इलेक्ट्रॉनिक्स

लॅपटॉपशी संबंधीत समस्या

0

माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.

पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्‍याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.

ऊर्जेचे अंतरंग-१५: फ्लेमिंग यांचे नियम

0

चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतक्षेत्र यांत घनिष्ट संबंध असल्याचे खूपच पूर्वीपासून लक्षात आलेले आहे. एका क्षेत्रात कुठलेही बदल घडत असल्यास ते दुसर्‍या क्षेत्रास जन्म देतात असेही आढळून आले. या नव्या क्षेत्राच्या निर्मितीची दिशा निश्चित करणारा अभ्यास फ्लेमिंग यांनी केला होता.

विडीओ रेकॉर्डिंग मधला थोडा भाग सेव्ह करून पाठवता / अपलोड करता येतो का ?

माझ्या मुलीच्या शाळेच्या स्नेह संमेलनाची सीडी मिळाल्ये, नवरा परदेशात आहे, मी सीडी मधला फक्त तिच्या नाचाचा भाग कुठे अपलोड करून त्याला पाठवू शकते का ?

व्हिडिओ कॅमेरा बिघडला!

0

माझा २ वर्षे जुना सोनी कॅमकॅडोर मध्ये आता बटन ऑन केले कि, "रिट्रायव्हिंग' असा संदेश येतो आणि काहीच होत नाही. शुट, फोटो काही करु शकत नाही. सतत रिट्रयव्हिंग चालु राहते....... उपाय काय करावा?

बॅटरी काढुन, पुन्हा टाकुन ट्राय केले. जमले नाही.

त्यातील डाटा सेफ असेल का? काढता येईल का? भारतात नेउन? बॅकप आहे, पण काही व्हिडीओ चे नाही केलेले. ते जरा कमी महत्वाचे होते. ...
धन्यवाद!

लॅपटॉप कुठला घ्यावा?

मला नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे. बजेट ३० ते ४० हजार आहे.
कुठल्या कंपनीचा घ्यावा?
कृपया सल्ला द्या.

वॉशर/ ड्रायर बद्दल माहिती

0

मला इथे (अमेरिकेत) वॉशर/ ड्रायर विकत घ्यायचं आहे. कुठल्या कंपनीचं घ्यावं. घेतानां नेमक्या काय गोष्टी विचारात घ्यायला हव्यात? मी ऑनलाईन बर्‍याच ठिकाणी पाहिलं, पण त्या माहितीवरुन अजुनच गोंधळ वाढला. मायबोलीकरांकडुन ह्याबाबतीत माहिती मिळाली तर मला वॉशर/ ड्रायर विकत घ्यायला सोप्पं पडेल.
अगाऊ धन्यवाद!

मोबाईल कुठला घ्यावा ?

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

आयफोन अ‍ॅप्स

0

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

एल सी डी टीव्ही - (अमेरिकेहुन भारतात नेणे) काही प्रश्न

नमस्कार,

(मी गूगल इ. मधे शोधतच आहे पण इथे कोणाला ठाउक असेल तर विचारावे म्हणुन मी विचारत आहे).

१. अमेरिकेहुन भारतात कोणी एल सी डी टीवी नेला आहे का? असल्यास ड्युटी किती भरावी लागली?
२. आपल्या सामानाबरोबर चेक इन करता येतो का?
३. तिथे नेउन कन्वर्टर इ घेण्यात किती खर्च आला?
४. इथुन मल्टी सीस्टीम टीव्ही घेउन गेले तर कसे पडते?
(वरील उत्तरांव्यतिरिक्त इतर काही कॉमेंट्स असल्यास जरुर सांगाव्यात).

धन्यवाद.

रूम हीटर

0

मला भारतात /अमेरिकेत मिळणार्‍या रुम हीटरविषयी माहिती हवी आहे. इतरान्नाही उपयोगी पडेल असेल वाटते म्हणुन हा लेखनाचा धागा.

भारतात (पुण्यात) रुम हिटर मिळतात त्याचा कुणाला अनुभव आहे का?
असल्यास कोणत्या कम्पनीचा, कोणते मॉडेल चान्गले?
अमेरिकेतुन भारतात नेता येईल का? म्हणजे तिथे २२० वोल्ट ला चालतात का हे हिटर?
नेल्यास कस्टममध्ये काही अडचण येण्याची शक्यता?
अजुन काही पर्याय्/माहिती असल्यास कृपया शेअर करा.
धन्यवाद!!