नातीगोती

दोस्त, बिवी और शायरी - नात्यांचे एक अनोखे सत्यकथन ...

Submitted by अजातशत्रू on 9 July, 2016 - 09:24

दोन मित्रांचे लग्न एकाच स्त्रीशी आलटून पालटून झाले तर ? हे सामंजस्याने घडू शकते का ?
खऱ्या मैत्रीत स्त्री संबंध कधीच दुरावा आणू शकत नाहीत याचा प्रत्यय देणारी वेधक मित्र- प्रेमाची शायरीने सजलेली सत्यगाथा..
दोन जिवलग मित्र. दोघेही अप्रतिम प्रतिभावंत शायर.
त्यापैकी वयाने मोठा असणारा असगर आणि कमी वयाचा जिगर.
जिगरची आई १० व्या वर्षी वारलेली तर वडील १५ व्या वर्षी निवर्तलेले. शिवाय त्याचा निकाह जिच्यासोबत झाला होता ती देखील लवकर वारली.
वाहिदन असं त्या अभागी स्त्रीचं नाव होतं.
या नंतर तो आग्र्याच्या एका वेश्येच्या प्रेमात पडला होता, शिराज तिचं नाव.

'सुहाना सफर' सायरा- दिलीपसाबचा ......

Submitted by अजातशत्रू on 27 June, 2016 - 23:01

ओढ ज्याची त्याची.....
तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेलाय अन ती 'हिमगौरी' आता थकून गेलीय....
पण त्यांनी अजून हार मानली नाही, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नाहीत
अन ती त्याची सेवासुश्रुषा थांबवत नाहीये..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झालाय...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत चाललेत..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केलीय.
तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत चाललीत अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चाललेय..
त्याच्या देहाची त्वचा आता सैल झालीय, त्याला ऐकायला जवळपास येत नाहीये अन दृष्टी बरयापैकी धूसर झालीय.

चहाचे 'अमृततुल्य' रहस्य ...

Submitted by अजातशत्रू on 27 June, 2016 - 01:36

ही गाथा नुसत्या चहाची नाही तर गावाकडच्या साध्याभोळ्या माणसांची आहे...
चहा 'ताजमहाल'मधला असो की 'टेटली टी' असो त्याची चव आमच्या गणूच्या 'अमृततुल्य'पुढे फिकीच !
नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा 'रामबाण' उपाय !
हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत..
त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणारया गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच !
त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असते.

गावाकडची माणसं ...

Submitted by अजातशत्रू on 24 June, 2016 - 21:56

गावाकडे एक बरे असते, माणसांच्या चेहरयाला कल्हई केलेली नसते. माणसे जशी असतात तशीच राहतात अन तशीच दिसतात. कपाळाला अष्टगंध लावून सकाळी घराबाहेर पडणारी ही माणसे घरी येतील की नाही म्हणून घरचे लोक त्यांचा घोर करत नाहीत. मुळात गाव ते केव्हढे असते ? शे दोनशे ते पाचशे उंबरा इतकी त्याची व्याप्ती. गावात किती भाग म्हणाल तर एक वेशीबाहेरचे जग अन वेशीच्या आतले जग. म्हणूनच गावात हाक मारताना प्रत्येकाला एकमेकाचा बाप माहिती असतो.जसे की गणा भोसलेचा किसन महणजे किसन गणपत भोसले, महादू भोसल्याचा इष्णू म्हणजे विष्णू महादेव भोसले. तेथे औपचारिकता ही औषधालाही सापडणार नाही.

सच्च्या प्रेमाची अद्भुत गाथा - अमृता इमरोजची लव्ह स्टोरी ....

Submitted by अजातशत्रू on 24 June, 2016 - 03:27

शारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असते ? जाणून घ्यायचंय ?
मग अवश्य वाचा सच्च्या प्रेमाची मधुर गाथा ....
ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर ?
ती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही.
एकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य ?
मग 'तिला'च याची जाणीव होते अन ती स्वतःची सारी कुचंबणा त्याच्या गळी उतरवते. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं.

हेलेन ओ ग्रेडी कोर्स संबंधी

Submitted by मी अमि on 23 June, 2016 - 05:17

मुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का?
http://www.helenogrady.co.in/website/index.php/about

शब्दखुणा: 

काकू

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 08:15

Thank you
आज माझी आई ऐशीच्या घरात आहे. पण म्हणतात ना, म्हातारपणी पर्यंत टिकते ते खरे सौंदर्य . आजही जर सौंदर्य स्पर्धेत तिने भाग घेतला तर तीच जिंकेल इतकी ती सुंदर दिसते . पांढर्या शुभ्र केसांचा अंबाडा, लक्ख गोरा रंग व ताठ सुधृढ शरीर . अजूनही ती कोणतीच गोळी खात नाही नव्हे तिच्या शरीराला गरजच नाही.
आजवरचा तिचा प्रवास जरी सुखवस्तू झाला तरी अजूनही तो टिकण्याचे एक रहस्य आहे. माझ्यामते आजपर्यंत तिने इतरांसाठी केलेल्या सेवेचेच हे फळ आहे . ती सेवा जी तिने अगदी मनापासून केली . त्यासाठी फळाची अपेक्षाच ठेवली नाही.

डायरीतला एक दिवस

Submitted by विद्या भुतकर on 8 June, 2016 - 18:31

आजपण सकाळी लवकर जाग आलीच नाही. रोजची रडारड आहेच मग. त्यात स्वप्नीलची काहीही मदत नसते सकाळी. स्वत:चं आवरून जातो फक्त. बिघडवून ठेवलाय आईने, दुसरं काय? असली वळणं लहानपणीच लावायला पाहिजे होती. आमचं नशीब कुठे इतकं? त्यात हा यश, अजिबात काही आवारात नाही. सगळी ढकलगाडी आहे. आणि जरा रागावलं की ओठ काढून बसतो. कित्ती क्यूट दिसतो. अगदी सशाचं पिल्लूच. मम्मिशिवाय याचं पान हलत नाही. Happy अगदी लेसही मीच बांधून द्यायची याच्या शूजची. याला शाळेत सोडायचं म्हणजे जीवावर येतं. काय करणार ?

डांबऱ्या !!

Submitted by विद्या भुतकर on 5 June, 2016 - 14:27

डांबऱ्या जन्मला तेव्हा केवळ मुलगा होता म्हणून जिवंत राहिला. इतका काळा होता की मुलगी असता तर केंव्हाच त्याच्या बापानं तिचा गळा दाबून कचऱ्यात फेकून आला असता. त्याचा त्वचेचा रंग, डोक्यावरच्या केसांचा रंग , तळहाताचा गुलाबी शिरा दिसणारा रंग आणि ओठांचा निम्मा लाल रंग मिश्रित काळा रंग हे सगळे म्हणजे एकाच रंगाच्या किती शेड्स असतात याचं जिवंत उदाहरण होते. शाळेत पोरांनी ठेवलेलं हे त्याचं नाव, 'डांबऱ्या'. अगदी गावात डांबरी रस्ते नसेनात का? लहान असताना लई राग यायचा त्याला. हळूहळू त्यानं ते चिडवणं स्वीकारलं, आपलं नाव आणि रूपही.

कोष

Submitted by nileshnamjoshi on 5 June, 2016 - 09:05

अळी जेव्हा कोश धारण करते तेव्हा तिचे फुलपाखरात रुपांतर होते
मैत्रीला जेव्हा भावनांचा स्पर्श होतो तेव्हा त्याचे प्रेमात रुपांतर होते

Pages

Subscribe to RSS - नातीगोती