गणपती पुळे.....
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
46
याच महिन्यात गणपती पुळ्याला जाऊन आलो. मनात भक्तिभाव नव्हताच पण 'इस घरमे रहना है तो....' बर्याच गोष्टी कराव्या लागतात.
त्याची निवडक प्रकाश चित्रे...
हा मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी असणारा पितळेचा उन्दीर. त्याच्या कानात लोक आपल्या इच्छा सांगतात...
देवळाचे रंगकाम चालू आहे.
मंदिरानन्तर माणसे जातात पहिले बीचवर...
इथला बीच सुन्दरच आहे....
सायंकाळची क्षणचित्रे....
विषय:
प्रकार:
शेअर करा
सूर्यास्ताकडे... कहीं दूर जब
सूर्यास्ताकडे...
कहीं दूर जब दिन ढल जाये
सांजकी दुलहन बदन चुराये
चुपकेसे आये...
गणपती मंदिराच्या मागे एक छोटा
गणपती मंदिराच्या मागे एक छोटा डोंगर आहे. हा डोंगर स्वतः गनपती स्वरूप आहे असे मानतात. त्यामुळे त्याला घातलेली प्रदक्षिणा गणपतीला घातलेली प्रदक्षिणा असे भक्त मानतात. त्यामुळे डोंगराभोवती प्रदक्षिणा मार्ग बांधला आहे. हे अन्तर १ किमी असून १५ ते २० मिनिटे. लागतात. मार्ग जाम्भ्या दगडाने बांधला सून त्याची स्वच्छता असते त्यामुळे अनवाणी चालायला फारसा त्रास होत नाही...
प्रदक्षिणा मार्गावर मध्येच एक केवळ सोंडेचे देऊळ असून त्यास शृन्डास्थान म्हणतात.
प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूची बाग.
एक टिपिकल दृष्य
मन्दिराच्या परिसरातील पितळी ओम.
सकाळचा समुद्रकिनारा..
देवळाजवळची जास्वन्द यात गणपती
देवळाजवळची जास्वन्द
यात गणपती 'दिसतो' म्हणे....
हुडा, फोटोंबाबत बोलायचे झाले
हुडा,
फोटोंबाबत बोलायचे झाले तर छानच आहेत.
गणपती पुळ्याचा किनारा दिसायला छान असला तरी धोकादायक आहे. दरवर्षी बळी जातात तरी लोक शहाणे होत नाहीत.
सुरवातीचे वाक्य अप्रस्तुत आणि विषयाशी विसंगत वाटले. (संदर्भ माहीत नसल्याने क्षमस्व)
आता एवढ्या मोठ्या अक्षरातले
आता एवढ्या मोठ्या अक्षरातले दिसत नसेल तर तुम्ही बुड(व)ण्याच्या लायकीचे नाहीत का?
सुंदर फोटोज आलेत , देवळाला
सुंदर फोटोज आलेत , देवळाला रंग मस्त दिलाय . लाट ओसरताना पायाखालची वाळु घसरते तेव्हा मजा येते .
अरे वा आता रस्ता वगैरे
अरे वा आता रस्ता वगैरे बांधलाय का? पुर्वी नुसते पायवाट होती आईच्या लहानपणी(इती आई). मी गेले तेव्हा डोंगराला प्रदक्षिणा मारली नाही तेव्हाच बरा पैकी रस्ता केला होता. आता खूप छान केलेले दिसतेय.
फोटो आवडले. विशेषतः देवळाचे
फोटो आवडले. विशेषतः देवळाचे आणि उंदीरमामाचा फोटो खूप आवडले.
रॉहू, पुळ्याचा समुद्र किनारा
रॉहू, पुळ्याचा समुद्र किनारा स्वच्छ नाही हो.
फोटो मस्त आहेत:)
मस्त!
मस्त!
फोटो मस्तच. पण प्रस्तावना
फोटो मस्तच. पण प्रस्तावना आवडली नाही.
अप्रतीम फोटोग्राफी..!! चला
अप्रतीम फोटोग्राफी..!!
चला देवाचे दर्शन झाले..!!
बाप्पा मोरया....तुझ्या चरणी माथा..!!
............................................................
<< मनात भक्तिभाव नव्हताच पण 'इस घरमे रहना है तो....' >>
ये हुई बात.... लाखोमें एक..!!
अनुमोदन..!!
फोटो मस्तचं आवडले आता एवढ्या
फोटो मस्तचं
आवडले
आता एवढ्या मोठ्या अक्षरातले दिसत नसेल तर तुम्ही बुड(व)ण्याच्या लायकीचे नाहीत का?>>>>>> ह्याची ग्राफिटी करुन त्या बोर्ड च्या इथे लावता येइल का हे??
हुड फोटो मस्त आहेत. तरीच इथे
हुड फोटो मस्त आहेत. तरीच इथे दिसला नाहीत काही दिवस. तो उन्दीर तर लै क्युट. पितळ्यात असा भाव जमणे अवघड. मी डेस्क टाप वर लावला आहे. ते कानात इच्छा सांगायच्या मागे असे आहे की इच्छा तिथेच सोडा व नि:संग मनाने फक्त देवाला भेटा. (असे मला वाट्ते हो. )
ते कानात इच्छा सांगायच्या
ते कानात इच्छा सांगायच्या मागे असे आहे की इच्छा तिथेच सोडा व नि:संग मनाने फक्त देवाला भेटा.
फोटो छान आहेत.
देऊळ ... रंगकामाच्या काठ्यानी
देऊळ ...
रंगकामाच्या काठ्यानी जरा रसभंग होतोय खरा....
कानात इच्छा सांगणारा भक्त आणि उंदीर चक्क लक्षपूर्वक ऐकतोय असा भास बारकाईने पाहिल्यास होतो.
फोटो छानच.... पुन्हा एकदा
फोटो छानच.... पुन्हा एकदा गणपती पुळ्याला जावेसे वाटू लागले.
मस्त आलेत फोटो मी कधी गेले
मस्त आलेत फोटो मी कधी गेले नाहीये गणपतीपुळ्याला, पण आता जाणार नक्कीच
मस्त फोटोस बरेच वर्षांपूर्वी
मस्त फोटोस
बरेच वर्षांपूर्वी गेलेलो, फोटो पाहुन पुन्हा जावस वाटत्य
कानात इच्छा सांगणारा भक्त आणि उंदीर चक्क लक्षपूर्वक ऐकतोय असा भास बारकाईने पाहिल्यास होतो >>>> हुडा खरच रे, उंदीर मामा सिन्सीअरली ऐकतायत अस वाटतय
मस्त आहेत फोटो. लहानपणी गेले
मस्त आहेत फोटो. लहानपणी गेले होते तेव्हा रंगरंगोटी नव्हतीच. नॅचरल दगड दिसत होता बांधकामात. देवळाकडे जायला पायवाट होती आणि देवळासमोर पुळणच होती.
ही एक नवीन अश्विनी उगवली काय?
ही एक नवीन अश्विनी उगवली काय? वेल्कम डुडायडु. मी ते डु आय डी असे वाचले
देवळासमोरची प्रवेश
देवळासमोरची प्रवेश मार्गिका....
सम्पूर्ण देऊळ
मंदिरात आतले फोटो काढण्यास नेहमीप्रमाणे मनाई आहे.
मंदिराच्या व्हरांड्यात बहुधा पीओपी च्या गणपती कुटुम्बातल्या देवांच्या मूर्ती कोरल्या आहेत.
स्वागत आणि पुन्हा येण्याचं आवाहन.
या फोटोवर रॉबीनहूड यांचा कॉपी
या फोटोवर रॉबीनहूड यांचा कॉपी राईट असून हे फोटो कोणालाही कुठेही परवानगीशिवाय वापरायला परवानगी आहे
रॉबिनहूड मी गणपतीपुळ्यास कधीच
रॉबिनहूड
मी गणपतीपुळ्यास कधीच गेले नाहीये, या लेखातून माझी छोटीशी सहलच झाली.
सुरेख फोटो काढले आहेत तुम्ही.... सगळेच आवडले....
रॉबिनहूड, मस्तच आलेत फोटो.
रॉबिनहूड, मस्तच आलेत फोटो. गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा फारच छान आहे, मजा येते तिथे फिरताना. तिकडची एम.टि.डि.सी.ची रहाण्याची सोय खुप चांगली आहे.
राँबीनहूड ,मस्त घर बसल्या सहल
राँबीनहूड ,मस्त घर बसल्या सहल .धन्यवाद.सगळे फोटो आवडले .
फोटो एकदम झक्कास.
फोटो एकदम झक्कास.
वा मस्तच. माझं एक आवडीचं
वा मस्तच. माझं एक आवडीचं ठिकाण. ३-४ वेळा गेलो आहे. ९० साली ८-१० दिवस गणपती पुळ्याला राहिलो होतो. तरी कंटाळा आला नव्हता (कंटाळा शब्द काढला तर आयुष्यभर फटके मिळाले असते !). तेंव्हा गर्दीही नसायची (म्हणूनच गेलो होतो ) एम.टि.डि.सी.ची रहाण्याची सोय अगदी नुकतीच काही महिन्यांपूर्वी झाली होती. सगळ्या मस्त म्हणजे बाहेरचे मसालेदार खाण्यापेक्षा गुरुजींच्या घरी जेवणाची सोय होती.
तिथे एक गोष्ट करायची राहून गेली आहे. तिथे एम.टि.डि.सी. चे एक सगळ्यात मोठे घर जरा बाजुला उंचावर आहे. आजुबाजुला काही नाही आणि त्या घरातल्या बेडरूमची एक पूर्ण भिंत काचेची समुद्राभिमूख आहे. त्या भिंतीखाली एकदम कडा आणि खाली समुद्र. भरपूर Privacy आहे(तेंव्हा होती) जी भारतात अशा ठिकाणी क्वचीतच मिळते. एखाद्या सिनेमात असावे असे ते घर दिसते. तिथे एकदा राहून यायचे आहे.
जुन्या, अंगावर शहारा काढणार्या आठवणी परत आल्या ! रॉबीनहूड शतशः धन्यवाद.
छान फोटो आहेत. पुन्हा गणपती
छान फोटो आहेत.
पुन्हा गणपती पुळ्याच्या आठवणी ताज्या झाल्यात.
गणपती पुळ्याचा किनारा दिसायला छान असला तरी धोकादायक आहे.>>>>>
मंदिरा पासुन सुमारे ३-४ किमी अंतरावर वरवाडे बिच खुप छान, प्रशस्त, कमी गर्दीचा आणि विशेष म्हणजे सुरक्षित आहे.
तसेच गणपती पुळ्यात प्रवेश करण्या अगोदर मोठा उतार रस्ता आहे. तेथुन गावाचे आणि समुद्राचे दर्शन खुप मनोहारी होते. त्याचे फोटो कुणाकडे असतील तर कृपया टाका.
एक जास्तीची माहिती. पूर्वी
एक जास्तीची माहिती. पूर्वी गणपतीपुळे ते रत्नागिरी थेट जाता येत नसे. एकतर पुन्हा मागे राष्ट्रीय महामार्गावर येऊन पुन्हा दुसर्या रस्त्याने जाणे. नन्तर मधूनच निवती मार्गे रस्ता झाला. आतातर भंडारपुळे मार्गे रत्नागिरीला वीसेक मिनिटातच पोचता येते. रस्ता बराच समुद्र काठाने आहे. गणपती पुळ्याहून भंडारपुळे केवळ २ किमी आहे. भंडरपुळ्याचा बीच ग.पुळ्यापेक्षा खूप सुन्दर आणि निर्मनुष्य आहे. अजून भुतावळीचे तिकडे लक्ष गेलेले नाही. मात्र रिसॉर्ट वाल्यांचे गेले आहे. तिथे एक अत्यन्त महगडा रिसॉर्ट आहे. ग. पुळ्याला एम टी डीसी च्या रिसॉर्टचे लोकेशन आणि लोकप्रियता अफाट आहे.ऑनलाईन बूकींग आहे पण फार आधी करावे लागते.http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/Touris...
आम्ही ऐन वेळी सुटीच्याच दिवशी गेल्याने दुर्वांकुर नावाच्या हॉटेलमध्ये थाम्बलो. ए. सी. रूम १५००रु. प्लस एक व्यक्ती ३००. उत्तम सेवा.चांगला वाटला स्टे.
Pages