मै तेनुं फिर मिलांगी.....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मै तेनुं फिर मिलांगी....
कित्थे? किस तरह? पता नहीं..
शायद तेरे तखियुल की चिणग बनके.
तेरे कॆनव्हास ते उतरांगी.
जा खोरे तेरे केन्व्हास दे उत्त
एक रहसमयी लकीर बणके
खामोश तेनुं तकदी रवांगी...

जहां खोरे सूरजदी लू बणके
तेरे रंगाविच घुलांगी..
या रंगा दियां बाहवा विच बेठके
तेरी कॆनवासनु वलांगी...

पता नही किस तरह, कित्थे
पर तेनुं जरूर मिलांगी.....

जा खोरे एक चश्मा बनी होवांगी
ते जीवें झरनेया दा पानी उड्ड दा..
मै पानी दिया बून्दा ,तेरे पिन्डेते मलांगी...
ते ही एक ठण्डक जही बनके
तेरी छातीदे नाल लगांगी...
मै हौर कुछ नही जाणदी
पर एन्ना जाणदी हां
की वक्त जो भी करेगा
ए जनम मेरे नाल तू रैगा..

ये जिस्म मुकदाये.....
ते सब कुछ मुक जांदाये ..
पर चेटेयांदे धागे
कायनाती कणादे होणदे ...
मै उन्हा कणान्दे चुनांगी...
धागेयानुं वलांदी...

ते तेनु मै फिर मिलांगी.....

अमृता प्रीतम.....

सदर कविता गुलजार यांच्या आवाजात ऐका
http://www.youtube.com/watch?v=um6QOvOPol4

प्रकार: 

मस्त. Happy
तुमच्या ऑर्कुट प्रोफाईलवर वाचली तेंव्हाच आवडली होती. काल परवाच काही पंजाबी गाणे - कविता युट्युबवर शोधताना ही पण दिसली होती. ही लिंक
http://www.youtube.com/watch?v=hnHtrRlAgvI&feature=related

पहिली ओळ वाचली तेव्हाच नाव डोक्यात उमटले..अमृता प्रीतम! आणि या संदर्भातला लेख वाचला होता तो आठ्वून शहारा आला.

या कवितेचा मराठी अनुवाद माझ्याकडे आहे.
पण तो जेपीजी मध्ये आहे. येथे चिटकवता येईल का? कसा???????

प्रेमाला भाषा नसते. त्यामुळे खर्‍या प्रेमाबद्दल कुठल्याहि भाषेत लिहीले तरी समजते. त्यात शब्दांच्या अर्थांपेक्षा भावनेला जास्त महत्व असते. भावना कळल्या तर शब्दांची गरजच नाही!

ही कविता गुलजारांच्या आवाजात तूनळी आणि एम्पी ३ च्या बर्याच साईटवर उपलब्ध आहे. गुलजारचा आवाजाला अमिताभपेक्षा जास्त डेप्थ आहे. आठवा मिर्झा गालिबचा इब्तेदा .. बल्ली मारानके ...

प्रेमाला भाषा नसते. त्यामुळे खर्‍या प्रेमाबद्दल कुठल्याहि भाषेत लिहीले तरी समजते. त्यात शब्दांच्या अर्थांपेक्षा भावनेला जास्त महत्व असते. भावना कळल्या तर शब्दांची गरजच नाही! >>> विचार करा एक तामीळी आणि एक मराठी प्रेमात पडलेत आणि दोघांनाही स्वतःच्या भाषेशिवाय दुसरी भाषाच येत नाही . अपवाद टारझन आणि जेन

त्यामुळे खर्‍या प्रेमाबद्दल कुठल्याहि भाषेत लिहीले तरी समजते. त्यात शब्दांच्या अर्थांपेक्षा भावनेला जास्त महत्व असते??>>>> आँ. झक्कीकाका- कवितांच्या नावाने एवढे खडे फोडून शेवटी हजयात्रेला आलात ?
वे टु गो. Proud

झक्कीकाकाचेच पोस्ट आहे ना ती???

रॉबिन, अर्थ पण लिहा प्लीज,, गुलझारच्याच आवाजात त्याच्या गझल ऐकायचा योग एकदाच आलाय.. काय जादूभरी रात होती!!!

Translation is like a woman. If it is beautiful, it is not faithful. If it is faithful, it is most certainly not beautiful.”

—- Yevgeny Yevtushenko
(हे (मायबोलीवरील )सुन्दर ललनानो, काय शिव्या द्यायच्या असतील त्या ह्या रशियन कवीला द्या. मी आपले अर्थ न सांग्ण्याचा एक बहाणा शोधला आहे.)

अहो, कवितेबद्दल लिहा ना, माझ्याबद्दल काय लिहीता? तरी बरे, कुठल्याहि प्रकारचे वाद निर्मान होणार नाहीत असे साधे सरळ लिहीले. असो. माझ्या बायकोला ३९ वर्षांनंतर अजून कळत नाही माझ्या स्वभावाबद्दल, तर नुसती मायबोली वाचून काय कळण्र लोकांना?
<<कवितांच्या नावाने एवढे खडे फोडून शेवटी हजयात्रेला आलात >> कदाचित् त्या कवितांमधेच असे काही असेल की मला खडे फोडावेसे वाटत असतील, असे तर नसेल?

तू नळी या शब्दावर विनय देसाइ(याना जर्सीचा बीबी सोडून बाहेर जायला बन्दी आहे) यांचा कॉपी राईट आहे

खरे तर सौ.झक्की यांनाच शान्ततेचे नोबेल पारितोषिक द्यायला हवे ! Proud

त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच गेली ४०+ वर्षे घरात शान्तता प्रस्थापित झाली आहे....

गतकाळातील भारतीय स्त्री आणि आधुनीक काळातील भारतीय पुरुष असे म्हणा श्री१२३. Biggrin Biggrin Biggrin

असे अगम्य भाषेत बोलायचे आणि त्याचा अर्थ पण सांगायचा नाही ही आघुनीक पुरुषाची युक्ती आहे. म्हणजे मनातली भडास काढता येते पण घरातल्या जगदंबेला काssssssssही कळत पण नाही. रॉबीन तुम्हाला याची खूप सवय दिसते आहे Happy

विनोद सोडून (jokes apart), सुंदर न दिसणरी पण मनाने खूप सुंदर असणारी स्त्री केंव्हाही श्रेष्ठच - नुसत्या सुंदर दिसणार्‍या स्त्रीपेक्शा! तेंव्हा बहाणे सोडा अनुवाद लिहा!

अहा.. अमृता प्रितम.. माझी पण अतिशय आवडती लेखिका.. अन इमरोज.. एक ग्रेट व्यक्तिमत्व.. !! आणि त्यांचं ग्रेट प्रेम!!!

गुलझार च्या आवाजातील ही कविता इथे मिळेल का ऐकायला?

मी तुला पुन्हा भेटेन
कधी? कशी? केव्हा ?
मला माहीत नाही
मी तुला पुन्हा भेटेन
तुझ्या कल्पनेची एक चमक होऊन
तुझ्या कॅनव्हास वर उतरेन
पाहत राहीन तुझ्या कडे,मुकपणे
तुझ्या कॅनव्हास वरची गूढ रेषा होऊन
सुर्याचे किरण होऊन मिसळुन जाईन
तुझ्या कॅनव्हास वरच्या रंगांमधे
मी तुला पुन्हा भेटेन...

तुझ्या अंगावर जलतुषार उडवण्यासाठी
मी बनेन उसळता निर्झर
आणि मलाच उधळेन तुझ्यावर
प्रसन्न शिडकावा होऊन

अन्य काही मी जाणत नाही
एवढच जाणते की
काळ माझ्यावर कृपा करील.
मला माहीत आहे शरीर नष्ट झालं
की सगळंच नष्ट होतं
पण अस्तित्वाचे एवढेसे कण जुळवून
आठवणींचा धागा बनून
मी तुला पुन्हा भेटेन....

वाह हुडा हे लय झ्याक काम केलं तू...
तुझा आणि चेतनाचा दोघांचा अनुवाद वाचायला मजा आली. थोडाफार फरक आहे मी माझ्या मनाप्रमाणे मिक्स अँड मॅच करुन घेतला अर्थ.
अमॄता प्रीतम यांच्या कविता वाचल्या नाहीत. अजून असतील तर टाक की..

पहिली ओळ वाचली तेव्हाच नाव डोक्यात उमटले..अमृता प्रीतम! >> अगदी अगदी..