चित्रपट

अफगाण स्टार

Submitted by मो on 5 April, 2010 - 13:22

काही दिवसांपूर्वी एचबीओ वाहिनीवर 'अफगाण स्टार' ही डॉक्युमेंटरी पाहिली. आपल्याकडचे 'सा रे ग म प' किंवा अमेरिकेतले 'अमेरिकन आयडॉल' ह्यासारखा टॅलेंट हंट शोजची अफगाणी आवृत्ती म्हणजे अफगाण स्टार. २००९ मधली ही डॉक्युमेंटरी अफगाण स्टारच्या तिसर्‍या सिझनचा आढावा घेते. ह्या डॉक्युमेंटरी मधली मुख्य पात्र म्हणजे ४ स्पर्धक रफी, हमीद, लेमा आणि सेतारा आणि स्पर्धेचा सुत्रधार दाऊद. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गाणारे हे तरुण खरच स्फुर्तीदायक आहेत.

विषय: 

आह .. साझ !

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली!
आत्ता तेच वाजतंय - क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या!
saaz movie

विषय: 
प्रकार: 

विहिर

Submitted by टवणे सर on 17 March, 2010 - 09:03

उद्याच्या शुक्रवारी (१९ मार्च) विहिर हा उमेश कुलकर्णीचा (वळु चित्रपटाचा दिग्दर्शक) सती भावे-गिरिश कुलकर्णींच्या कथा/पटकथेवरचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मी जानेवारीमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बघितला होता. त्याच दिवशी हे टिपण लिहिले होते पण इतके दिवस इथे डकवायचे राहून गेले. आता चित्रपट प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने आज इथे पोस्ट करत आहे.

------------------------------------------------------------------------------

कठोपनिषद:

बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यम:
किंस्विद् यमस्य कर्तव्यं यन्मयाऽऽद्य करिष्यति

विषय: 

मी पाहीलेला अवतार!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या बर्‍याच मित्रांनी शिफारस केल्यावर व मिडियामधल्या या चित्रपटाच्या "महानतेच्या" वावड्या उठलेल्या ऐकुन मीही जगातल्या कोट्यावधी प्रेक्षकांसारखा "अवतार-३-डी" चित्रपट बघण्याच्या मोहात पडलो व प्रचंड करमणुक झाली!

विषय: 
प्रकार: 

संवाद : गुरू ठाकूर

Submitted by नमुसी on 22 February, 2010 - 01:28

'नटरंग'च्या प्रोमोजनी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होतीच. गाण्यांच्या क्लिप्स पाहून तर कधी एकदा पूर्ण गाणी ऐकायला मिळतील असं झालं. वर्तमानपत्रांत जेव्हा 'नटरंग'बद्दल लिहून आलं, तेव्हा त्यात अतुल कुलकर्णीशिवाय एक नाव प्रामुख्याने होतं, ते गुरु ठाकुर ( Guru Thakur ) यांचं. या चित्रपटाचे संवाद आणि गाणी - दोन्ही गुरु ठाकुर यांनीच लिहिलंय. मुळात त्यांची गाणी केवळ अप्रतिम, आणि त्यांना लाभलेली अजय-अतुलच्या संगीताची साथ म्हणजे दुग्धशर्करा योगच! एव्हाना ही गाणी सर्वांच्या ओठांवर खेळत आहेत यात नवल नाही. 'नटरंग'च्या संवादांत वापरलेली भाषा ही अस्सल कोल्हापुरी माणसाने लिहिलीय, असं वाटतं.

हरिश्चंद्राची फॅक्टरी

Submitted by ऋयाम on 14 February, 2010 - 10:13

आजकालच्या 'एक ग्रॅम-गोल्डन नेकलेस' आणि 'इमिटेशन ज्वेलरी'च्या काळात 'बावनकशी सोन्याचा चपलाहार' दुर्मिळच झालाय! 'हार'च कशाला घेऊन बसता? 'सोनंच' महाग झालंय म्हणा ना..

कितीही 'टुकार' सिनेमा असला तरी 'वन टाईम सी' आहे असे म्हणत बघण्याच्या आजच्या काळात आत्ताच 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' पाहिला आणि थेट 'बावनकशी सोन्याचा चपलाहार'च आठवला!

कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत...
म्हणजे खरंच नाहीत.
अख्खा सिनेमा संपेपर्यंत बसल्या जागेला माणुस खिळुन राहिलेला.
कुठेच 'रॉकेलचा वास' नाही हो या 'साखरेला'... खरंच....
आणि गोड, गोड साखर! वाह!

'ते, अमुक-अमुक होतं, ते असं नाही करायला हवं होतं.... '

विषय: 

चित्रपटांची सौंदर्य-कला समिक्षा (फायनर पॉइन्ट्स)

Submitted by शर्मिला फडके on 10 February, 2010 - 22:23

इश्कियांचं शूटिंग वाई पाचगणी भागात झालय हे वाचलेलं असल्याने मला खेड्याचा महाराष्ट्रीय लूक आहे हे लक्षात आलं होतं. पण फिल्म इन टोटॅलिटी आवडल्याने, किंवा तशा कोनातून विचारच न केल्याने ते खटकलं नाही. पण त्या क्षेत्रांशी संबंधीत असल्यांना खरोखरच खटकलं आणि तो महत्वाचा मुद्दा आहे हे माझ्याही लक्षात आलं. खूपदा काही फायनर पॉइन्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित नसल्याने सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत खरंच येत नाहीत.

मायबोली चित्रपट महोत्सव, ११-१८ फेब्रूवारी २०१०. नागपूर

Submitted by अजय on 6 February, 2010 - 22:39

hoarding-2A.jpg

मायबोली चित्रपट महोत्सव

११-१८ फेब्रूवारी २०१०.
सुदामा सिनेमा,
धरमपेठ, नागपूर

संपर्कः ९७६६४९००८१

hoarding-1A.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

झ्येंडा !!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गेल्या आठवड्यात झेंडा चित्रपट पाहिला..! एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्‍या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले. पण त्यात सामान्य कार्यकर्त्यांची जी घुसमट दाखवलीय...ती लाजवाब! प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने अगदी मनाला भिडले.

सगळे नेते सारखेच! कार्यकर्ते वापरुण घेणे अन सत्तेत सहभाग फक्त जवळच्या लोकांनाच देणे, हा एकजात धंदा! कार्यकर्त्यांना पण त्या वयात काही अक्कल नसते! नुसती मेंढरं, कुणी पण हाका.

शेवटी जेंव्हा नेत्याचे पण पाय मातीचेच आहेत, हे लक्षात येते, तोवर कार्यकर्त्याची माती झालेली असते!

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट