भूक

आकाशाचं ताट

आकाशाचं ताट

दोन्ही तान्ह्याना बाई गं
भुकेलेच जोजावले
लगी मनाच्या भांड्यात
दोन सूर्वे उगि्वले
सुर्वे पाहोन की माहे
सारे भान हरपले
माह्या भाकरीच्या तव्या
दोन तारे करपले
चमचमीत वठली चांदण्यांची गं उसळ
आकाशाच्या अंधाराची खर्डा-चटणी खट्याळ
मीन राशीची सुरमई
तळली पिठूर लावून
पूर्वे फुटलं तांबडं
त्याचं केलं कालवन
सांज रंगांची जिलेबी
केसरात गं घोळली
चव घेता घेता कशी
माही जीभ ती पोळली
असं भरलं भरलं
माजं आकाशाचं ताट
पंचपक्वान खाताना
माही झाली पुरेवाट
हात धुता धुता माझा घरधनी की हो आला
मी म्हनाले की बाबा तुहे उसीर का जाला

अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०

अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०
समीक्षा (माझी पत्नी) आमच्या ११ दिवसांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन ४ ऑगस्ट रोजी २ महिने आराम करण्यासाठी माहेरी पुण्याला गेली. नागपूरला डॉ.मंगला केतकर यांच्या दवाखान्यात २४ जुलै २०१० ला तिने बाळाला जन्म दिला. तिला व मुलाला ४ तारखेला ला संध्याकाळी नागपूरला रेल्वे स्टेशनवर सोडले. सोबत तिची आई होती.