पाककला

अन्नचिंतन

Submitted by अनिंद्य on 9 November, 2022 - 02:40

नबालगन आणि विजयालक्ष्मी - माझ्यासाठी अनबा आणि विजी. माझे चेन्नै बडीज. सदा आनंदी राहणारे जोडपे. दोघेही माझे जिवलग मित्र. विजीच्या हातचे तमिळ पद्धतीचे चविष्ट जेवण जेवणे हा माझा चेन्नैतला नियमित कार्यक्रम. घरी चार-चार मदतनीस असूनही स्वतः पदर खोचून माझ्यासाठी स्वयंपाक करणारी विजी आणि प्रचंड आग्रह करकरून वाढणारा अनबा हे दृश्य नेहमीचेच. दोघांच्या आग्रह करून वाढण्याच्या सवयीला मी हसतो, नावे ठेवतो. दोघे काही बोलत नाहीत, सवय बदलत नाहीत. एकदा खोदून विचारले, इतका आग्रह का?

चवीनुसार मीठ

Submitted by क्षितिज on 8 February, 2022 - 11:19

कुठलीही पाककृती असो, त्यात जर मीठ योग्य प्रमाणात असेल तरच ती पाककृती स्वादिष्ट लागते.

आपण Online recipes ची मदत घेतो. त्यात बऱ्याच वेळा 'चवीनुसार मीठ टाका' असे mention केलेले असते.
तर हे चवीनुसार मीठ म्हणजे मिठाचे प्रमाण कसे ठरवावे?

मायबोलीकर युट्युबर्सः पारंपारिक कृती विडिओ

Submitted by देवीका on 7 January, 2021 - 21:59

मायबोलीवर बर्‍याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, मायबोलीवर आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण दोन लेख पाहिले आणि वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अ‍ॅडमिन कृपया मला तसे कळवा.

विषय: 

छंद पाककलेचा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 July, 2018 - 03:24

भातूकली खेळता खेळता अलगद कधी मला पाककलेची आवड निर्माण झाली ते कळलेच नाही. भातूकलीत अंगणातल्या झाडपाल्यांची भाजी करता करता हळू हळू आजी आणि आईकडे खर्‍या भाज्या मागून छोटीशी चुल लावून भातुकलीतले खरे जेवण बनवू लागले. दोघींनीही कधी भाज्या फुकट जातात किंवा इतर गोष्टींमुळे मनाई केली नाही व घरातील सगळेच माझ्या भातुकलीतल्या जेवणाची (माझ्या समोर) नाके न मुरडता, खोटी का होईना वाहवा करत आले त्यामुळे माझी आवड कले कलेने वाढत गेली. शालेय जीवनातील आठवी-नववी पासून विविध पुस्तकांमध्ये लिहीलेल्या रेसिपी वाचून नविन नविन पदार्थ बनविणे हा माझा रोजच्या दिनक्रमातील रिकाम्या वेळातील आवडता छंद झाला.

विषय: 
शब्दखुणा: 

गुलाबजाम (मराठी चित्रपट)

Submitted by केदार जाधव on 25 February, 2018 - 14:29

आत्ताच म्हणजे अगदी तासाभरापूर्वी हा चित्रपट पाहिला , अर्थातच प्रचंड आवडला अन बाहेर येतानाच वाटल काहीतरी लिहिल पाहिजे . मला माहित आहे की यावर आधीच यापेक्षा चांगले धागे नक्कीच आहेत . किंबहुना ते वाचूनच मी चित्रपट पाहिला . पण विचार केला की एखादी गोष्ट चांगली आहे हे परत परत सांगायला काय हरकत आहे ?

विषय: 
शब्दखुणा: 

पाकशास्त्र, पाककला आणि गुलाबजाम.

Submitted by सई केसकर on 20 February, 2018 - 01:39

सुगरणींची (सुगरणांची ) आणि एकूणच पाककौशल्याची दोन टोकं असतात. एका टोकावर स्वयंपाक ही एक कला आहे असे मानणारे लोक असतात आणि दुसऱ्या टोकावर स्वयंपाक हे एक शास्त्र आहे असे मानणारे लोक असतात. या दोन टोकांच्या मध्ये झोके घेणारे माझ्यासारखे बरेच असतात. स्वयंपाक ही एक कला आहे मानणारे लोक मला लहानपणीच खूप भेटले. पण ते सगळे अगदी निरागस होते.
"वैनी, भाजी कशी केली?" या प्रश्नाला फक्त हाताचा आधार घेऊन उत्तर देणाऱ्या बायका मी बघितल्या आहेत.
"एवढं एवढं आलं" (स्वतःच्या तर्जनीची दोन पेरं दाखवत)
"एवढ्या एवढ्या लसणीच्या कुड्या" (त्याच हाताच्या बोटांचा चिऊच्या चोचीसारखा चंबू करत)

विषय: 

अमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट पिझ्झा >> जाई.

Submitted by जाई. on 5 September, 2017 - 10:52

गणेशोत्सवातच नव्हे तर मायबोलीवरही पाककृती लिहायची ही पहिलीच वेळ आहे . त्यामुळे अस्मादिकास सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती.

तर आधीचे दोन प्रयोग फसल्यावर जाऊ दे आता म्हणून आधीच शस्त्र टाकून झाली होती.पण डोक्यातला किडा काही स्वस्थ बसवू देईना. त्यामुळे डोकं शिणवत असताना ही रेसिपी आठवली . आधीचे प्रयोग फसल्यावर (पक्षी -किचन मध्ये सांडलवंड केल्यावर ) आता मातेकडून हे शेवटचं असा अल्टिमेटम मिळाला होता .पण god help to them, those help themselves . तर आता बघूयात रेसिपी .

साहित्य

"अमृताहुनी गोड - <<<खजुराचे लाडू >>> - <<< दीपा जोशी >>>’’

Submitted by दीपा जोशी on 27 August, 2017 - 12:00

reduced khajur ladu.jpegखजुराचे लाडू
१) प्रकार पहिला - साधे लाडू

लागणारा वेळ- एक तास

साहित्य :
१. बिनबियांच्या खजूराचे बारीक केलेले तुकडे - एक मोठी वाटी दाबून भरून
२. बेदाणे - पाव वाटी
३. सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे - एक मोठी वाटी गच्चं भरून
४. खसखस - पाव वाटी
५. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट -पाव वाटी
६. वेलदोडे - ३/४

विषय: 

"अमृताहुनी गोड - <<<खजुराचे लाडू >>> - <<< दीपा जोशी >>>’’

Submitted by दीपा जोशी on 27 August, 2017 - 12:00

reduced khajur ladu.jpegखजुराचे लाडू
१) प्रकार पहिला - साधे लाडू
साहित्य :
१. बिनबियांच्या खजूराचे बारीक केलेले तुकडे - एक मोठी वाटी दाबून भरून
२. बेदाणे - पाव वाटी
३. सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे - एक मोठी वाटी गच्चं भरून
४. खसखस - पाव वाटी
५. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट -पाव वाटी
६. वेलदोडे - ३/४

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला