जो_एस यांचे रंगीबेरंगी पान

भरून आलेलं आकाश

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भरून आलेलं आकाश
गूढ मंद प्रकाश
हवाही स्तब्ध
कुणीतरी भारलेली
कधी कधी मन
येतं ना भरून
कंठ दाटून येतो
डोळे गरम होतात
भरू ही पहातात
पण बरसत नाहीत
आणि सारं निवळतं
न बरसताच
अगदी हळू, सावकाश
तसच हे
भरून आलेल आकाश
मग …..

प्रकार: 

भाषा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

लेखी बोली चित्र मुकी
भाषा येवो कुठल्याही रूपे
कुणा कुणाला भावून जाई
त़र कुणाच्या मनी खुपे

भाषा अगदी पाण्या सारखी
जिला स्वत:चा रंग नाही
देणाऱ्याने दिलेला, घेणाऱ्याने घेतलेला
रंग सदा वाह़त राही

भाषा अगदी पाण्या सारखी

प्रकार: 

काही ओव्या

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काही ई-तिहास संशोधकांना उत्खनन करताना ई-स्क्रॅपमधे सापड्लेल्या काही ओव्या.

अश्रूंचे मुखवटे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आता सगळीच मनं, डोळे
इतके आटलेत
म्हणून तर, अश्रूंचे मुखवटे
आम्ही बनवलेत

घेता का घेता?
पाहिजे तो मिळेल
प्रसंगानुरूप, हवे तेवढेच,
अश्रू तो ढाळेल

हो, हल्ली त्यालाही
पैसे पडतात
फायदा नसेल तर तिथे
अश्रूही अडतात

विषय: 
प्रकार: 

पुण्यातलं माथेरान

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पुणे शहराजवळ कोथेरूड जवळ एक टेकड्यान्ची रांग आहे. त्यातल्या एम.आय.टी. मागच्या टेकडीला वेताळ टेकडी म्हणतात. ही माझी आवडती जागा. तिथे गेलं की कसं प्रसन्न वाटत.

प्रकार: 

असे प्रेम देवा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

सहज गीत ओठी कुणी गुणगुणावे
असे प्रेम देवा नशीबी असावे
जणू शिंपल्यातून मोती वसावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

किती छाटले झाड फुटती धुमारे
किती मेघ आले विझे सूर्य कारे ?
किती, वार झेलूनही ना मिटावे
असे प्रेम देवा नशीबी असावे

प्रकार: 

आणि मी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

अनेक दिवस, २,३ वर्षही असेल, मी हितगुज वाचत होतो. बरेचदा आपणही लिहावं असं मनात येत असे. पण कृतीत येत नव्हतं. पण एक दिवस अचानक मनात आलं, त्या वेळी पहीलीच केलेली पोस्ट म्हणजे, कोणीतरी टाकलेल्या चित्रावर केलेली ही चित्रकविता होती.

विषय: 
प्रकार: 

॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥

रंगीबेरंगीत काय लिहायचं हा प्रश्णच आहे.
बघू सुचेल तसं .....
चला, आज श्री गणेशा तर करुया....

आपल्या सगळ्यांचेच आवडते, पुलं.
त्यांना पुर्वीच वाहीलेल्या या काही ओळी...

pula1.jpg

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - जो_एस यांचे रंगीबेरंगी पान