काही ओव्या

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काही ई-तिहास संशोधकांना उत्खनन करताना ई-स्क्रॅपमधे सापड्लेल्या काही ओव्या. खरतर त्या सापडल्यावर आणताना ईं-द्रायणीत पडल्या, बुडणारच होत्या, पण लिहीणार्या अज्ञात संताची पुंण्याई म्हणून परत मिळाल्या.(त्या ठिकाणी पाणीच नव्हतं नदीत ते सोडून द्या). त्या पुढे देत आहोत.

आता पावसाळा, नेमेची येईल
त्याच त्या मेल, होतील गोळा

पाठवू पुढे वा, जरी उडवू त्यास
पावसाच्या आनंदास, न द्यावा तडा
----------------------------
असु नेटवरी, जरी दिसभरी
वास्तवाचे तरी, ठेवावे भान
----------------------------
उदास असता, मायबोलिसी जाता
मिळे त्वरे साठा, चैतंन्याचा
----------------------------
सुविचारयुक्त मेल्स, सुळसुळाट भारी
न दिसे आचरणी, प्रत्यक्षात
----------------------------
सुंदर निसर्गाची, सुंदर ती चित्रे
नित्य दिसता जाणीवा, बोथट झाल्या
----------------------------
त्याच त्या मेल्स, सारख्या पाठवती
आणि गोठवती, बॉक्स लिमीट
----------------------------
ई-देव म्हणे आता, येईल वारेमाप
ईमेलचे पीक, बॉक्स मध्ये
. . . .सुधीर

जुनच आहे हे, परत एकदा....

त्याच त्या मेल्स, सारख्या पाठवती
आणि गोठवती, बॉक्स लिमीट...

............... या ओव्या गेल्या वर्षी पाहिल्या होत्या असे वाटते..

हो जगमोहन हे २ वर्षापुर्वीच आहे. गुलमोहोरमधे होतं.
पण ते वाहून जातं, म्हणून रंगीबेरंगीत परत लिहीलं.
तसा शेवटी उल्लेख केला आहे.

सुधीर Lol
शिर्षक बदलून''काही नवीन ओव्या' असे कर.

चिन्नू, केदार

धन्यवाद

सुधीर