नातीगोती

एक न पाठवलेली गोष्ट

Submitted by विद्या भुतकर on 30 November, 2016 - 00:12

ती सकाळची दुसरी झोप काढून उठली. सकाळी ५.३०-६ पासून नवऱ्याचा डबा, मुलाला उठवून, आवरून शाळेत पाठवणे सर्व ७ च्या आत होऊन जातं. मग उगाच कधी चहा घेत, पेपर वाचत वेळ घालवायचा तर कधी असा एखादी डुलकी काढून. कधी लिहायची इच्छा असली की मग कामाला मावशी आल्या तरी तिचं उठणं व्हायचं नाही. त्या आपलं दिलेलं काम करून निघून जायच्या. तर कधी अगदीच त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचंही काम थांबवून बसायची. मावशींना आता सवय झाली होती तिच्या अशा वागण्याची. त्याही ती बोलायला लागली की घरचं सांगायच्या, कधी शेजारणीचं. गेले तीनचार दिवस डोक्यात सगळ्या गोष्टींचा गोंधळ चालू होता. कसं आणि काय काय लिहावं सुचत नव्हतं.

थोडे दिवस

Submitted by सुमुक्ता on 25 November, 2016 - 05:44

इवलेसे हात तुझे सामावू दे माझ्या हातातच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

निरर्थक बडबडणे तुझे ऐकू येऊ दे सततच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

घरभर माझ्यामागे फिर तू अजून रांगतच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

हट्ट तुझा मला पुरवत राहू देत कायमच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

हास्य निरागस तुझे घरात राहू दे फुलतच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

अनुभवू दे मला लहानपण तुझे अजूनच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

सून आणि मानसिकता

Submitted by सुहृद on 15 November, 2016 - 06:44

दोन दिवस झाले मनात एक रुखरुख लागुन राहिली आहे, कुठे बोला म्हणून सर्वांनाच सांगते.

परवा मी आणि माझा नवरा खाली पार्किंग लॉटमधे थांबलो होतो, आमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या काकांच्या मुलाने स्विफ्ट डिझायर कार घेतली. त्याला गाडी चालवण्याचा सराव जास्त नसल्याने दोन तीन ठिकाणी कार घासली होती. तर ते त्या बद्दल सांगत होते आणि तक्रार करत होते. (वय 60 दोन्ही काकांचे)

आता मुलांना काही बोलायचे नाही, बिलकुल ऐकत नाहीत पार्क करताना काळजी घेत नाही वै. वै.

यातच त्यांचे एक शेजारी पण सुरु झाले.

आता आम्ही पण काही बोललो तर ऐकत नाहीत. मुले तर ऐकत नाहीतच पण सुना जास्तच..

शब्दखुणा: 

ट्रिक ऑर ट्रीट

Submitted by विद्या भुतकर on 10 November, 2016 - 00:20

परवा हॅलोवीनला मुले ट्रिक ऑर ट्रीट ला जाऊन आली. पहिल्या १० चॉकलेटनंतर त्याचा विश्वास बसत नव्हता की त्याला इतके चॉकलेट्स मिळाले आहे. त्याचे हावभाव बघून खरंच मजा वाटत होती. अजून दोनेक तासात त्याची आक्खी बकेट भरली आणि सर्व चॉकलेट्स घरी आले. दरवर्षी ते सर्व ठेवून टाकणे आणि त्याची विल्हेवाट लावणे मोठं कष्टाचं काम असतं. थोडे एका पिशवीत घालून बाहेर काढून ठेवले होते. त्यातलेच मग कधी हट्ट केला तर द्यायचे असे चालू आहे. आणि कधी कधी खूप छान वाटते जेव्हा ती पिशवी समोर असूनही काढून आणून स्वनिक आम्हाला विचारतो की 'मी हे खाऊ का?' .

वयस्कर व्यक्तींचे आपल्या जीवनातील स्थान

Submitted by सचिन काळे on 8 November, 2016 - 07:01

गेले तेवीसएक वर्षे आमचं त्रिकोणी कुटुंब आहे. मी, सौ.आणि एकुलती एक मुलगी. घरात आमच्यापेक्षा वयस्कर असं कोणी नाही. आजपर्यंत रोजच्या जगण्यामध्ये विविध प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागूनही ईश्वरकृपेने तावून सुलाखून मी त्यातून सहीसलामत बाहेर आलोय.

शब्दखुणा: 

फसलेले क्षण

Submitted by विद्या भुतकर on 6 November, 2016 - 22:46

थोड्या दिवसांपूर्वी एका कॉन्फरन्स साठी गेले होते. तिथे एक मॅनेजर आली होती जिने पांढरास्वेटर घातला होता काळे पोकळ गोल असलेला आणि डार्क पिंक पॅन्ट(फुशिया म्हणतात तो). एकदम भारी दिसत होतं कॉम्बिनेशन. तिकडे मोठ्या लोकांची भाषणं सुरु झाल्यावर रिकामटेकडं डोकं त्या ड्रेसवर खिळलं. हातांना काही चाळा म्हणून मी पेपरवर ते काळे गोल गोल काढत बसले आणि मनात विचार आला असा एखादं चित्र कॅनवासवर काढलं तर? पांढऱ्या शुभ्र कॅनवासवर काळे गोळे( एकदम पेनाने रेघोट्या काढल्यासारखे) आणि १/४ हिस्सा फुशिया रंगाचा. एकदा डोक्यात आल्यावर ते ट्राय करायचा विचार पक्का झालाच. दिवाळीमुळे वेळही मिळत नव्हता.

बिन्डोकडी

Submitted by kokatay on 2 November, 2016 - 15:54

आज माझी बिन्डोकडी तीन वर्षाची झाली ! माझ्या पायथ्याशी बसलेली हि काळी मांजर आता माझं तिसरं मुलंच झालं आहे हे माझ्या लक्षात आले. कुणासठाऊक कां पण जेव्हा ती घरात आली म्हणजे आणली गेली तेव्हा तिचे ऑफिशिअल नाव " डचेस " असे मुलांनी ठेवले होते, पण तिला फारसं काही समजत नाही अशी माझी समज आणि राग असल्यामुळे तिला मी "बिनडोक " असं म्हणायला सुरुवात केली, आणि आज रागाने नाही पण प्रेमाचं ते नाव झालं आहे .

'आई' झाल्यावर......पुढे काय?

Submitted by विद्या भुतकर on 16 October, 2016 - 21:04

आजकाल 'दिवस गेले' म्हटलं की इंटरनेटवर ढिगाने माहिती मिळते. भरपूर पुस्तकेही आहेत. शिवाय मी तर शिकागो मध्ये असताना एक-दोन टीव्ही सिरीयलही बघायचे. त्यामुळे मला वाटते की आपल्या आईपेक्षा आपल्याला डिलिव्हरीच्या आधी बरीच माहिती मिळालेली असते. पण 'आई' झाल्यावर पुढे काय? यावर कुणीच कधीच मला सांगितलं नव्हतं जे मला वाटतं बोलणं गरजेचं होतं. यातील बरीचशी माहिती कुठेतरी मिळेलही पण मला मात्र त्या अनुभवातूनच जावे लागले होते. काही अनेक मैत्रिणींना पाहून लक्षात आले आहेत. कदाचित हे सर्व मुद्दे वाचून कुणी काही माझ्याबद्दल मत बनवलं तर मी काही करू शकत नाही.

पाक कलांकारांवर टाकलेल्या बहिष्काराच्या निमित्ताने ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2016 - 12:43

जेव्हा पाकिस्तानशी आपले बिनसते तेव्हा पहिली कुर्‍हाड सिनेकलाकार आणि क्रिकेटपटूंवरच पडते हे आपल्याला नवीन नाही. वर्षानुवर्षे हे होत आले आहे. जेव्हा आपले त्यांच्याशी संबंध बिघडलेले असतात तेव्हा तेथील कलाकारांना आणि खेळाडूंना, त्यातही प्रामुख्याने क्रिकेटपटूंना आपले दरवाजे बंद होतात. जेव्हा आपण मैत्रीचे प्रस्ताव आणि अमन की आशा मोडमध्ये असतो तेव्हा कलाकारच काय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा गळाभेटी घेतल्या जातात.

शब्दखुणा: 

युग्म!

Submitted by चिट्टी on 7 October, 2016 - 05:15

माझ्या ओठांच्या सायीला
तुझ्या ओठांची साखर
माझ्या भिजल्या मनाला
तुझ्या पंखांची पाखर

माझ्या अंगांगा लाभावी
तुझ्या स्पर्शाचीच लेणी
नकळतशी सुटावी
माझ्या पाठीवर वेणी

तुझा श्वास माझा श्वास
व्हावे हवेनेही कुंद
युग्म भारले पाहता
यामिनीने व्हावे धुंद

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नातीगोती