दोन कप साफ केलेली कोलंबी किंवा दोन फिले तिलापियाचे
पातीचा कांदा - बारीक चिरुन - अर्धी वाटी
फरसबी किंवा चवळीच्या शेंगा अगदी बारीक चिरुन अर्धी वाटी
कोथिंबीर बारीक चिरुन
हिरवी मिरची बारीक चिरुन १ टी स्पून
१ टे स्पून फिश सॉस,
१ टे स्पून कॉर्न स्टार्च
१ टे स्पून रेड करी पेस्ट ( नसल्यास सांबाल सॉस, श्रीरचा सॉस, किंवा तत्सम हॉट सॉस )
१ टे स्पून चिनी सेसमी ऑइल .
१ अंडं
श्रिम्प किंवा फिश फुड प्रोसेसरमधून पल्स करून बारीक करुन घ्यावेत. फार वेळ फु प्रो फिरवू नये.
त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, शेंगा, फिश सॉस, हॉट सॉस / करी पेस्ट, कॉर्न स्टार्च, तेल, व फेटलेले अंडे घालून नीट मिसळून घ्यावे.
नॉन स्टिक तव्यावर थोडे सढळ हाताने तेल घालावे. हाताला पाणी लावून फिश मिश्रणाचे साधारण इंच -दीड इंचाचे चपटे गोलसर फिश केक्स घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावेत. सर्व्ह करताना दोन मिनिटे पेपर टावेल वर टाकून मग सर्व्ह करावेत.
पाव वाटी फिश सॉस,पाव वाटी राइस व्हिनेगर यात बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून ठेवाव्यात व हे सॉस फिश केक बरोबर सर्व्ह करावे .
तिखटाचे प्रमाण आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
फिश सॉस अन करी पेस्ट दोन्हीमधे भरपूर मीठ असते त्यामुळे मी वेगळं मीठ घालत नाही.


