समाज

दिंड्या पताका...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो.

खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं...

विषय: 
प्रकार: 

मराठी बाणा

Submitted by गणपतराव on 2 July, 2013 - 09:02

नामदार सुरेश धस ह्यांनी ज्या प्रकारे उत्तराखंड नि केदारनाथ इथे काम केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.महाराष्ट्राचा बाणा त्यांनी दाखवून दिला शरद पवारांनी त्यांना जी मंत्रीपदाची संधी दिली तो विश्वास सार्थ ठरवत त्यांनी जे उत्तराखंडात काम केले त्याने महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

एखाद्या मराठी माणसाने चांगले काम केले तर तो कोणत्याही पक्षात का असेना त्याचे अभिनंदन. धस हे उत्तराखंडात आहेत ते हि सांगू शकत होते १०,००० जणांना वाचवले नि १५००० जणांना वाचवले पण त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य जाणले संयम बाळगला व अजून भाविक हे पुरात अडकलेले आहेत ह्याचे भान बाळगले.

विषय: 

संवेदनशील आणि सक्षम

Submitted by मामी on 29 June, 2013 - 14:13

गेले अनेक वर्षं, गेले अनेक महिने, गेले अनेक दिवस आणि अगदी ठळकपणे आज सकाळपासून विविध माध्यमांतून जे काही समोर आलं त्याबद्दलचं हे विचारमंथन आहे.

नुकत्याच वाचनात आलेल्या आणि सध्याच्या परिस्थितीत खर्‍याच परिकथा वाटाव्यात अशा या Six Fairy Tales for the Modern Woman. यातली तिसरी परिकथा वाचून हे असं खरंच होईल का? असं सारखं वाटत राहिलं .....

सकाळी मुंबई मिरर मधला शोभा डेंचा लेख अगदी पटलाच .....

विषय: 

कामात येते ती फक्त माणुसकी....

Submitted by मी मी on 29 June, 2013 - 02:24

'जो पर्यंत आपल्या घरात, परिवारात, आपल्या आजू-बाजूला सर्व सुरळीत आणि सुखरूप असतं तोपर्यंतच माणसाचे जात-धर्म, आपला-तुपला, सख्खा-परका, हा गरीब तो श्रीमंत असे जास्तीचे चोचले असतात ....पण खरी वेळ आली कि यातले काहीही कामात येत नाही कामात येते ती फक्त माणुसकी....'

विषय: 

हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवू शकणारे स्वयंसेवक हवे आहेत!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 June, 2013 - 02:57

''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्‍या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्‍यात साठवून घेऊ लागलो.

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ४

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 22:10

Dictionary
शब्दकोश

Acupuncture (AK-yoo-PUNK-cher): The technique of inserting thin needles through the skin at specific points on the body to control pain and other symptoms. It is a type of complementary and alternative medicine.
ऍक्युपंक्चरः दुःख आणि इतर लक्षणांचे नियंत्रण करण्याकरता, शरीरावरील विशिष्ट बिंदूंवर, त्वचेतून बारीक सुया खुपसण्याचे तंत्र. हे एक प्रकारचे पूरक आणि पर्यायी उपचारतंत्र आहे.

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ३

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 22:06

कर्कोपचार

अनेक कर्करुग्णांना त्यांच्या आरोग्यनिगेबाबत निर्णय घेण्यात सक्रिय सहभाग हवा असू शकतो. तुमचा रोग आणि त्यावरील उपचारांचे पर्याय यांबाबतचे सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असणे स्वाभाविकच आहे. मात्र, निदानापश्चातचा धक्का आणि तणाव हे सोसण्यास अवघड असतात. त्यामुळे डॉक्टरला विचारायच्या सर्व गोष्टी लक्षात येणेच कठीण असते. म्हणून डॉक्टरांची भेट ठरविण्यापूर्वीच त्यांना विचारायच्या प्रश्नांची एक यादीच करून ठेवणे सोयीचे ठरत असते.

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी २

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 22:02

कर्काकरताचे धोकेघटक

डॉक्टर्स अनेकदा हे सांगू शकत नाहीत की एखाद्या व्यक्तीस कर्क का व्हावा आणि इतर एखाद्या व्यक्तीस तो का होऊ नये. खाली, कर्काकरताचे सर्वात प्रचूर असलेले धोकेघटक दिलेले आहेत.

१. वयोमान
२. तंबाखू
३. सूर्यप्रकाश
४. मूलककारी प्रारण
५. काही रसायने व इतर पदार्थ
६. काही विषाणू आणि जीवाणू
७. काही उत्प्रेरके
८. कर्काबाबतचा कौटुंबिक इतिहास
९. मद्यार्क
१०. निकृष्ट आहार, शारीरिक सक्रियतेचा अभाव किंवा स्थूलता

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी १

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 21:58

७०% कर्करोग टाळता येण्यायोग्य असतात असे दूरदर्शनवरील सह्याद्रीवाहिनीच्या एका कार्यक्रमात नुकतेच सांगितले गेले. मात्र पुरेशी माहिती नसेल तर तो टाळणे शक्य होत नाही.

कर्काबाबतच्या आधिकारिक आणि अचूक माहितीचा पुरवठा सातत्याने करणारी "जीत असोसिएशन फॉर सपोर्ट टू कॅन्सर पेशंटस " ही अशीच एक अशासकीय संस्था, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या आवारात एक बुकस्टॉल चालवत आहे. त्यांच्याकरता केलेला एका पुस्तिकेचा मराठी अनुवाद, इथे लोकहितार्थ प्रस्तुत करत आहे.

http://shabdaparyay.blogspot.in/2013/06/blog-post_27.html
ह्या दुव्यावर अवघड शब्दांचे अर्थ अल्फाबेटिकली आणि अकारविल्हे रचून उपलब्ध केलेले आहेत.

Pages

Subscribe to RSS - समाज