नातीगोती

परगावी राहणाऱ्या प्रियजनांची काळजी

Submitted by सिम्बा on 27 September, 2016 - 09:15

मायबोलीच्या जुन्या धाग्यांचे उत्खनन करताना मधुरिमा यांचा हा धागा सापडला

आई वडिलांची काळजी http://www.maayboli.com/node/2577?page=1

योगयोगाने मी सुद्धा नोकरी साठी आई वडिलांपासून दूर राहतो आहे, माझ्या एकदोन कलीग्स न आलेले अनुभव, अडचणी यांनी एकटे असणारे सिनिअर सिटीझन्स हे समस्या प्रकर्षाने समोर आली.
एकटे आणणाऱ्या सिनिअर सिटीझन्स (सध्या तरी फक्त पुणे शहर) साठी एक service चालू करण्याचा विचार मनात मूळ धरतो आहे.

१) व.ना चा एक वर्ग आहे जो उठून अथश्री सारख्या सोसायटी मध्ये जाऊ शकतो,

सायकॉलॉजिकल काउंसेलर्स

Submitted by मी अमि on 26 September, 2016 - 08:25

दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.

दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .

Submitted by मार्गी on 18 September, 2016 - 12:10

प्रिय अदू. . . .

काल तुझा दुसरा वाढदिवस झाला! तू दोन वर्षांची झालीस! कालचं तुझं नाचणं, सेलिब्रेशनमध्ये हसणं, सगळ्यांसोबत खेळणं, गोल गोल फिरणं आणि न कंटाळता न रडता अखंड स्टॅमिना ठेवणं. . . खरोखर शब्द फार फार अपुरे आहेत. मला काल तुझी आणखीन एक गोष्ट विशेष वाटली. तुझ्या स्वभावाचा तो भागच आहे. तुझी निरागसता! सहज भाव! मन खरोखर इतकं शुद्ध नितळ असू शकतं? हो, असू शकतं, असतं, हे तुझ्याकडे बघून जाणवतं अदू. म्हणून कालची बर्थडे पार्टी ही 'सूर निरागस हो. . .' अशीच होती. . . .

संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

Submitted by कविन on 14 September, 2016 - 03:46

सीन:
गणपती विसर्जनाचा दिवस.... स्टाफ़ गेलाय सुट्‍टीवर..... आदमी १ टेबल ३ ..बहोत नाईंसाफी है रे भाय! पर करे क्या...नाईलाज को क्या ईलाज... काम देई दाम आणि दाम करी काम च्या चक्रात अडकलेय ही दुनिया.... त्यातुन बॉस माझा पक्का बनिया. काम तर व्हायलाच हवं, घरीही लवकर जायलाच हवं. काय बाई करु? कस्सं मी करु? काही कळेना ..मला सुचेना

मला जायचऽऽय लवकर
साऽहेब म्हणतोऽऽ काम कर
असिस्टंट गेलाऽऽय सुट्‍टीवर
शिपाई पडीकऽ व्हॉटस ऍप वर

सीन: साहेबाची इमेल आली...वाचून माझी त्रेधा उडली..केबीन मधे लगोलग फ़ाईल घेऊन स्वारी गेली.

सायबाचं एकच टुमणं..

साहेब म्हणतो काम कर

पितृपक्ष आणि पितृतर्पण

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 13 September, 2016 - 23:57

नमस्कार

सद्गुरु, गुरुसंस्था, कुलदेवता, पितृदेवता व समस्त हिंदू बांधवांना सविनय सादर दंडवत करून अल्पशी सेवा सादर करतो..

भाद्रपद कृष्ण पक्ष अर्थात् पितृपक्ष हा पितृगणांची सेवा करायचा विशेष काल आपल्याला पूर्वसुरींनी सांगितला आहे.

अवघे धरू सुपंथ

Submitted by स्वीटर टॉकर on 8 September, 2016 - 12:53

माझे वडील स्टेट बॅन्केत असल्यामुळे आम्ही दर काही वर्षांनी महाराष्ट्रातच पण नवीन ठिकाणी स्थलांतरित व्हायचो. माझ्या आईवडिलांना भाषणं ऐकायची अतिशय आवड होती. गावात कोणीही चांगला वक्ता आला की दोघही मला घेऊन जायचे. वसंत व्याख्यानमाला तर कधीही चुकवली नाही. त्या विचारवंतांचे विचार, ते मांडण्याची पद्धत, एखादा अवघड मुद्दा सोप्या उदाहरणांचा आधार घेऊन समजावून देण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे त्यांनी केलेलं कार्य, हे सगळं बघून मी भारून जायची.

तुमच्या आमच्यासारखेच हे लोक, पण अवतीभवतीच्या जगाच्या निरीक्षणातून, त्यांना आलेल्या चांगल्यावाईट अनुभवांतून, संकटांमधून हे किती वेगळी आणि सकारात्मक शिकवण घेतात!

बलात्कार असाही आणि तसाही

Submitted by विद्या भुतकर on 29 August, 2016 - 08:01

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले.

निरागस ......

Submitted by अजातशत्रू on 27 August, 2016 - 08:25

एका भोळ्या भाबडया माणसाची निरागस सत्यकथा...
"बा इठ्ठला, काय केलस रे ! इठ्ठला रे !" कालिंदीने फोडलेला तो आर्त टाहो राऊ पाटलाच्या चिरेबंदी वाड्याला चिरून गेला, पांदीतल्या पारंब्यामध्ये गुरफटून गेला, पारावरच्या वड पिंपळात घुमून गेला, गावकुसातल्या पाण्याच्या आडात खोलवर घुमला अन सरते शेवटी पांडुरंगाच्या देवळाच्या शिखरात झिरपला. राऊ पाटलाच्या वस्तीवर असणारया खोपटात कालिंदीने फोडलेला टाहो दूरवर घुमला. त्या आवजाने रानातल्या पाखरांचा आवाज देखील थांबला. विहिरीतले पारवे गपगार झाले.

"का रे दुरावा, का रे अबोला" Hard Talk

Submitted by माधवा on 21 August, 2016 - 01:27

"का रे दुरावा, का रे अबोला"

13592638_1062607553817148_7155818238642519151_n.jpg

कोणत्या तरी वादावरून आपण एखाद्याशी अबोला धरतो. आता खरं सांगा! आपणही तेव्हा मनातून खूप बेचैन असतो. बरोबर ना! आपल्याला तो अबोला मनापासून नको असतो, पण काही कारणास्तव आपल्याला पुन्हा त्या व्यक्तीपाशी जाऊन बोलणं कठीण जात असेल. अशा वेळी ज्या व्यक्तीशी आपण अबोला धरलेला असेल, त्या व्यक्तीला भेटून एक ठिकाणी शांतपणे संवाद साधून तो वाद समोरसमोरच मोकळा करायचा. यालाच Hard Talk असंही म्हटलं जातं.

Pages

Subscribe to RSS - नातीगोती