साजिरा यांचे रंगीबेरंगी पान

गाज (१)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

लांबच लांब पसरलेली पोपडे धरलेली जमीन आणि भक्क ऊन. अंगाची लाही लाही करणारं. पिवळ्यापासून नारंगी-तांबड्या-लालभडक रंगांच्या असतील नसतील तेवढ्या छटा प्रदर्शन मांडून बसल्यागतच. एखादं माणूस, झाड किंवा सावलीचा तर प्रश्नच नाही. जिवंतपणाचे कुठचेही चिन्ह नाही. ते ओसाड माळरान होतं, की वाळवंट, की एखादं बेट की काहीतरी तसंच. पण या अशा वैराण जागेत त्याला स्वतःचं अस्तित्व एकदम भगभगीत आणि एखाद्या दुखर्‍या जागेसारखं किंवा जखमेसारखं सटसट करत कळवळायला लावणारं आणि एकदम क्षुद्र-क्षुल्लक वाटल्यागत. या सार्‍यात आपण का आहोत- असा विचार करत असतानाच जवळच ती पडकी खोली अचानक उगवल्यागत दिसल्यासारखी.

विषय: 
प्रकार: 

कलंदर, मी आणि जाहिराती (१)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

"नमस्कार! मी अमर जोशी.."

माझ्या ऑफिसात आज सकाळी माझी आणि ह्यांची एकाच वेळी एंट्री. पाच-सव्वा पाच फुट उंची असावी. किंचितसे सुटलेले पोट. निळ्या रेघांचा शर्ट, त्यावर टाय, पांढरी पँट आणि काळे, लेदरचे, लख्ख पॉलिश केलेले बूट, हातात काळी छोटी ब्रीफकेस. घारे डोळे, मंद स्मित.

"गॅस गिझर्सचे ट्रेडिंग करणारी कंपनी आहे माझी. इन्स्टिट्युशनल सप्लाय असतो नॉर्मली. शाळा-कॉलेजेस, हॉस्पिटल्स, हॉटेल्स इ. ना. पण आता रिटेल सेलदेखील करावा असे वाटते आहे. त्यासाठी जाहिराती करायच्या आहेत..."

मी सगळ्या वर्तमानपत्रांचे आणि सगळ्या प्रकारच्या जाहिरातींसाठीचे रेट्स, स्ट्र्क्चर्स, स्कीम्स इत्यादी समजावून सांगितले.

प्रकार: 

जाहिराती देता का कुणी, जाहिराती..?!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

कोणतेही वर्तमानपत्र चालते कशावर?
एका शब्दात उत्तर द्यायचे, तर जाहिरातींवर!

प्रकार: 

असं एखादं पाखरू वेल्हाळ..!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास ऑफिसातून खाली येतो रोज. तळमजल्यावर, पण मागल्या बाजूला चहाचं दुकान आहे, तिथं चहा प्यायला. इमारतीत गाड्यांना येण्यासाठी पुर्व-पश्चिम, आणि दक्षिण-उत्तर असे दोन पॅसेजेस आहेत.

विषय: 
प्रकार: 

आरक्षण झालेच पाहिजे!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे 'आरक्षण' या विषयावरील मत
(मराठीत स्वैर भाषांतर)

प्रकार: 

पहिलं नमन..

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

पहिल्या पानावर कुणाचा मान?

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - साजिरा यांचे रंगीबेरंगी पान