मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिरेकी कारवाईचा मनापासून निषेध........ अत्यंत वाईट घटना...... नकळ्त डोळ्यात अश्रू आणणारी कृती......

हे मात्र सर्वांनाच मान्य असेल की..

अशिक्षीत जनता दबाव किंवा लाच यांना भरी पडून मतदान करते आणि सुशिक्षीत मतदानाची सुट्टी एन्जॉय करायला जातात, मतदानाला नाही...

अर्थात मतदान जरी केले तरी एकही उमेदवार लायक नसेल तर काय करणार?? यांपैकी कोणीही नाही असा पर्याय द्यायला हवा आणि असा पर्याय निवडणार्‍यांची संख्या ५० ६० % च्या पुढे गेली तर फेरमतदान करण्यात यावे तरच या राजकीय परिस्थितीवर उपाय केला जाउ शकतो.

अर्थात सरकारचीच सर्व जबाबदारी असते असे नाही, नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी असते.. हे अतिरेकी रेशन कार्ड, मोबाईल पासपोर्ट या गोष्टी कशा मिळवू शकतात तर चिरीमिरी देउन.. जर निदान आपण या सर्व क्षेत्रात या गोष्टी रोखल्या तरी मदत होउ शकते...

बी,
आपल्या कर्त्यव्यांप्रती जागरुक राहने म्हणजे काय हे मी सांगू शकत नाही. (कदाचित ते रक्तातच असावे लागते बहूतेक). (इथे मला मागे, लालू ने लिहीलेले वाक्य आठवते, "जागरूक माणूस नेहमीच जागरु़क असतो" लालू तूझे वाक्य इथे परफेक्ट लागु होते. )

अमरिकन जनतेने शॉक बसन्यापुढे काही केले नाही, पण ते त्यांचा हक्काप्रती जागरुक आहेत, त्यानंतर जी देशप्रेमाची लाट उसळली ती भूतो ना भविष्यती होती. आज जागरुक की उद्या रिझल्ट नसतो, ते आधीच जागरुक आहेत्, स्वतचा देशा बद्दल अतिव प्रेम करनारे आहेत. त्यामूळे सरकारने आपोआपच अफगाणवर हल्ला केला. आजही ९-११ ह्या दिवशी लोक तिथे जमुन रडतात. एवढा त्याचा परिनाम आहे. १९९३ चे स्फोट कूठे कूठे झाले हे आपल्या पैकी फक्त १० टक्क्यांना सांगता येईल. बाकीचे विसरुन गेले, कारण किती बॉम्ब स्फोट लक्षत ठेवतील. रोज मरे त्याला कोन रडे. हा त्यांचात आणी आपल्यात फरक.

आपल्याला कोणावरही हल्ला करायची जरुरत नाही, फक्त घरातला कचरा साफ करायची गरज आहे.

कूल, अगदी बरोबर. मागे मतदानावर चर्चा चालू असताना मीही हाच मुद्दा मांडला होता. गेली १३-१४ वर्ष मी मतदानावर बहिष्कार घातला आहे. तो ह्याच कारणासाठी की कोणीही लायक उमेदवार नव्हता. आपण सर्वसामान्य जनता दगडापेक्षा वीट मऊ म्हणत एका उमेदवाराला मत देतो. तोच पुढच्या वर्षा-दोन वर्षात दगडापेक्षा टणक होतो. त्याचा राजकीय पक्ष कोणताही असला तरी ह्यात काहीच फरक पडत नाही. ह्याला पर्याय एकच की लायक उमेदवार नाही असा पर्याय मतपत्रिकेत असावा......

प्रश्न तिथे आहे.
अज्जुका - वरचे माझे पोस्ट थोडे बदलले, तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यात आले असावे. आपला कंदाहरचा अनुभव ताजा आहे, त्यांच्या कुठल्याही माग्ण्यांना भिक नको घालायला.

निषेध निषेध निषेध........निषेध
निरअपराध लोकांवर गोळ्या आणि बॉबचा वर्षाव करणार्या आतिरेक्यांचा निषेध
नागरीकांच्या सुरक्षेला बेजवाबदार सरकारचा निषेध

केदारला अनुमोदन.. कचरा साफ करण्याची गरज आहे खरंच .. आपण जर एका अतिरेक्याला फाशी देउ शकत नाही तर अतिरेकी हल्ला होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही

>त्यावर हिंदूंनी त्यांचावर अत्याचार केले म्हणून हा हल्ला असा मसुदा आहे. टोणग्या जरा प्रकाश पाड बार, आपण त्यांचा वर काय अत्याचार केले ते?
केदार,
तू कुणाच्या तोंडी लागतोयस....? आणि आत्ता ती वेऴ नाही...
या हल्ल्यामागे बरेच हेतू/फार मोठे कांड आहे:
१. भारतात हिन्दू मुसलमान दंगे पुन्हा एकदा घडवून आणणे,
२. लोकात घबराट पसरवणे, international level वर मुम्बै व भारताबद्दल संशय निर्माण करणे
३. भारताच्या विकासाला अशा मार्गाने खिळ घालणे
४. एकंदरीत सरकार व व्य्यवस्थेबद्दल सामाजिक अविश्वास निर्माण करणे
५. इतर मूळ मुद्द्यांपासून लक्ष विचलीत करणे
६. असे अन इतर बरेच काही...

आता कमांडो, मिलीटरी वगैरे घुसवून गोळीला उत्तर गोळीने देता यईल पण long term solution हवे असेल तर या विचारप्रणालीला तशाच जहाल विचारप्रणालीने उत्तर द्यावे लागेल. this is clear failuer of intelligence more so of its approach. आपले मांजर अजूनही या उन्दरांच्या मागे धावते आहे, एक पाऊल आधीच पुढे असायला हवे. अमेरिकेशी आटापिटा करून आणु करार करणार्‍यांनी निदान अमेरीकेचे हे तरी शिकावे... कितीतरी उदाहरणे आहेत, इस्राइल सारख्या छोट्या देशाचे उदाहरण आहे.. भारताकडून ठोस कृती आवश्यक आहे तरच international level वर आपल्या विचारांची किम्मत होईल्..अन्यथा UN security counsil seat वगैरे ही फक्त गाजर आहेत. आपण आपल्या बळावर अन ताकदीवर या अतिरेकांन्ना त्यांच्या राज्यात घुसून मारू शकतो.. हा मेसेज जोपर्यंत पोचत नाही तोवर कुणीही सोम्या गोम्या हातात ak47 नाचवून काही काळ इथे अनेकांन्ना वेठीस धरू शकतो. सापाला त्याच्या बिळात हात घालूनच ठेचायला हवा, आपले राजकारणी मतांच्या पुंग्या वाजवत या सापना दूध पाजत आहेत. There needs to be a solid exmaple set forth by India once for all...
मनमोहनराव सन्ध्याकाळी राष्ट्राला काय सन्देश देतात पाहुया (सन्देशाची गरज त्यान्ना जास्त आहे!)... पुन्हा एकदा "अमन शांती बनाये रखे" वगैरे असली भाषा "वाचून" दाखवणार असेल तर याना आता "उचलायची" वेळ आली आहे. (या हमल्यात एखादा big b, एखादा मुख्यमंत्री, एखादा क्रिकेटवीर, एखादा king khan दगावला तर कुठले compensation दिले असते? सामन्य मनुष्य मेला की अमन शांती? )

शा.... इतकी वाईट परिस्थिती तर समर्थान्नी आई भवानिला साकडे घातले तेव्हाही नव्हती...

भारत सरकार मधे एक तरी पुरूष शिल्लक आहे काय? चन्द्रावर याने सोडणार्‍या आमच्या आदरणीय कलाम साहेबान्ना अन न्युक डील साठी जंग जंग पछाडणार्‍यान्ना एव्हडेच विचारू इच्छीतो, भवानी रूपी तलवार हातात आहे पण ते वापरण्याचे मनगट यांच्याकडे आहे काय? नसेल तर त्या सिंहासनावरून उतरा अन मावळे म्हणून राज्याची सेवा करा. तुम्हाला अग्नीपंख आहेत पण ऊडण्याचे धाडस अंगात नाही..

यांच्या नाकर्तेपणाचा त्रिवार निषेध!

लिम्ब्या,
अगदी अगदी!!!!! च्यामरी अस वाटत उठाव अन एकेक अतीरेक्याला नारळासारखा सोलून काढावा मग भले आपले चार मेले तरी चालतील... मला वाटत प्रत्त्येक भारतीयाने इतके "जहाल" होण्याची वेळ येवून ठेपली आहे.

भवानी रूपी तलवार हातात आहे पण ते वापरण्याचे मनगट यांच्याकडे आहे काय?>>>
Well said Yog! अनुमोदन!

योग जपुन. तूला येथील "अति सोवळे" लोक अतिरेकी म्हणतील, प्रचारक म्हणतील आणि आपाआपसात चर्चा करतील. खास करुन तूझ्या शेवटच्या वाक्याला. आपल्या आवडल बॉ ते वाक्य अन पोस्ट दोन्ही.

"मी बॉम्ब फोडत नाही, मी तो फोडलेला खपवून घेणार नाही" असे आता शेगांच्या ऐवजी म्हणावे लागनार आहे.

म्हणजे भारतातील सामान्य जनता जागरुक नाही आणि जागरुक वृत्ती त्यांच्या रक्तात नाही. निदान बहुसंख्य भारतीयांच्या तरी.

भारतातील सामान्य जनता घरातील कचरा कसा काढू शकेल, केदार, कूल?

योग, केदार - अनुमोदन. आता सामान्य जनतेने सतर्क राहुनच ह्या अतिरेक्यांना विरोध केला पाहिजे. कोणी घरभेदी अतिरेक्यांना मदत करत आहेत का ह्यावर पाळत ठेवली पाहिजे. मुख्य म्हणजे जनतेने एकत्र येऊन राजकारण्यांवर दडपण आणलं पाहिजे की तुमची आपापसातली साटीलोटी आता थांबवा आणि ठोस पाऊल उचला अन्यथा जनता कोणत्याही पक्षाला सरकार स्थापू देणार नाही वा सत्तेवर टिकू देणार नाही..

बी,
एक मार्ग तर योग ने सुचवलाच आहेत.. जोडीला इतरही गोष्टी आहेतच.. जाब विचारा तुम्ही मत देता त्यांना.. आणि तथाकधीत देशभक्त पत्रकारांना.. एक ई-मेल लिहुन प्रत्येक वृत्तवाहिन्यांना पाठवा.. परत परत पाठवा आणि त्यांना कळूद्या की अतिरेक्यांचे इमेल वाचण्यापेक्षा हे वाचत जा म्हणावं..

कूल, तुम्ही सुचवलेले पर्याय खूपच कमी झालेत. एक दोन पर्याय आणि ढीगभर गांजलेली जनता. कसे शक्य आहे?????

केदार, योग

तुमची पोस्ट वाचुन रक्त अगदी उसळत आहे. खुप वेळा वाटत, अस काय होणार आहे ६० वर्षे जगुन. चार मारावे आणि मराव.

जे हे धाडस करु शकले त्यांचा हेवा वाटतो.

कुल,सरीवीना ...
मतदानावर बहिष्कार हा योग्य मार्ग नाही रे. आपणच असे म्हणायला लागलो तर बदल अश्यकच आहे.
केंद्रात काँग्रेस पेक्षा भाजप सरकार कितीतरी पटीने चांगले होते. सलग २०-२५ वर्षे संधी मिळायला हवी. बदल जरुर दिसतील. विचार तर करुन बघा.

We want all Mujahideen released: Terrorist inside Oberoi

आरती, मतदानावर नुसता बहिष्कार नाही म्हणत मी. तर उमेदवार लायक नाही हा पर्याय असावा आणि त्यायोगे प्रत्येक राजकीय पक्षावर असा दबाव टाकावा की योग्य उमेदवारच उभा केला जाईल. नाहीतर कधी दगड कधी वीट असेच लोक आपला देश चालवतील. मग आपली वाटचाल अशीच चालू रहाणार..

अतिशय दुखदायक स्थिती आहे. भितीने मन भरलेले आहे.

बरेच प्रश्ण अनूत्तरीत रहातात मिळालेल्या माहीतीवरून. हे सर्व टेररीस्ट घुसलेच कसे इतक्या well-known places like Taj, Oberoi मध्ये? security camera CST station वर असताना कसे काय कोणाला काहीच दिसले नाही? कोणी लोकल भारतीय होते involve ह्याच्यात का? पोलीसांची गाडी पळवली गेलीच कशी?.............

.............

ह्या सर्व दहशतवादीचा अंत कसा होणार?.....

खरंय पण, आज बातम्या पाहताना असंच वाटत होतं अजून किती दिवस आपण फक्त बातम्या पाहणार? रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अतिरेक्यांशी चार हात करायची वेळ आली आहे.

~~~~~~~~~

१९९३ चे स्फोट कूठे कूठे झाले हे आपल्या पैकी फक्त १० टक्क्यांना सांगता येईल. बाकीचे विसरुन गेले, कारण किती बॉम्ब स्फोट लक्षत ठेवतील. रोज मरे त्याला कोन रडे. हा त्यांचात आणी आपल्यात फरक.
--- केदार १०% पण जास्तच झाले.

अमेरिकेत एकच हल्ला झाला त्यामुळे त्यांच्या तो चांगलाच लक्षात रहातो (दुसरा हल्ला का नाही झाला हा भारतीयांना अभ्यासाचा विषय आहे), आपले तसे नाही आहे. १० ते २० बाँब च्या 'साखळ्या' मोठ्या शहरात झाल्या आहेत, अशा अनेक साखळ्यांना आपण Sad सामोरे (करणार काय) गेलो आहे. एकुण स्फोट १०० पेक्षा जास्तच असतील, पैकी एकाचाही (तपास ते आरोपींना शिक्षा त्याचा अंमल) संपुर्ण छडा अजुनही लागलेला नाही. त्यामुळे फरक हा असणारच. आपल्या भावना या बोथट (१ आणि १०० फरक) झालेल्याच आहेत हे कटू मान्य करायला हवे.

आपण आपल्या निवडलेल्या खासदारांना किती वेळा विचारतो ह्या प्रश्नाचा ते लोकसभेत कसा/ किती पाठपुरावा करतात. बिहारच्या ५ खासदारांनी त्यांच्या राज्याच्या लोकांसाठी लोकसभेचा राजिनामा (public stunt आहे हे मान्य) दिला. महाराष्ट्राच्या ४८ (पैकी ६ मुंबईचे) खासदारांनी मुंबईसाठी काय केले? त्यांना पुन्हा-पुन्हा निवडून देणारे आपणच.

कालच आलेला एक इमेल...

Section 49-O of the Constitution

Did you know that there is a system in our constitution, as per the 1969 act, in section "49-O" that a person can go to the polling booth, confirm his identity, get his finger marked and convey the presiding election officer that he doesn't want to vote anyone!

Yes such a feature is available, but obviously these seemingly notorious leaders have never disclosed it. This is called "49-O".

Why should you go and say "I VOTE NOBODY"... because, in a ward, if a candidate wins, say by 123 votes, and that particular ward has received
"49-O" votes more than 123, then that polling will be cancelled and will have to be re-polled. Not only that, but the candidature of the contestants will be removed and they cannot contest the re-polling, since people had already expressed their decision on them. This would bring fear into parties and hence look for genuine candidates for their parties for election. This would change the way, of our whole political system... it is seemingly surprising why the election commission has not revealed such a feature to the public....

Please spread this news to as many as you know...Seems to be a wonderful weapon against corrupt parties in India... show your power,expressing your desire not to vote for anybody, is even more powerful than voting... so don't miss your chance. So either vote, or vote not to vote (vote 49-O) and pass this info on...

उदय, संवेदना बोथट नाही झाल्यात. कृती शून्य होती.. ती तशीच राहीली. हळहळ व्यक्त करणारे, निषेद नोदंवणारे, उपदेश करणारे, उपाय सुचवणारे अनेक दिसतात पण आपणहून युद्धात उतरणारे दिसत नाहीत. बहुतेक तिथे जाण्याचा मार्ग ठावूक नसावा.

साधना, ही खुपच चांगली माहिती दिलीस तू.

बेबी, खरच हा कायदा माहिती नव्हता मतदानाबद्दलचा. पण असे करुनही जर आपले मत नाही पोचले तर!!! कारण आपल्या देशात मत मोजणीतही बराच गोंधळ असतो. तिथेही खोटा कारभार असतोच की.

रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अतिरेक्यांशी चार हात करायची वेळ आली आहे.
--- पोलीसांच्या हाता बाहेर परिस्थिती आहे. लष्कर, नेव्ही, NSG चे कमांडोज लढत आहेत.

पैशाची ransom मागणि केली आहे असे रेडिफ वर आले आहे, पण आबांनी तशी काही मागणि पुढे आलेली नाही असे म्हटले.

खासगी कंपनीतर्फे राहिल शेख लंडनला गेल्याचे उघड

पुणे, ता. २६ - "इंटरपोल'ने लंडनमध्ये बर्मिंगहॅम विमानतळावर अटक केलेला राहिल शेख ऊर्फ महंमद राहिल अत्तारउल रहमान शेख (२५) हा पुण्यातील नगर रस्त्यावरील एका खासगी कंपनीच्या माध्यमातून जानेवारी २००६ मध्ये लंडनला गेला होता, असे आढळून आले आहे.
मुंबईतील उपनगरी रेल्वेत ११ जुलै २००६ रोजी झालेल्या बॉंबस्फोट मालिकेतील आरोपींना अर्थसाह्य केल्याचा राहिलवर आरोप आहे. मुंबई पोलिसांनी त्याला फरार घोषित केले असून, त्याच्यासाठी जगभर "रेड कॉर्नर' नोटीसही बजावण्यात आली होती.

राहिल शेख मूळचा पुण्याचा आहे. फैजल रहमान व मुजम्मील रहमान या त्याच्या दोन भावांना बॉंबस्फोटप्रकरणी यापूर्वीच अटक झाली आहे. राहिलचे आई-वडील काही वर्षांपासून मुंबईत राहतात. येथे कोंढव्यात "कुबेरा गार्डन' या सोसायटीत त्यांची सदनिका आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती बंद आहे. अधूनमधून तेथे कोणीतरी येतात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. राहिलने बनावट कागदपत्रांद्वारे नगर रस्त्यावरील एका कंपनीत नोकरी मिळविली होती. तेथून २००६ मध्ये तो लंडनला गेला होता. त्यानंतर तो पुण्यात परतलेला नाही. याच बॉंबस्फोटांचा सूत्रधार रिज्वान डावरे याच्याशी तेथे तो संपर्कात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. अहमदाबाद व दिल्ली येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटांतील काही आरोपींशी राहिलचा संबंध आहे का, याचाही पोलिस तपास करीत आहेत. त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पुण्यातील सूत्रांकडून मिळाली.

*************************
ही बातमी पहा ई-सकाळ मधली. पैशासाठी लोक कोणत्या स्तरावर जाऊ शकतात पहा. म्हणजे कॉर्पोरेट्स ही मदत करतात अशी हे किती भयप्रद आहे..

बापरे.
मुळात आपल्याकडे वैयक्तिक ओळख नंबर असायला हवा. प्रत्येक नागरीकासाठी. रेशन कार्ड नव्हे. खूप गोष्टी बदलतील.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ऍशबेबी, कुल ने मान्डलेल्या पर्यायच हवा, कारण उघडपणे "मला कोणालाच मतदान करायचे नाही" हे सान्गणे हा देखिल "गुप्ततेचा" भन्ग होत नाही काय? दहशतीच्या वातावरणात कोण अन कितीजण असे उघडपणे सान्गायचे धाडस करतील? असो, या बीबीचा विषय नाही तो

मला वाटते की या सर्व कालखण्डात पोलिस किन्वा लष्करावर अविश्वास दाखविण्यात मला अर्थ वाटत नाही! ते खर तर हुकुमाचे ताबेदार! उलट त्यान्चे मनोधैर्य कसे टीकुन राहील हे बघितले पाहिजे! Happy व त्यान्ना योग्य तेच हुकूम दिले जातिल याबद्दल जनतेचा दबाव वाढला पाहिजे.

काल/आज मुम्बईत रक्तरन्जित धिन्गाणा घालत असलेल्या दहशतवाद्यान्चे पाठीराखे नक्कीच सापडू शकतील! किम्बहुना मुम्बई पोलिस व लष्कराच्या हालचाली त्या दृष्टीने केव्हाच सुरू झाल्या असतील. ज्या बोटीतून ते आले, त्याची प्रवासाच्या अन्तराची इन्धनक्षमता, त्यावरून जास्तित जास्त किती अन्तरावरुन ते निघाले असतील, ती वेळ व ठिकाण यान्चा अन्दाज, बोटीचा मेक, सापडलेल्या अतिरेक्यान्ची योग्य चौकशी वगैरे असन्ख्य उपाय ते योजत असतील, आपण त्यान्ना सुयश चिन्तुया
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मतदान अवश्य करायला हवे यात शंका नाही.. प्रश्न येतो तो फक्त लायक उमेदवार नसतांना.. मला अमुक एका पक्षाची ध्येयधोरणे पटत असतील तरी त्यांनी माझ्या परिसरात दिलेला उमेदवार पटेलच असे नाहि आणि म्हणूनच नकाराचा अधिकार असला पाहिजे..

गम्मत म्हणजे वर ज्या ४९-ओ या संविधानातील कायद्याचा उल्लेख आला असा काहिही कायद अस्तित्वात नाही असे माझ्या लक्षात आहे. भारताचे संविधान या लिंकवर बघायला मिळते..

आता बातम्या येणे बंद झाले आहे का? कुठल्याही साईटवर नविन बातमी दिसत नाहिये..??

काही अपडेटस??

Pages