मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
मंडळी लक्ष देवून वाचा.
२०१० च्या पहिल्या होळी विशेषांकानंतर जालरंग प्रकाशन आणत आहे तिसरा होळी विशेषांक २०१२.
ह्या अंकाचे प्रकाशन होळीच्या दिवशी होईल.
माझा वैशिष्टयपूर्ण सुभाषितसंग्रह!-[२]
माझा वैशिष्टयपूर्ण सुभाषितसंग्रह!-[१] लिंक- http://www.maayboli.com/node/32396
हितोपदेश, पंचतंत्र, रामायण, महाभारत, भगवद्गीता, कौटिलीय अर्थशास्त्र आदी ग्रंथ ही सुभाषितांची भांडारे आहेत. त्यातूनच ही सुभाषिते आपल्यापर्यंत पोचली आहेत.
प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद
सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे
खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक
प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या
असणार्या कळ्या संध्याकाळी टपोर्या झालेल्या पाहताना मला खूप मजा
वाटायची.
’काळ आला होता पण वेळ आली नव्हती.’ हो. अगदी हेच काल आम्ही स्वत: अनुभवलं. त्याच असं झाल, वेळ साधारण ७-७.१५ ची. ऒफ़िसमधून घरी जाताना, वाटेत रिलायन्सच्या ऒफ़िसमध्ये चेक द्यायचा होता. म्हणून आम्ही नळस्टॊपला, पेट्रोलपंपासमोर, रस्त्यापलिकडे, ’मामा’ला विचारून गाडी पार्क केली. आणि नेहमी गाडीवर बसून रहाणारी मी, आज तिला पातांजलीच्या दुकानातून काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून तिच्याबरोबर रस्ता क्रॊस करून गेले. चेक देऊन, खरेदी करून परत निघालो. तर ’लाल’ सिग्नल असल्यामुळे,
सप्रेम नमस्कार.
हा लेख प्रकाशित करताना सर्वप्रथम मायबोली प्रशासनाचे मनःपुर्वक आभार मानत आहे. या व्यासपीठावरील चैतन्यमय वातावरण, अनेकविध क्षेत्रात तज्ञ असलेल्या सदस्यांची मोठी संख्या व प्रशासनाची उदार प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती यामुळे आपापल्या आवडीनिवडीनुसार अनेक नवीन सदस्यांचा परिचय होणे व त्यातून असे उपक्रम निर्माण होणे हे शक्य होते.
मार्कोनी की आणखी कोणी रेडिओ प्रथमत बनवला यावर कदाचित मतभेद असतील पण गेले शंबर वर्षे सुरवातीला श्रीमंतीच प्रतिक असलेला रेडिओ पुढे सर्वसामान्यांच्या सामन्य करमणुकीच साधन बनला. तर कित्येकांच्या उपजिविकेचे साधन बनला. रेडीओ कलाकार, टेक्निशियन्स, रेडिओ उत्पादन करणार्या कंपन्या, विक्री आणि सेवा देणारे व्यवसाईक या सार्यांना व्यापुन उरलेला असा हा रेडिओ.
माझ्या लहानपणी आम्ही चाळीत रहायचो. माझी बहीण माझ्या पेक्षा मोठी. माझ्या जन्माच्या नंतर कौतुकाने घरात प्रवेश करणार कोणी असेल तर तो मर्फी बनावटीचा रेडीओ.
माझा वैशिष्टयपूर्ण सुभाषितसंग्रह!-[१]
’भुक्कंड’ नाव ऐकायला / वाचायला सुखद वाटत नाही म्हणून कांहीजण त्या धाग्यापासून दूरच राहिले. ’भुक्कंड’च्या प्रतिसादात कांही रसिक मजकूराला भुक्कड म्हणाले. तसा त्यांना हक्कही आहे. पण त्यांचे मत त्यांच्यापुरते! पण त्यामुळे मला 'अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख' या संस्कृत वचनाची आठवण झाली. हे वचन ज्या सुप्रसिद्ध सुभाषितात आहे ते सुभाषित असे-
इतर कर्मफलानी यदृच्छया! विलिख तानी सहे चतुरानन!
अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख!
बर्याच दिवसांपासून आपण वाचत आलेलो आहोत कीं चीन जम्मू-काश्मीरला विवादित प्रदेश मानतो व तेथील आपल्या नागरिकांना व्हिसा देताना त्यांची वकिलात (Embassy/Consulate) त्या व्हिसाचा शिक्का त्यांच्या भारतीय पासपोर्टच्या पानांवर न मारता तो एका वेगळ्या कागदावर मारते.
नारळाचे झाड म्हणजे कल्पतरूच. त्याच्या पात्या, खोड, नारळ, त्याचे साल, करवंटी अगदी सगळ्याचाच वापर करता येतो. नारळ पाणी म्हणजे तर अमृतासारखेच. नारळाची उंच ऐटदार झाडे कोकण किनार पट्टीवर दाटीवाटीने मिरवताना दिसतात त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बर्याच लोकांचे नारळ व नारळाच्या झाडापासून मिळणार्या इतर उत्पन्नांवर उपजीवीका चालते. नारळाच्या झाडाच्या पात्यांतील काड्यांपासून झाडू तयार होतो. झावळ्यांपासून चटई प्रमाणे झाप तयार करतात, नारळाच्या खोडाचा पुलासाठी उपयोग होतो. ही सगळी माहीती आपण अभ्यासक्रमात शिकतच असतो. पण नारळाच्या झाडापासून अजुन एक उत्पन्न्/पेय निघते ते म्हणजे निरा.
मार्च महिना लागला कि सगळ्यांना वेध लागायचे ते सुट्ट्या कधी सुरू होतात त्याचे. सगळी भावंडे मग एकत्र जमायचो. बाहेरगावी असलेली चुलत भावंडे देखील यायची. रोज दुपारी वेगवेगळे खेळ रंगायचे. जोडीला आम्हा सगळ्याची स्थानिक मित्र-मंडळी देखील असायचीच. मोठी भावंडे क्रिकेट खेळायची तर छोट्यांना बैठे खेळ आवडायचे.