एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.
"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"
याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.
यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.
कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.
अभिनंदन निल्सन! बाळाला
अभिनंदन निल्सन! बाळाला आशिर्वाद आणि शुभेच्छा !
अभिनंदन निल्सन! बाळाला
अभिनंदन निल्सन! बाळाला आशिर्वाद आणि शुभेच्छा! . डॉकचे सल्ले अगदी काटेकोरपणे पाळा. सगळे व्यवस्थित होवो ही देवाकडे प्रार्थना. >> +१.
दोन दिवस जरा गडबडीतच गेले
दोन दिवस जरा गडबडीतच गेले त्यामुळे इथे येणे झाले नाही तुमच्या शुभेच्छा साठी खुप खुप धन्यवाद
anilchembur - माहितीसाठी धन्यवाद डॉक्टर. काल बाळाला एक औषध दिले ते नेविरापिन होते का ते विचाराते ए आर टी सेंटरमधून नर्स आलेली. पण आज नाही दिले. हे नेविरापिन रोज देतात का? मी आज तिला विचारले तर तीने आता दिड महिन्यांनी या सांगितले.
दुध बाहेरील सुरू केले तिथल्या डॉक्टरांनी आईच्या दुधासाठी मनाई केली.
तुमचा फीडींग ऑप्शन काय आहे ?
तुमचा फीडींग ऑप्शन काय आहे ? मदर मिल्क की वरचे देणार आहात ?
मदरने किती दिवस ए आर टी घेतली आहे ?
नेविरापिन रोज द्यावे लागते.. सहा आठवड्यापर्यंत ... ( किंवा बारा आठवडे )
ओके ..... दूध / फीडिंग वरचे
ओके ..... दूध / फीडिंग वरचे देणार आहात . तर वरचेच द्या... आता मदर मिल्क अजिबात देउ नका.
ए आर् र् टी सेंटरमधून आली ती नर्स नसेल , ती ओ आर डब्लु असेल... आउट रीच वर्कर... ती घरी येऊन माहिती घेते व थोडेफार मार्गदर्शन करते. .. पण महत्वाचे निर्णय डॉक्टर / तुमचे फ्यामिली डॉक्टर याना विचारुन घ्यावेत.
दर पंधरा दिवसानी वैद्यकीय सल्ला महत्वाचा ... कारण मुलाचे वजनइतर लक्षणे यावर सतत लक्ष लागते
वजन सतत वाढत असल्याने दूध / टॉप फीड / औषधे यांचे प्रमाण त्यानुसार बदलावे लागते.
प्रेग्नन्सी / डिलिवरी / पोस्ट नेटल दुधातून या तीन मार्गानी बाळाला विषाणु जाउ शकतो.
जर आईने ए आर टी किमान २४ आठवडे घेतली असेल तर प्रेग्नन्सीतील ट्रान्स्मिशनचा धोका अगदी कमी रहातो.
डिलिवरी / सिजर हऑस्पिटलात केअर घेउनच करतात , त्यामुळे तोही धोका आता अगदी कमी झालेला आहे.
आता राहिला प्रश्न पोस्ट नेटलचा ... तुम्ही टॉप फीडिंगचा ऑप्शन घेतलाय , त्यामुळे तोही धोका आता कमी झालेला आहे. आता यापुढे दीड वर्ष ए आर टी सेंटर / पेडियाट्रिशन इ च्या मार्गदर्शनाखाली रहावे. दीड वर्शानंतर बेबीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला की बेबी निगेटिव्ह असल्याचे सिद्ध होईल.
पुर्वी मदर टू बेबी इन्फेक्शन व्हायचे प्रमाण २५ % होते.
आता ते अगदी एक दोन टक्क्यांवर आले आहे.
टॉप फीडिंग व्य्वस्थित काळजीपूर्वक करा... वाटी चमचा वापरणे , बाटली टाळा , स्वच्छ भांडी , स्वच्छ हात , द्दूध / इतर फूड प्रिपरेशन ताजे वापरा.
anilchembur, एच आय व्ही
anilchembur,
एच आय व्ही विषाणू तोंडातून ( उष्टं अन्न, लाळ, किसिंग इ.) शरीरात आला तरीही संसर्ग होऊ शकतो का?
HIV फक्त रक्त आणि लैगिक संबंधातूनच पसरतो असे वाचले होते. इतर मार्गातून त्याचा प्रसार होत नाही असे वाचले होते. तोंडातुन आलेला विषाणू अन्नपचनाच्या प्रक्रियेत नष्ट होतो. हे खरे आहे का?
तोंडात जखम किंवा व्रण असला तर
तोंडात जखम किंवा व्रण असला तर ट्रांसमीट होईल असे वाटते
लैंगिक संबंध , रक्त , दुषीत
लैंगिक संबंध , रक्त , दुषीत सुया , मातेपासून अर्भक हे चार मुख्य मार्ग आहेत.
रुग्णाचे रक्त , वीर्य , पू , मेंदूद्रव इतर कोणताही स्त्राव याद्वारे तो पसरू शकतो.. शौच , लघवी , थुंकी याद्वारे पसरत नाही , पण त्यात रक्त असेल तर पसरु शकतो.
वर मिक्स फीड देउ नkaa असे बोललो , ते का ?
१. माता + आहे .. बेबीला तिचे दूध देते. हे दूध मुलाला नैसर्गिक आहार असल्याने त्रासदायक नाही. पण दुधातून संक्रमण होण्याचे चान्सेस समजा १० % आहेत.
२. दुसरी एक + माता मुलाला तिचे दूध अजिबात देत नाही. वरचे दूध , बेबी फूड देते ... हे फूड पचायला कठिण असल्याने ते बेबीच्या आतड्यात सूक्ष्म इन्जुरीज करते... पण त्यात विषाणु नाहीत. संक्रमण चान्सेस शून्य.
३. तीसरा सिनारिओ .... मदर + ... दोन्ही मदर मिल्क + वरचे दूध मिक्स फूड दिले तर काय हॉईल ? कृत्रिम अन्न इन्जुरि करेल व मदर मिल्कमधला वायरस बेबीला इन्फेक्ट करेल... ट्रान्स्मिशन रेट दुप्पट तिप्प्ट होतो
....
....
अनिल चेंबूर, खूप उपयुक्त
अनिल चेंबूर, खूप उपयुक्त माहिती देत आहात
जामोप्या, तुम्ही जे
जामोप्या, तुम्ही जे स्पेशलायझेशन करताय त्याचा असा इथेही माहिती देण्यासाठी उपयोग करताय हे कौतुकास्पद आहे. तुमच्या पोस्टीन्मध्ये तुम्ही मिळवलेलं ज्ञान आणि कळकळ दिसून येते आहे. Thats like a good doctor and human being. Keep it up.
जामोप्या, तुम्ही जे
जामोप्या, तुम्ही जे स्पेशलायझेशन करताय त्याचा असा इथेही माहिती देण्यासाठी उपयोग करताय हे कौतुकास्पद आहे. तुमच्या पोस्टीन्मध्ये तुम्ही मिळवलेलं ज्ञान आणि कळकळ दिसून येते आहे. Thats like a good doctor and human being. Keep it up.
>>
+१
खरंच खुप चांगली माहिती दिली आहे आणि नीटपणे समजावून सांगितले सुद्धा
जामोप्या, तुम्ही जे
जामोप्या, तुम्ही जे स्पेशलायझेशन करताय त्याचा असा इथेही माहिती देण्यासाठी उपयोग करताय हे कौतुकास्पद आहे. तुमच्या पोस्टीन्मध्ये तुम्ही मिळवलेलं ज्ञान आणि कळकळ दिसून येते आहे. Thats like a good doctor and human being. Keep it up. +११११११११११
ए आर् र् टी सेंटरमधून आली ती नर्स नसेल , ती असेल... आउट रीच वर्कर.. > ओके.
पुर्वी मदर टू बेबी इन्फेक्शन व्हायचे प्रमाण २५ % होते. आता ते अगदी एक दोन टक्क्यांवर आले आहे. >>>>
जेव्हा मी बाळाच्या पुढच्या ट्रीटमेंटबद्दल विचारण्यास ए आर टी सेंटरमध्ये गेलेली तेव्हा तिथे ती ओ आर डब्लु आणि आणखी एकजण होती. जी दुसरी होती ती मला बोलली की 'बघ आधी बाळ नाही ठेवायचे बोलत होतीस ना आणि आता बाळाला बघुन कळलं ना की तुझा निर्णय चुकीचा होता' तेव्हा मी तिला बोलले की बाळ घरातील सगळ्यांनाच पाहिजे होते पण ते निगेटिव्ह असेल की नाही याबद्दल शाशंक होतो म्हणुन तो निर्णय घेतलेला. यावर ती' पहिली ओ आर डब्लु त्या दुसरीला बोलली की 'आता ह्या नविन डिलेव्हरीत ना बहुतेक पॉझिटिव्ह्च असतात मुले
वाटी चमचा वापरणे , बाटली टाळा
वाटी चमचा वापरणे , बाटली टाळा >> मग काय वापरायचे? आम्ही वाटी चमचा, बाटलीच वापरतोय पण पाण्यात उकळवून घेऊन. स्वछतेबद्दल वहिनीला समजावून सांगितले आहे त्यासाठी लागणार्या वस्तुपण दिल्या आहेत. पण सध्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिथे खुप हेळसांड होत आहे. बाळाला जन्म झाल्यावर तसाच वहिनीकडे दिला त्याला अंघोळ सोडा पण साध्या पुसण्याचे कष्टपण तिथे घेतले नाहीत
बाळासाठी दुध बनविण्यासाठी गरम पाणी बनविण्याची पण सोय नाही.
निल्सन, ते "वाटी चमचा वापरा.
निल्सन, ते "वाटी चमचा वापरा. बाटली वापरू नका" असं आहे.
निल्सन, ते "वाटी चमचा वापरा.
निल्सन, ते "वाटी चमचा वापरा. बाटली वापरू नका" असं आहे. >> ओके.
निल्सन, सगळे ठिक होईल. बाळाला
निल्सन,
सगळे ठिक होईल. बाळाला आशिर्वाद आणि शुभेच्छा
अभिनंदन निल्सन! बाळाला
अभिनंदन निल्सन! बाळाला आशीर्वाद आणि शुभेच्छा!
"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय
"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"}}}} ह.बा. जी तुमचा मुळ उद्देश अतिशय चांगला आहे पण तो प्रभावी रित्या यशस्वी होण्या करिता पूर्ण लग्नविधि ची प्रोस्सेसच कायद्याने बदलावी लागेल, म्हणजे बघा ह आपल्याकड़े आधी 1 ) ओळखीतुन लग्न जमवल जातं 2) लग्न होतं हनिमून साजरा होतो आणि मग 3) सर्टिफिकेट साठी अर्ज केला जातो ही प्रोसेस 1) वयाच्या दाखल्या बरोबरच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट HIV टेस्ट सहित gov. हॉस्पिटल कडून लग्नासाठी noc मिळण (हिच स्टेज प्रथम आणि याच साठी कायदा झाला पाहिजे) 2) लग्न जुळवणे 3) सर्टिफिकेट 4) लग्न आणि हनीमून या प्रकारे झाली पाहिजे तरच या कायद्याने मुळ उद्देश साधला जाईल.
"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय
"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"}}}} ह.बा. जी तुमचा मुळ उद्देश अतिशय चांगला आहे पण तो प्रभावी रित्या यशस्वी होण्या करिता पूर्ण लग्नविधि ची प्रोस्सेसच कायद्याने बदलावी लागेल, म्हणजे बघा ह आपल्याकड़े आधी 1 ) ओळखीतुन लग्न जमवल जातं 2) लग्न होतं हनिमून साजरा होतो आणि मग 3) सर्टिफिकेट साठी अर्ज केला जातो ही प्रोसेस 1) वयाच्या दाखल्या बरोबरच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट HIV टेस्ट सहित gov. हॉस्पिटल कडून लग्नासाठी noc मिळण (हिच स्टेज प्रथम आणि याच साठी कायदा झाला पाहिजे) 2) लग्न जुळवणे 3) सर्टिफिकेट 4) लग्न आणि हनीमून या प्रकारे झाली पाहिजे तरच या कायद्याने मुळ उद्देश साधला जाईल.
जामोप्या, हे सगळे एका वेगळ्या
जामोप्या, हे सगळे एका वेगळ्या ठिकाणी प्लीज संकलित करुन लिहा ना. सध्या हा विषय मागे पडल्यासारखा वाटतोय आणि माध्यमात काही वाचायला मिळत नाही.
अनिल रामचंद्र, सर्टिफिकेत
अनिल रामचंद्र,
सर्टिफिकेत मिळाले म्हणजे ती व्यक्ती HIV फ्री आहे असे नाही, टेस्ट करण्याच्या कालावधीत ती विंडो पिरियड मध्ये असू शकते,
तयामुळे ६ महिने अंतरावर २ टेस्ट करायला लागतील, तरच खात्रीपूर्वक स्टेट्स सांगता येईल.( अझूमिंग या ६ महिन्यात काही एक्सपोझर झाले नसेल.
म्हणजे स्टेप २)लग्न जुळवणे ३) सर्टिफिकेट घेणे ४) दोघांना वेग वेगळे कइंदून ठेवणे ६ महिन्या साठी ५)परत टेस्ट करणे ६) निगेटिव्ह आली तर लग्न करणे
अय्यो, कुणी कुणाशी लग्न करणार
अय्यो,
कुणी कुणाशी लग्न करणार हे कायदा ठरवणार का अनिल रामचंद्र?
मला हे अज्जिबात पटलेले नाही.
म्हणजे एच आय वी पॉझिटीव व्यक्तीने लग्नच करू नये असं कायदा ठरवू नाही शकत. किंवा कुठल्याही मेडिकल फिटनेसचा आणि लग्नाचा संबंध आहे असे कायदा नाही ठरवू शकत. (इंपोटन्सी या इश्यूवर डिवोर्स मिळू शकतो. पण इंपोटंट लोकांनी लग्न करू नये असे कायदा नाही म्हणू शकत.)
एक नैतिकता म्हणून आपण असे म्हणू शकतो.
कायद्याने नाही.
मुला/मुलीची फसवणूक होऊन जोडीदार एच आय वी बाधित असल्यामुळे बिचारा/बिचारीच्या जीवावर बेतलंय अश्या कित्येक केसेस पाहिलेल्या असूनही लग्नासारख्या बाबतीत लग्न करायचा अधिकार कुणाला असावा कुणाला नको हे कायदा नाही ठरवू शकत.
कारण कायदा उलट माणसामाणसांत फरक करू नका असे शिकवतो.
पूर्वी एच आय वी रूग्णांकरिता वेगळा वार्ड किंवा सरकारी रूग्णालयांत व्हरांड्यातली खाट असा मामला असे.
तसे करू नये असे कायद्याने स्पष्ट केले आहे.
असे असताना लग्नासारखा नागरिक अधिकार कायदा केवळ एखादा आजार आहे म्हणून नाकारू शकत नाही.
टेस्ट कंपल्सरी करा म्हणू शकता.
एकवेळ मान्य.
पण निगेटीव्ह आली तरच लग्नाला सरकारी परमिशन मिळेल असे म्हणणे चूक.
तो त्या जोडप्याचा पूर्णतः वैयक्तिक प्रश्न आहे.
सिंबा- सहा महिने दोघांना वेगवेगळीकडे ठेवा म्हणताय की वेगवेगळे कोंडून ठेवा म्हणताय? काही कळंना गेलंय बघा.
कोंडून ठेवा म्हणजे ६ महिन्यात
कोंडून ठेवा म्हणजे ६ महिन्यात एक्सपोझर होऊ नये, दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली तर खात्रीने निगेटिव्ह म्हणता यावे.
वायले वायले ठेवा , म्हणजे भूल कोई उन्से ना.. हो जाये.... म्हणून म्हंटले वेग वेगळे कोंडून ठेवा
निल्सन बेबी कसे आहे ?
निल्सन बेबी कसे आहे ?
1 दिसेम्बर जागतिक एड्स दिन
1 दिसेम्बर जागतिक एड्स दिन आहे
सगळे कसे आहेत ? मदर बेबी ?
सगळे कसे आहेत ? मदर बेबी ? बेबीची 18 म ची तपासणी केली होती ना, कसा आहे रिपोर्ट ?
Sorry sir, मेसेज पाहिले
Sorry sir, मेसेज पाहिले नव्हते.
भावाची, बाळाची दोघांच्याही सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या.
बाळ आता पाच वर्षाचे होईल
सॉरी, खरं म्हणजे मी आधीच प्रतिसाद द्यायला हवा होता काय झाले त्याचा परंतू काही कारणामुळे राहून गेले ते राहूनच गेले.
धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे
धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे ज्यांनी भाऊ व त्याच्या बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
डॉक्टर साती आणि Anilchembur-Blackcat तुमचे खूप आभार. तुमचे मार्गदर्शन उपयोगी आले.
छान
छान
2030 अखेर एच आय व्ही समूळ नायनाट असे आरोग्य खात्याचे टार्गेट आहे.
बाळ व्यवस्थित आहे , हे ऐकून बरे वाटले.
आता इन्फेक्टेड मदरला पॉझिटिव्ह बेबी होण्याचे प्रमाण शून्य झाले आहे.
Pages