नातीगोती

कुत्र्याला छानसे "मराठी" नाव सुचवा.

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 12 January, 2017 - 10:41

दादाच्या फर्माईशीनुसार कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. पूर्वतयारी झाली आहे. म्हणजेच घरच्या सर्वांची मनाची तयारी झाली आहे. कारण आमच्याकडे पर्यायच नाही. आईबाबांनी दादाकडून एक वचन घेतले आहे. सून आम्ही आमच्या पसंतीची आनणार. बाकी तू कोणालाही घरी घेऊन ये. म्हणून दादाचे मित्रमैत्रीणी अधूनमधून आमच्या घरी येत जात राहतात. पण बहुधा आता त्याचे कुठेतरी जुळले असावे. म्हणून घरच्यांनी वैतागून स्वत:च्या पसंतीची सून ही अट मागे घ्यावी यासाठी त्याने घरच्यांना त्रास द्यायला कुत्रा घरी आणायचे ठरवले आहे. मुक्या प्राण्यांचा वापर लोक कसे करतील सांगता येत नाही. तरी खाण्यासाठी करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच.

इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग शेवटचा (आतापुरता तरी :) )

Submitted by विद्या भुतकर on 11 January, 2017 - 18:30

इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग ५

Submitted by विद्या भुतकर on 10 January, 2017 - 00:02

भाग ४: http://www.maayboli.com/node/61337

रितू हादरली होती, मुळापासून की काय म्हणतात ना तसं ! आयुष्यात जास्तीत जास्त एखाद्या प्रॉजेक्ट मध्ये त्रास झाला म्हणून रडली असेल किंवा चांगले मार्क मिळाले नाही म्हणून. काही वेळा आनंद सोबत नव्हता तेंव्हाही. पण हे असं काही जग उलथवून टाकणारं घडलं नव्हतं. कितीतरी वेळ ती त्या 'टेस्ट' कडे बघत होती आणि मधेच रडत होती.

आनंदही बराच घाबरला होता. मुळात हे असं काही होऊ शकतं याचा विचारच त्याने केला नव्हता. त्यामुळे त्याच्यापुढे काय करायला हवं हेही कळत नव्हतं त्याला. त्याने रितूला समजावण्याचा प्रयत्न केला.

शब्दांचे घाव

Submitted by santosh bhosale on 18 December, 2016 - 03:24

पहीलीच कविता पोस्ट करत आहे चुकल्यास कळवावे
शब्दांचे घाव

माझे मन मला एकदा म्हणाले
चल शब्दांच्या गावी जाउ
कशी चिरली जातात हृदय शब्दाने
आपणही एकदा पाहुन येउ

मी मनाला समजावण्याचा प्रयत्न केला
नको रे बाबा शब्दांचे घाव तुला नि मलाही नाही सोसायचे
एखादा शब्द ऐकलास तर
टचकन डोळ्यात पाणी यायचे .

पण मन मात्र ऐकेना
ते हट्ट धरुन बसलं
शब्दांच्या गावी जाण्यासाठी
माझ्यावरती रुसलं

मग मात्र मला ऐकाव लागलं
मनाला माझ्या
शब्दांच्या गावी न्यावं लागलं

गावाच्या वेशीवरती
स्वागत मात्र हसुन झालं
मलाही आश्चर्य वाटलं अरेच्चा,
हे गाव इतकं कसं बदललं

बंधन

Submitted by सुमुक्ता on 6 December, 2016 - 06:30

विद्यापीठाच्या तिच्या छोटेखानी क्वार्टरचे कुलूप उघडून मेधा आत आली. कपडे बदलून कॉफीचा एक मग घेऊन ती तिच्या स्टडी मध्ये आली. पण आज तिचं मन कामात लागणार नव्हतं. मग तशीच उठून बाल्कनी मध्ये जाऊन उभी राहिली. अजूनही संधीप्रकाश होता पण दूरवर विद्यापीठातील काही इमारतींचे दिवे हळूहळू लुकलुकयाला लागले होते. अशा कातर वातावरणात तिचे मन उदासीने आणखीनच भरून गेले. खरेतर आज तिच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केल्याबद्दल मिळणारा भारतातील मानाचा भटनागर पुरस्कार तिला मिळणार अशी ई-मेल तिला आज सकाळीच मिळाली होती.

लग्न - एक चर्चा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2016 - 01:54

प्रेम माणसाला आंधळे करते...
लग्न डोळे उघडते..
उघड्या डोळ्यांनी जग दिसते..
ते जग फार सुंदर असते..
पण आपल्या काही फायद्याचे नसते,
........ कारण आपले लग्न झालेले असते Happy

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

हे शब्द माझे असले तरी विचार माझे नाहीत, बस्स असेच काहीसे ऐकत असतो माझ्या विवाहीत मित्रांकडून, पुरुष आणि महिला दोघांकडून..
कधी गंमतीत तर कधी सिरीअसली..

एक विनोद कम तत्वज्ञान कुठेतरी वाचलेले,
अविवाहीत विचार करतात की की विवाहीतांची मजा आहे,
विवाहीत विचार करतात की अविवाहीतांची मजा आहे
फरक ईतकाच, विवाहीत हा विचार दिवसा करतात, तर अविवाहीत रात्री Wink

शब्दखुणा: 

इष्क मुबारक, दर्द मुबारक

Submitted by विद्या भुतकर on 4 December, 2016 - 18:24

सकाळ सकाळी रितू मस्त आवरून ऑफिसला निघाली होती. आज तिच्या आवरण्यात एक वेगळाच उत्साह दिसून येत होता.खूप दिवसांपासून अडकलेलं एक काम होईल असं वाटत होतं. या सध्याच्या कंपनीत नोकरीला लागून पाच वर्षं झाली होती. मन लावून काम करणारीच ती, पहिल्यापासूनच. कितीही साधं काम दिलं तरी ते जमेल तितकं उत्तमपणे पार पाडायचं, अगदी मन लावून काम करायचं. त्यामुळे आहे तिथे चांगले प्रमोशन मिळतही गेले तिला. पण आपण कशात चांगले असलो ना की मग लोक दुसरा पर्याय शोधत बसत नाहीत. चालू आहे ना काम? मग राहू दे तिला तिथेच असे म्हणून प्रमोशन देत एकाच प्रोजेक्टमध्ये ठेवून घेतले.

एक न पाठवलेली गोष्ट

Submitted by विद्या भुतकर on 30 November, 2016 - 00:12

ती सकाळची दुसरी झोप काढून उठली. सकाळी ५.३०-६ पासून नवऱ्याचा डबा, मुलाला उठवून, आवरून शाळेत पाठवणे सर्व ७ च्या आत होऊन जातं. मग उगाच कधी चहा घेत, पेपर वाचत वेळ घालवायचा तर कधी असा एखादी डुलकी काढून. कधी लिहायची इच्छा असली की मग कामाला मावशी आल्या तरी तिचं उठणं व्हायचं नाही. त्या आपलं दिलेलं काम करून निघून जायच्या. तर कधी अगदीच त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचंही काम थांबवून बसायची. मावशींना आता सवय झाली होती तिच्या अशा वागण्याची. त्याही ती बोलायला लागली की घरचं सांगायच्या, कधी शेजारणीचं. गेले तीनचार दिवस डोक्यात सगळ्या गोष्टींचा गोंधळ चालू होता. कसं आणि काय काय लिहावं सुचत नव्हतं.

Pages

Subscribe to RSS - नातीगोती