मैत्रीदिन - २०११

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
<1’

मैत्रीदिन आलाय, पण मी प्रश्नात पडलो आहे... काय करावं?

१. कॉलेजगिरीचं एडं वय गेलं असलं तरी लाल्लाल फ्रेंडशिप बँड घेऊन फिरावं.
२. मोबाईल कंपन्यांच्या 'ब्लॅकाऊट डे' लोच्याचा धिक्कार करून फेसबुकावरच मित्रांना विश करावं.
३. 'ब्लॅकाऊट डे'ला न जुमानता बिंदास रुप्पैला येक असे प्रेमटेडी पाठवावेत.
४. सध्या पुण्यात असल्याने पु.लं.च्या म्हणण्याप्रमाणे आज "मातृदिनाचं" महत्त्व आठवावं.
५. 'हॅरी-हर्मायनी-रॉन' आणि त्यांच्या हॉगवर्ट्झ मधल्या सर्वांच्या मैत्रीला आठवावं.

तूर्तास तरी हा प्रेमटेडी मित्रांसाठी :

सब लोक्स " दुधो नहाओ, पुतो फलो...." "दिन दोगुनी, रात चौगुनी तरक्की करो..."
आणि आपल्या सर्वांची मैत्री अबाधित राहो~ Happy

* टेडी - इंटरनेटवरून साभार्स

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Happy

टेडी भारीच! आपल्यालाही मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!

सध्या पुण्यात असल्याने पु.लं.च्या म्हणण्याप्रमाणे आज "मातृदिनाचं" महत्त्व आठवावं.>>> Lol Lol