ऋयाम यांचे रंगीबेरंगी पान

कशास त्याची वाट पहावी (गंमतरही)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

कशास त्याची वाट पहावी,
स्वतः खाउनी मोकळे व्हावे.

खाईल चोंग्या आल्या वरती,
त्याचे झाकून ठेवून द्यावे.

चविष्ट लागे गरम पदार्थ,
गार कशाला होऊ द्यावे?

भरल्या पोटी तंगड्या ताणून
गप्पा हाणत स्वस्थ पडावे.

आधीच दमता कामे करूनी
फुकाट 'अनशन' का घडवावे?

म्हणून म्हणतो आया-बायांनो,
स्वतः खाउनी मोकळे व्हावे.

खाईल चोंग्या आल्या वरती,
त्याचे झाकून ठेवून द्यावे.

मैत्रीदिन - २०११

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मैत्रीदिन आलाय, पण मी प्रश्नात पडलो आहे... काय करावं?

१. कॉलेजगिरीचं एडं वय गेलं असलं तरी लाल्लाल फ्रेंडशिप बँड घेऊन फिरावं.
२. मोबाईल कंपन्यांच्या 'ब्लॅकाऊट डे' लोच्याचा धिक्कार करून फेसबुकावरच मित्रांना विश करावं.
३. 'ब्लॅकाऊट डे'ला न जुमानता बिंदास रुप्पैला येक असे प्रेमटेडी पाठवावेत.
४. सध्या पुण्यात असल्याने पु.लं.च्या म्हणण्याप्रमाणे आज "मातृदिनाचं" महत्त्व आठवावं.
५. 'हॅरी-हर्मायनी-रॉन' आणि त्यांच्या हॉगवर्ट्झ मधल्या सर्वांच्या मैत्रीला आठवावं.

तूर्तास तरी हा प्रेमटेडी मित्रांसाठी :

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

फरहान अख्तर फॅन क्लब

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

दिल चाहता है.
लक्ष्य.
रॉक ऑन!!
कार्तिक कॉलिंग कार्तिक.
जिंदगी ना मिलेगी दोबारा.
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

रायटर
नॉट सो बॅड सिंगर
नॉट सो बॅड डान्सर
डायलॉग रायटर
डायरेक्टर
अ‍ॅण्ड काऊंटिंग...

'दिल चाहता है' पहायला गेलो ते आमिर खानमुळे. नुकताच त्याचा 'लगान' पाहिला होता. तो प्रचंड आवडला होता. 'दिल चाहता है' पाहिला आणि 'लगान' विसरलो. तुलना करण्याची चुक अजिबात करत नाहीये. पण सगळ्यांना 'लगान' विसरून 'डी. सी. एच.' च्या प्रेमात पाडणारा फरहान अख्तर नव्या दमाचा, आत्मविश्वास असलेला वाटला.

शब्दखुणा: 

READY!!!

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

काल काही मित्रांसोबत READY!!! पाहिला.

प्रमुख भुमिका: सलमान खान. असिन थोट्टुमकल.

गाणी: ढिंक चिका. कॅरेक्टर ढिला. हमको प्यार हुवा है.
* म्युझिक : प्रितम.

टारगेट ऑडियन्स : कॉलेजकुमार/कुमारींसाठी (ज्यु. कॉलेज) किंवा दुसरी-तिसरीतली पोरं.

- हा चित्रपट बहुधा एका रात्रीत शुट झाला आहे. सलमान सतत झोपलेल्या डोळ्यांनी वावरतो.
अतीच झाल्यावर अधेमधे चष्मा घातला आहे.

- असिनचा मेकअप नक्कीच कोणी इंडस्ट्रियल ट्रेनी माणसाने केला आहे. ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच निम्सावळी दिसते.

प्रकार: 

उशीर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

"उद्या सकाळी या. ५:३० ला बरोब्बर. ओके? ", हसत तो ड्रायव्हरला म्हटला.
ड्रायव्हर प्रयत्नपुर्वक हसला. आणि "ओके साहेब. गुड नाईट!" म्हणून गाडी पार्क करायला निघाला.

"आजचा कार्यक्रम लांबला म्हणून उद्याची वेळ चुकवणं बरोबर नव्हे! ५.३० म्हणजे ५.३०!" त्याने ठरवलं होतं.

तो लिफ्टकडे निघाला. वॉचमन स्टुलवर पेंगत होता. अधुनमधुन चांगला घोरत बिरत होता.
" झोपेच्या वेळी झोपणारच. माणुस तो शेवटी. " त्याच्या मनात आलं.
"कामाच्या वेळी झोपा काढतोय हा!" वगैरे विचार दुरुनसुद्धा मनाला शिवुन गेला नाही. आज तरी.

विषय: 
प्रकार: 

पे रु च्या झा डा मागेऽऽएऽऽ..

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

'बालपणीचा काळ सुखाचा', 'लहानपण दे गा देवा' वगैरे आपण नेहेमीच ऐकतो. आता सगळंच काही रम्य नसतं,
नव्हतंच... घडणं/घडवणं नेहेमीच आपल्या हातात नसतं, म्हणून मला तरी वाटतं 'रम्य ते आठवणं' तरी आपल्या हातात असतं ना?

-------------------------------------------------------------------------------------------

वेळेचं नियोजन आम्हाला शिकवलं ते उन्हाळ्याच्या सुट्टीनं!
म्हणजे सुट्टीच्या दिवसातला एकही क्षण वाया न जाऊ देता आणि 'मॅक्झिमम युटीलायझेशन ऑफ अ‍ॅव्हेलेबल रिसोर्सेस' या तत्वाचा वापर करून सुट्टी आनंदात कशी घालवावी हे त्या दिवसांना आठवल्यावरच ध्यानात येतं.

विषय: 
प्रकार: 

नाचायला मोकळा...

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

माझ्या रंगीबेरंगी ब्लॉगचे हे पहिले पान मी माझे गुरुमित्र प्रो. आगाऊ साहेब यांना सादर सम्रपित करतो.

------------------------------------------------------------------------------------------

मा. प्रो. साहेब,

स. न. वि. वि.

जागलो हो शब्दाला. घेतला बलॉग.
हक्काची जागा मिळाली. आता कसं, छान झालं. नुसता धुमाकुळ.
आता कसं, इथं मनसोक्त नाचायला मोकळा!

आ. न.
- ऋयाम.

------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - ऋयाम यांचे रंगीबेरंगी पान