READY!!!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

काल काही मित्रांसोबत READY!!! पाहिला.

प्रमुख भुमिका: सलमान खान. असिन थोट्टुमकल.

गाणी: ढिंक चिका. कॅरेक्टर ढिला. हमको प्यार हुवा है.
* म्युझिक : प्रितम.

टारगेट ऑडियन्स : कॉलेजकुमार/कुमारींसाठी (ज्यु. कॉलेज) किंवा दुसरी-तिसरीतली पोरं.

- हा चित्रपट बहुधा एका रात्रीत शुट झाला आहे. सलमान सतत झोपलेल्या डोळ्यांनी वावरतो.
अतीच झाल्यावर अधेमधे चष्मा घातला आहे.

- असिनचा मेकअप नक्कीच कोणी इंडस्ट्रियल ट्रेनी माणसाने केला आहे. ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच निम्सावळी दिसते.
-त्या ट्रेनीला समीरा रेडी आवडत असावी. असिनला तसाच लुक दिला आहे. (कॉस्च्युम डिजायनरही मिळालेला दिसतो त्याला. तिच्या कुठल्याही सिनेमातले कपडे काढावेत आणि हिला घालावेत.
<संपादन> * आणि असिनचे आधीचे तिला घालावेत. )

- "चित्रपट कसा वाटला" ह्या प्रश्नाचे उत्तर HITCH मधे सॅरा मिलास, 'हीच' ला सांगताना म्हणते त्याप्रमाणे, 'Well, There was a beginning, I remember an interval and yes, there was THE END!'

--------------------------------------------------------------------------------

एकूण काय तर "READY!!!" मधेही कंगना राणावतच सुंदर दिसते.
* आपला पैसा वसुल.

प्रकार: 

मला रेडी अतिशय आवडला. सलमान तर फारच आवडला Happy कातील दिसतो यार या वयात पण. "कोई तो रोकलो" हा ड्वायलॉक आवडला. आवरा चं हिंदीकरण परफेक्ट. असीनचा मेकप गंडलाय पण मला तीचाही अभिनय आवडला. एकंदरीत पैसा वसूल सिनूमा हे बॉस.

आता हे वाचून कुणाला माझी आभिरुची ढासळली आहे वगैरे वाटेल but I dont care Lol

तिच्या कुठल्याही सिनेमातले कपडे काढावेत आणि हिला घालावेत<<< ऋयामा, आपले रंगीबेरंगी पान असले तरी हे वाक्य जरा जस्तच बोल्ड वाटते नै का ??? Proud Lol Light 1

बाकी सिनेमा वगैरे मे आपुन नॉट मच इंटरेस्टेड.

एकूण काय तर "READY!!!" मधेही कंगना राणावतच सुंदर दिसते.
>>>
हो कंगना सुंदरच दिसते.
बाकी असिनपण चांगलीच दिसते. आता तिचा मेकअपमन ट्रेनी असला म्हणुन काय झाल?
गाणी ऐकुनच कळ्ळा की पैसा वसुल

तिच्या कुठल्याही सिनेमातले कपडे काढावेत
>>>>

चला पुढच्या लेखात आता ऋयामाला "समीरा रेड्डी" खूप म्हणजे खूपच सुंदर दिसणार तर Proud Rofl

रेडीमध्ये असिन ही {ट्युलिप जोशी, माँ, बडी चाची, छोटी चाची, बडी मामी, छोटी मामी, अमर चौधरीची आई/अमर चौधरीची सून, नौकरानी १, नौकरानी २} यांच्यापेक्षा सुंदर दिसते.
रेडीमध्ये कंगना राणावत असिनपेक्षा सुंदर दिसते.
रेडी!!!मध्ये कंगना राणावतच सुंदर दिसते.

असिनचा मेकअप नक्कीच कोणी इंडस्ट्रियल ट्रेनी माणसाने केला आहे. ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच निम्सावळी दिसते.
>>>>>>>

ऋयामा,
त्याचं उत्तर त्यातल्या एका गाण्यात दडलेलं आहे...

"बारा महिने मे बारा तरिकों से तुझको मेक-अप कराऊंगा मै....... " Biggrin

एकंदर चित्रपट १२ महिन्यात पूर्ण केला असणार आणि कंट्युनिटीची बोंब असणार (जी आपल्या सिनेमात असतेच Sad )

धिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए ..... ए ए ए ए Wink

@ सगळे
Lol

@लाजोजी
योग्य ते बदल करतो.

सर, _/\_
भुंगेश पुढचा एक सुनेमा हेरला आहे, डबल धमाल का काहीतरी. त्यातही करांजी आहे Happy
एएएएएएएएएएएएए धिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए ....ए ए ए ए डोळा मारा

त्या रेडीत म्हणे सलमान म्हणे जमीनीला रागावतो ना, ''धरती माई, बॅड मॉमा...'' का असं काहीतरी.... ते माझ्या बहिणीला फार्फार आवडलं Lol मी अजून शिणुमा पाहिला नाहीए. पाहिला तर शेजारची खुर्ची डोके उतरवून ठेवायला रिकामी असेल हे बघूनच जाणार! Proud

कंगना आहे का रेडि मध्ये???? पिक्चर पाहताना मध्येच झोप लागली मला म्हणून दिसली नाही बहुतेक.
>> ती सुरूवातीच्या काही मिनिटांतच अरबाज खानसह पडद्यावर दिसते. मग तुम्हांला या सिनेमात अजय देवगण, संजय दत्त, झरीन खान ही दिसले नसणार...!

मला बंगळूरू पुणे प्रवासात हा सिनुमा बळेच दाखविण्यात आला व्होल्वोमधे.
ती असीन मला आधी सोनाली कुलकर्णीच वाटत होती. पण ती जी कोणी आहे ती छान दिसते.
बाकी परेश रावल बद्दल कोणीच कसे लिहिले नाही ? त्याचा आक्ख्या पिक्चरभर मोरू केला आहे. त्याला हा चित्रपट स्विकारून असेच झाले असेल.
क्या मै सचमुच इस फिल्म मे काम कर रहा हूँ ? (क्या मै मोदी को जानता हूँ च्या चालीवर) Happy
बिचार्‍याचे खरच "बलिदान" आहे या चित्रपटामधे

ऋयामला कंगना फारच आवडते वाटते.........मागच्या लेखात कंगना फारच सुंदर दिसते असे कुठेतरी वाचल्या सारखे आठवते...

ती असीन मला आधी सोनाली कुलकर्णीच वाटत होती.>>> Lol अरेरे!

असो. ते धिंगचिका गाणं ऐकायला चांगलंय. अमिताभचं 'तू मैके मत जईयो' स्टाईल.

काही मित्र माझ्यासमोरच 'आपण जाऊया येत्या काही दिवसात ह्या सिनेमाला' अशी चर्चा करत होते, पण त्यांनी मला विचारलंही नाही येण्याबद्दल Sad त्यामुळे ह्या सिनेमाला पासच! :प

सिनेमातलं फारसं काही माहीत नसतं त्यामुळे हा सिनेमा मला reddy असा वाटला होता!
धन्स ऋयाम! तुझ्यामुळे या सिनेमाचे नांव ready असल्याचे आणि कंगना राणावत सुंदर दिसते हे (पुन्हा) समजले. Happy

थेटरवर, स्वखर्चाने पाहिला हा मूव्ही. जाम बोअर वाटला. सल्लू, करिश्माचा असाच कोणता तरी एक जुना मूव्ही आहे, मामा लोकांना पटवण्याचा.

म्हणजे, सलमान ने या चित्रपटात कपडे घातलेत ?!!
>> तरीही शेवटाच्या हाणामारीच्या प्रसंगात सलमानने काही क्षणापुरती का होईना शर्ट काढण्याची हौस पुरवून घेतलीय.

मी माझ्या (हेरम्ब) मुलाला घेउन गेले...कारण ढिंक चिका गाण जरा जरी वाजल तरी हा नाचायला तयार्......सव्वा दोन वर्षाचा आहे....मला वाटल झोपेल पण नाही....सगळा सेनेमा त्याने...एन्जॉय केला...शेवटी रो मधेही नाचत होता....आजुबाजुचे सगळे बघत होते नी हा आपला नाचतोय......

सावरी

मीनु,
तो सुरवातीचा सीन आहे, रजिस्टर मॅरेज चा, त्यात अरबाझ शी जी कन्या लग्न करते ती कंगना !
असीन भयानक दिसते.. टिपिकल साउथ इंडियन अम्मा !

Pages