चोरही असू शकता असेही सुनावले गेले. त्यामुळे एक कायदेशीर शिक्का मारून घेणे गरजेचे आहे.

या कामांसाठी अगदी गटगही कॅन्सल करावा लागणार नाही. एवढे फ्लेक्झिबल नियोजन असेल. ज्याला जसे जमेल तसे काम वयक्तिक पातळीवर सुरू करावे. फक्त नोंदणी केलीत तर आनंदच आहे.

याचिका दाखल करणे, कायद्याची मागणी करणे, इ. साठी पुवेका केव्हापासून तयार आहेत.

दोन फोटो, ओळखपत्र, संपर्क, पत्ता. पाठवून देणे. एवढेच तुमचे काम असेल.

विजयजी, किश्या, डॉक्टर आपली सुरूवात झाली आहेच. त्याबद्दल आपण एकमेकांचे आभारी आहोत.

काहीजणांनी आता काम करण्याची तयारी दाखविली आहे. त्याना संकल्पना कळावी या हेतूने हा लेख पुन्हा वर आणतो आहे. इच्छुकांनी कृपया माझ्या मो.क्र्.वर माहिती पाठवावी.

अरे, हा लेख सुटला वाचण्यातून. खरंच खूप चांगलं काम आहे हे. लग्नाआधी HIV test सक्तीची करण्यासाठी खरंच प्रयत्न व्हायला हवेत.
नवर्‍याच्या चुकीने आयुष्य उद्ध्वस्त झालेली बाई आणि त्यांची निष्पाप मुलं पाहून इन्टर्नशिपमध्ये फार कळवळायला व्हायचं. अस्वस्थ होऊन त्यादिवशी जेवायचं नाही वगैरे प्रकार व्हायचे. अर्थात त्याचा काहीच उपयोग नाही.
काम सोप्पं मुळीच नाही.....पण अशक्यही नाही.
हबा, मला कुठल्या पद्धतीने मदत करता येईल ? विपु केलीये. बघ.

कोण काहीही म्हणो, मी माझं रक्त दर ३ महीन्यांनी चेक करतो Happy
मी अगदी अलिकडे ७ डिसेंबर ला रक्त चेक केले.

गर्व से कहो हम HIV -Ve है Happy

ह. बा. आमच्यासाठी काहीही काम असेल तर अवश्य सांगा Happy

उत्तम उपक्रम. तुमचे काही पत्रक असेल तर मला पाठवा. इथे हैद्राबादेत महाराष्ट्र मंड्ळ मध्ये वधुवर सूचक मंड्ळ आहे तिथे देइन.

कोण काहीही म्हणो, मी माझं रक्त दर ३ महीन्यांनी चेक करतो
मी अगदी अलिकडे ७ डिसेंबर ला रक्त चेक केले.

गर्व से कहो हम HIV -Ve है

ह. बा. आमच्यासाठी काहीही काम असेल तर अवश्य सांगा ......

आपण काळजी घेवून एचायव्ही निगेटीव्ह आहात हे फार चांगलं आहे राज्या..... पण गर्व से कहो हम HIV -Ve है ... हे म्हणणे मला योग्य वाटत नाही.... कारण याचा अर्थ एचआयव्ही पॉझीटीव्ह असणे म्हणजे काही पाप केलेले असणे असे ध्वनित होतेय...... बर्‍याच एच आय व्ही ग्रस्तांना हा आजार आपल्या लग्नाच्या जोडीदाराकडून काहीही चूक नसताना मिळालेला असतो.... कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो... असो.

मी माझ्या दर वाढदिवसाला रक्तदान करतो..... म्हणजे आपोआपच माझे, HIV,Hbs Ag,MP,VDRL,HCV हे सगळं तपासलं जाते.

ही गोष्ट कायद्याने करण्यापेक्षा समाजजागृतीने करणेच योग्य आहे. म्हणजे लग्न जुळवताना वधु वरांनी परस्परांना आपण अनुरूप आहोत की नाही हे पहाताना रक्तगट व तत्सम गोष्टी तपासून पहाव्यात.
एचआयव्ही बाधित व्यक्तीला वाळीत टाकण्याचेच पुढचे पाऊल असे याचे स्वरूप होउ नये.(जसे एचायव्ही बाधित मातापित्यांच्या +/- मुलांच्या बाबत होताना दिसते, किंवा कुष्ठरोगाबाबत व्हायचे, अजूनही होत असेल.)
कुणाला एचायव्ही + व्यक्तीशी विवाह करायचा असेल, किंवा २ एचायव्ही + व्यक्तींना लग्न करायचे असेल, तर त्यावर बंदी आल्यासारखे होईल.
एचायव्ही बाधित व्यक्तीने आपला संसर्ग अन्य कोणास होणार नाही, याची काळजी मात्र घेतलीच पाहिजे, मग ती व्यक्ती विवाहित असो वा अविवाहित.

आपण काळजी घेवून एचायव्ही निगेटीव्ह आहात हे फार चांगलं आहे राज्या..... पण गर्व से कहो हम HIV -Ve है ... हे म्हणणे मला योग्य वाटत नाही.... कारण याचा अर्थ एचआयव्ही पॉझीटीव्ह असणे म्हणजे काही पाप केलेले असणे असे ध्वनित होतेय...... बर्‍याच एच आय व्ही ग्रस्तांना हा आजार आपल्या लग्नाच्या जोडीदाराकडून काहीही चूक नसताना मिळालेला असतो.... कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो... असो.

>>> दणदणीत अनुमोदन.

कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो... <<<
किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत? Uhoh

गजानन, HIV चं नक्की माहित नाही पण रक्त किंवा कंपोनंट्स चढवल्यानंतर हेपेटायटीस 'सी' वगैरे झालेले ऐकलेले आहेत. त्याचीही टेस्ट होतेच की रक्तदान झाल्यानंतर.

किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत
>> जर लोकं पैशाकरता शवागारातला बर्फ गुर्‍हाळात विकू शकतात, जखमांवरचा कापूस ब्लीच करून कान साफ करायचे बड्स करू शकतात, तर सेम लोक पैशाकरता/हलगर्जीपणानं काहीही करू शकतील असं वाटतं (करत असतीलच असं नाही.. पण शंका/भीती वाटतेच!)

कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो... <<<
किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत?
---- भारतात रक्त दात्याच्या रक्ताचे स्क्रिनींग होण्याचे प्रमाण किती आहे? सर्व ठकाणी, सर्व चाचण्यांच्या सुविधा अजुनही उपलब्द नसाव्यात - प्रश्न अर्थिक सुबत्तेचा आहे.

गर्व से कहो हम HIV -Ve है
---- या गर्वाची अवशक्ता नाही आहे. डॉ. च्या मताला दुजोरा.

बर्‍याच एच आय व्ही ग्रस्तांना हा आजार आपल्या लग्नाच्या जोडीदाराकडून काहीही चूक नसताना मिळालेला असतो.... कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो... असो.
>>> अगदी.

राज्या,
आपण दर तीन महिन्याला चेकिंग करता ही खरच आनंदाची बाब आहे. त्याबद्दल तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटणे रास्त आहे. पण डॉ. च्या म्हणण्यानुसार सर्वच पॉझिटीव वाल्यांची चूक असेल असेही नाही.

ह. बा. आमच्यासाठी काहीही काम असेल तर अवश्य सांगा ......>>> नक्कीच!!!

गर्व से कहो हम HIV -Ve है

>>>> अत्यंत फालतु , अन निषेधार्ह वाटले हे विधान ! नकळतपणेही हे असे सोशल डिस्क्रीमीनेशन होणार असेल तर सक्तीच्या चाचणीने "रोगाहुन पथ्य भंयंकर " असे काय म्हणतात ते होईल

मी माझ्या दर वाढदिवसाला रक्तदान करतो..... म्हणजे आपोआपच माझे, HIV,Hbs Ag,MP,VDRL,HCV हे सगळं तपासलं जाते

>>>> मस्त कल्पना ! जरुर आमलात आणली जाईल !

मी माझ्या दर वाढदिवसाला रक्तदान करतो..... म्हणजे आपोआपच माझे, HIV,Hbs Ag,MP,VDRL,HCV हे सगळं तपासलं जाते>>> डॉक्टर, पण रक्तदान केल्यानंतर ज्या चाच्ण्या केल्या जातात त्यांना त्याचे रिझल्टस कळत नाहित ना? की मिळतात रिपोर्ट्स?

चिमुरी, रक्तदानाच्या बहुतेक फॉर्म्सवर लिहिलेलं असतं की काही अ‍ॅबनॉर्मल रिपोर्ट्स आल्यास दिलेल्या पत्त्यावर्/इमेल अ‍ॅड्रेसवर्/फोनवर कळवातेत्/कळवू नये. आपण 'कळवावेत' असं टिक केलं आणि काही अ‍ॅबनॉर्मल निघालं तर कळवत असतील. मी जेव्हा जेव्हा रक्तदान केलंय तेव्हा कळवायला सांगितलं होतं पण अजून एकदाही काही कळवलं गेलं नाही म्हणजे सगळं नॉर्मल आहे असं समजून चालायचं.

वा, उत्तम उपक्रम आणि बरीच नवी माहिती मिळाली.

मी माझ्या दर वाढदिवसाला रक्तदान करतो..... म्हणजे आपोआपच माझे, HIV,Hbs Ag,MP,VDRL,HCV हे सगळं तपासलं जाते>>

डॉक्टर, रक्तदान करताना (करायच्या आधी) काय खबरदारी घ्यावी? आपण जाणकार असल्याने, तेही लिहिले तर अधिक चांगले...नाहीतर सदहेतुने रक्तदानाला जायचे आणि आपल्यालाच काहीतरी व्हायचे.

कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो... <<<
किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत? >>>

रक्त एच आयव्ही दूषीत आहे किंवा नाही याची चाचणी प्रत्येक रक्तपेढीने केलेली असते.... पण ही चाचणी ( एलायझा) एच आय व्हीची लागण झाल्यावर ३ ते सहा महिन्यात पॉझिटीव येते.... जर रक्तदान ह्या विंडो पिरियड मध्ये केलेले असले तर रक्त दूषीत असून सुद्धा चाचणी निगेटीव्ह येते.. व हे रक्त स्वीकारलेला काहीही चूक नसताना एच आय व्ही पॉझिटीव्ह बनतो. Sad

डॉक्टर, रक्तदान करताना (करायच्या आधी) काय खबरदारी घ्यावी? आपण जाणकार असल्याने, तेही लिहिले तर अधिक चांगले...नाहीतर सदहेतुने रक्तदानाला जायचे आणि आपल्यालाच काहीतरी व्हायचे

वेल... रक्तदाता रक्तदान करणेस योग्य की अयोग्य हे रक्तपेढीचे तंत्र ज्ञ व डॉक्टर ठरवतातच... आणि अश्या सुयोग्य रक्तदात्यास रक्तदानाने काहीही तोटा होत नाही...... Happy

Pages