Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34
हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्यांसाठी आहे
शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल 
आपल्याला आवडणार्या, माहिती असणार्या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी म्हणतो, एव्हढी कटकट करून
मी म्हणतो, एव्हढी कटकट करून शेपू खायला कुणि सांगितले आहे? बाजारात इतर बरेच काही काही मिळते, ते खावे.
उगीच आपले जपानमधे मिळत नाही, अमेरिकेत त्याला काय म्हणतात? कांद्याचे काय करायचे?
त्यापेक्षा पालक, पातीचा कांदा या दोनच पालेभाज्या आलटून पालटून कराव्यात. शिवाय इतरहि बर्याच भाज्या आहेत, उसळी आहेत. आणि कांदे बटाटे तर आहेतच आहेत! नाहीतरी सगळ्यात भरपूर तेल नि मसाला टाकला की सगळ्याच्या चवी त्याच!
कॉलेजात एकदा महिनाभर होस्टेलची मेस लावली होती. जेवायला गेल्यावर प्रथम आपला कांदा येई. कारण असे की भाजी कुठलीहि असली तरी चव सारखीच असते, नि कांदा घातल्याशिवाय खाववत नाही.

लाँग लिव्ह झक्की बोवाजी !!
लाँग लिव्ह झक्की बोवाजी !! कांदा सत्यम जगन्मिथ्या !
अरे बापरे केव्हढी ही चर्चा
अरे बापरे केव्हढी ही चर्चा ... इथे तिथे फ्लेवर म्हणुन जरी नाही आवडत तरी, मला पण शेपू ची भाजी आवडते .. मुगाची डाळ, लसुण परतुन घातलेली
मी आजपर्यंत शेपु कधीच खाल्ला
मी आजपर्यंत शेपु कधीच खाल्ला नाही. आज दोन तास ड्राइव करुन कॅन्सास सिटीहुन खास शेपु आणला आहे,इथल्या पोस्ट वाचुन. आता दोन्-तीनदा भाजी करणार इथल्या रेसिपीज घेउन...
शेपुची भाजी मला पण आवडते ,
शेपुची भाजी मला पण आवडते , फक्त दातात अडकते , पण तेवढं चालतं , कारण दातात अडकल्याशिवाय शेपु खाल्यासारखं वाटत नाही.
कुणी कारले फॅन क्लब चालु करणार का ? मी भरलेल्या कारल्यांचा पण फॅन आहे .
काल केली होती भाजी.
काल केली होती भाजी. मैत्रेयीची रेसिपी घेउन. मलातर आवडलीच माझा सहा वर्शाचा मुलगादेखिल आवडीने खाल्ला.
आणि मुलीने बळजबरीने ताटातली संपवली. तिला आणि मुलाला फक्त ग्रीन भाजीच आहे म्हणुन सांगितले होते.
मलाही शेपू अवडू लागलाय,
मलाही शेपू अवडू लागलाय, खिम्यात घातलेला खाल्ला तेव्हापासून. फक्त माझ्या ताटात येताना तो खिम्यासह यावा हि प्रार्थना.
अरे त्यात चर्चा काय करायचीय.
अरे त्यात चर्चा काय करायचीय. ? शेपू आहेच उत्तम आणि अॅरोमॅटिक भाजी. अधिक शेपू पिकवा !
असुदे हाऊ अबाऊट , शेपु मुर्ग
असुदे हाऊ अबाऊट ,

शेपु मुर्ग मखनी
शेपु चिली चिकन
शेपु बटर चिकन
शेपु फिश फ्राय
शेपु मटन फ्राय
शेपु चिकन बिर्यानी
शेपु चिकन टिक्का मसाला
टू मच श्री
टू मच श्री
हे तो "श्रीं"ची इच्छा
हे तो "श्रीं"ची इच्छा
श्री आणि असुदे, उगाच शेपू
श्री आणि असुदे, उगाच शेपू बाटवू नका...
मी पण कालंच खाल्ला शेपू, आज वर आला बाफ, लगेच परत खावासा वाटतोय.
आठवड्यातून २-३ वेळा सहज खाऊ शकते मी.
कालच्या भाजीत निधप ने सांगितल्याप्रमाणे थोडा गुळ घातला होता... आहाहा!
निधप - जियो...
शेपूssssssssssss........
शेपूssssssssssss........ यम्मी! डाळ आणि कांदा घातलेली शेपूची भाजी आणि भाकरी काय लागते..... सही..... ! पंचपक्वान्न झक (या शब्दाबद्दल क्षमस्व) मारतात त्याच्यासमोर......
दक्षे, मी पण आठवड्यातले ७ही दिवस ही भाजी दोन्ही वेळा खाऊ शकते
इराआ पुरनिक.
इराआ पुरनिक.
>>डाळ आणि कांदा घातलेली
>>डाळ आणि कांदा घातलेली शेपूची भाजी आणि भाकरी
अहाहा...खरच यम्मी!!!
ही रेसीपी नक्की आवदेल.
ही रेसीपी नक्की आवदेल.
मोहरी+जीर फोदनि. शेपु बारिक चिरुन. झाकन लाउन ५ मि. वाफ येउ देने.+ हलद+लाल तिखत+मीत+१५मि. आधि भिजुन थेवलेलि मून्ग दाल. निट मिक्ष करुन मन्द ग्यास वर वाफ येउ देने. इथे तुम्हि मून्ग दल अनि शेपुचे प्रमान आवदी प्रमाने घेउ शक्ता.
खुप सिम्पल पन आवडेल अशि रेशिपी आहे.
फाल्गुनी खरच शेपू फॅन आहे.
फाल्गुनी खरच शेपू फॅन आहे. इतक्या कष्टांनी रेसिपी टाइप केलीये
सिंडी,
सिंडी,
शेपु राईस पण छान
शेपु राईस पण छान लागतो.....
आमच्याकडे बरेच वेला करतात
धागा वर आणण्यासाठी २००वी
धागा वर आणण्यासाठी २००वी पोस्ट
शेपू कच्चा खायला पण पॉश
शेपू कच्चा खायला पण पॉश लागतो!
बित्तु
बित्तु
हसतोस काय असुदे? अरे खरच!
हसतोस काय असुदे? अरे खरच! गणपतीला जसा दुर्वा प्रिय, तसा मला शेपू प्रिय! :-p
(No subject)
निर्गुण निराकार..यत्र तत्र
निर्गुण निराकार..यत्र तत्र सर्वत्र...अहं ब्रह्मास्मि! :-p
अरे कोणि शेपुचि ताक पिठातिल
अरे कोणि शेपुचि ताक पिठातिल भाजि नाहि सान्गितलि? लसुण परतुन मस्त शेपुला १ वाफ आणुन त्यात बेसन घातलेले ताक टाकायचे. अजुन चव हवि असेल तर फोडणित बेडगि मिरचि आणि वाळलेले चिनि मिनि बॉरे टाकायचि. आहाहा. हि भाजि भाताबरोबर मस्त लागते.
आज शेपूचे पराठे करुन पाहिले.
आज शेपूचे पराठे करुन पाहिले. छान झाले आहेत. हा घ्या फोटो
शेपूची मोठी जुडी आणली होती. ती निवडून, धुवून, बारीक चिरुन घेतली. मग कुकरच्या भांड्यात खाली मुगाची डाळ घालून मऊ शिजण्यासाठी त्यात गरम पाणी घातले आणि वर शेपू बसवून डाळ आणि भाजी व्यवस्थित शिजवून घेतली. गार झाल्यावर घोटून घेऊन त्यात मीठ, दोन मोठे चमचे डाळीचे पीठ, मावेल इतकी कणिक, अगदी थोडी लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं, तीळ असं घालून कणिक भिजवून घेतली. थोडं पाणी लागेल असं वाटलं तेव्हा शेपूचा उग्रपणा कमी करायला थोडं दूध वापरलं ( जास्त लागलं नाही. अगदी दोन चमचे. ) नेहेमीच्या कणकेला घालतो तेवढं तेल घातलं. दोन्ही बाजूंनी तूप सोडून पराठे भाजले. मध्यम आकाराचे दहा-अकरा पराठे झाले. लोणचं आणि सावर क्रीमबरोबर मस्त लागत आहेत. मुख्य म्हणजे ह्या पद्धतीने पराठे केल्यामुळे भरपूर भाजी गेली पोटात आणि डाळीमुळे पौष्टीक झाले.
बाकीच्या पालेभाज्यांचे पराठेही मी आधी नुसती भाजी परतून घेऊन मग पीठ भिजवते. खूप भाजी पोटात जावी म्हणून आणि मऊही होतात
सगळ्या शेपू पंख्यांना
सगळ्या शेपू पंख्यांना दंडवत...!
अजून एक शेपू पाकक्रिया देत आहे, कृपया स्विकार व्हावा...
कॉर्न - शेपू फ्रिटर्स
http://www.maayboli.com/node/21457
आर्र... माझी लय नावडती भाजी
आर्र...
माझी लय नावडती भाजी होती.
यकदा नावं ठेऊन नकार दिला खाण्यास. मातोश्रींनी दिवस्भर उपाशी ठेवलं, अन् आजुबाजुस दरडाउन सांगितलं,
"याद राखा याला कुणी खायला दिलं तर"
असलं भयानक चक्रव्हूव फोडण्यात अपयशी झालेलो मी अन् त्यात भुकेचा कल्ळोळ.
सारे काही विसरून भाजीचा घास घेतला,
अहाहा, काय ती गोडी!
तेव्हापासून ताटात जे काही वाढले जाईल ते गपगुमान खाऊ लागलो. अगदी भोपळा, ढो. मीरची, वै. वै.
आता वाटते, जे होते चांगल्याचसाठी!
मयुरेश ... अगो...
मयुरेश ...
अगो... मस्स्स्स्सत कृती आहे. आणि गिरिश ची पण कृती वेगळी वाटतेय.
Pages