मुलगी

जेव्हा माशाचं पिलू पोहायला शिकतं!!

Submitted by मार्गी on 28 March, 2024 - 10:07

✪ अदूचं सायकल चालवणं- आनंद सोहळा!
✪ छोटे "मैलाचे दगड" पण आनंद अपरंपार
✪ अरे, मला वाटलं तू मागून धरलं आहेस, पण तू तर केव्हाच हात सोडला होतास! ओ येस्स!
✪ समवयस्क सायकल सवंगडी नसल्याने लागलेला वेळ
✪ तिला सायकलिंग व ट्रेकिंग करताना बघणं!
✪ आपल्याला मिळालेल्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद
✪ चिमुकल्या रोपट्याचा वृक्ष होणं अनुभवणं

शब्दखुणा: 

काल एका मुलीने माझा फोटो काढला.

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 May, 2019 - 16:54

उभा जन्म मुंबईत गेल्याने रिक्षा नामक तीन चाकी वाहनाशी दोन हात करायचा प्रसंग फारसा आला नाही. त्यातही शेअर रिक्षा या प्रकारापासून मी चार हात लांबच राहतो. कारण त्यात आपल्यासोबत आणखी चार-सहा हात बसवतात. ज्यांच्याशी आपली ओळख ना पाळख अश्यांसोबत एकाच रिक्षात खेटून प्रवास करायला नाही म्हटले तरी जरा संकोचच वाटतो. त्यातही जर दोन मुलींच्या मध्ये बसायची वेळ आली तर आणखी अवघड होते. तसे पाहता ईयत्ता पहिली ते चौथी दोन मुलींच्या मध्ये बसूनच मी माझे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले आहे. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हाची लोकं भोळी होती. तेव्हाचे मन निरागस होते. पण आता मात्र....

विषय: 

परीकथेचे सव्वा वर्ष .. (facebook status)

Submitted by तुमचा अभिषेक on 18 July, 2015 - 17:18

साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी माबोवर माझ्या मुलीच्या (परीच्या) जन्माची कहाणी लिहिली होती. तेव्हा येणार्‍या काळात तिच्या छोट्यामोठ्या आठवणी लिहून काढायच्या असे मनाशी ठरवले होते. पण हल्ली आठवणींची साठवण फोटो आणि विडीओमध्येच सोयीस्कर पडत असल्याने अगदी तसेच काही झाले नाही. पण फेसबूक स्टेटसच्या निमित्ताने मात्र काही आठवणी कागदावर उतरल्या. काल सहज त्या पहिल्यापासून वाचतानाही गेल्या वर्षभराच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि म्हणूनच त्या संकलित करून ब्लॉगवर ठेवायचे ठरवले. बस्स त्याच ईथेही अपडेटतोय Happy

शब्दखुणा: 

मला मुलगीच हवी ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2014 - 06:24

मला मुलगीच हवी ..

......

सन २००८ !
एक काळ होता जेव्हा मला वाटायचे की मला मुलगाच झाला पाहिजे.
हो, त्याकाळी जेव्हा मला एक साधी गर्लफ्रेंडही नव्हती, (वा किमान होत्या त्या मैत्रीणींबाबत सिरीअस तरी नव्हतो) तेव्हाही कॉलेजमधील मित्रांशी चर्चा करताना, वा एकांतात बसून स्वत:च्या भविष्याचा विचार करताना मला असेच वाटायचे की येस्स, मला मुलगाच झाला पाहिजे.

......

एक काळ होता, (अर्थात आजही जिथे सुशिक्षितपणा किंबहुना त्यापेक्षाही सुसंस्कृतपणा आला नाही तिथे तो काळ अजूनही आहेच)

शब्दखुणा: 

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५)

Submitted by तुमचा अभिषेक on 9 July, 2013 - 00:05

दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे..

विषय: 

स्थित्यंतर

Submitted by भानुप्रिया on 8 July, 2013 - 06:40

पाउल टाकलंय उंबरठ्याबाहेर,
मन अजून घरातच रेंगाळतंय..
नव्याच्या लखलखटात बावरून,
माजघरातला अंधार शोधतंय..

'माझं' घर आता 'आईचं', 'माझी' माणसं 'माहेर'
संदर्भ बदलतायत भोवतीचे, मी ही बदलतेय बहुतेक
पण खरंच, बदलेन का मी?
स्वतःचे स्वतःशी चाललेले अखंड संवाद..मध्यच अडखळतेय, सावरतेय.
स्वतःचं सामान आवरताना, एकट्यानेच रडतीय.

आनंद की हुरहुर अधिक, सांगता येणं कठीण आहे,
आठवांचे सारे बंध, असं सोडून जाणंही कठीण आहे!

नवं जोडायला जमेल का?
जुनं सोडायला जमेल का?
माहिती नाही..कळेलच लवकर!

बावरलेलं मन, येईल मग माजघर सोडून!

हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!

Submitted by तुमचा अभिषेक on 4 May, 2013 - 07:08

-----------------------------------------------------------------------------
एक सिगारेट पिणारी मुलगी - http://www.maayboli.com/node/42727
-----------------------------------------------------------------------------

हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!

आज तो दिसला, तब्बल तीन साडेतीन वर्षांनी ..

विषय: 

एक सिगारेट पिणारी मुलगी

Submitted by तुमचा अभिषेक on 28 April, 2013 - 09:31

आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी..

ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत..

विषय: 

लीना - (जागतिक महिला दिना निमित्त)

Submitted by आशयगुणे on 6 March, 2012 - 08:26

दोन दिवसांपूर्वी रविवारी माझ्या बायकोने मला भाजी आणायला धाडले तेव्हा ती दिसली. चेहऱ्यावर हास्य आणि तिचा हात हातात धरून शेजारी चालणारा तिचा लहान मुलगा, हे नक्कीच एक सुंदर दृश्य होतं. गेल्या १५ वर्षात काहीच बदललं नव्हत. ती अजूनही तशीच आणि तितकीच सुंदर होती. ती एका भाजीवाल्याकडे जात असतानाच दोन बाईकस्वार कॉलेज तरुण तिच्याकडे बघत बघत पुढे गेले. शेजारी उभ्या बायका काहीसा मत्सर डोळ्यात साठवून तिच्याकडे बघत होत्या. १५ वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजमध्ये हेच दृश्य तर घडत असे. आणि थोडं पुढे येताच तिने मला पाहिले. आश्चर्य, अविश्वास, आनंद हे मिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मुलगी