१. २ ते ३ जांभळी, पांढरी भरताची वांगी. (फोटो लवकरच टाकेन)
२. २ पातीचे कांदे, पातीसकट बारीक चिरून
३. १ वा २ हिरवी मिरची, चिरून
४. हवा असल्यास एखादा टमाटो
५. हिरवे मटार
६. कोथिंबीर
७. तेल, मीठ, मोहरी, हवी असल्यास हळद, लाल तिखट
१. वांगी स्वच्छ धूवून, कोरडी करावीत. सुरीने टोचे मारून, तेलाचा हात लावून गॅसवर वा असल्यास निखार्यांवर भाजावीत. टमाटो घेतला असल्यास तो सुद्धा भाजावा (टोचे मारून).
२. वांगी जरा थंड झाल्यावर, साल काढावे. वांग्याला सुटलेलं पाणी सुद्धा घ्यावे. जाडसर मॅश करावे. टमाटो असेल तर, साल काढून बारीक चिरावा.
३. हे सगळं एका मोठ्या बाऊल मधे घ्यावे
४. पातीसकट बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावी.
५. मटार घालावेत. मीठ घालावं. व्यवस्थित एकत्र करावं
६. आता जरा जास्त तेलाची फोडणी करावी. मोहरी, मिरच्या घालाव्यात, हवं असेल तर, हळद, लाल तिखट घालावं. ही फोडणी भरतावर ओतावी. छान कालवून घ्यावं. भरीत तयार आहे. गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर वा लोणी + बाजरीच्या भाकरीबरोबर हाणावं!
मी कधी मुंबईत असली वांगी पाहीली नाहीत, आता आईला विचारून फोटो मागवीन आणि मग टाकीन! बहुदा पुण्यात मिळावीत... बट आय अॅम नॉट शुअर! 

