परागकण यांचे रंगीबेरंगी पान

आतला माणूस जो आहे फरारी

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आसमंती घ्यायची आहे भरारी?
फेड आधी या धरेची मग उधारी

शोधतो दाहीदिशांना काय जाणे?
आतला माणूस जो आहे फरारी

मागण्या आधी मिळाले सर्व काही
हात माझे छाटले मी; खबरदारी !

कागदी नावेस का माहीत नाही?
दीपस्तंभ एकही नाही किनारी

वाहवत जातो कुणी नेईल तेथे
आपल्याला आपली मग ये शिसारी

- परागकण

प्रकार: 

खादाड बडबडगीते

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

१.
पापडी चुरमुरे कुरकुरीत लागले
मिरची अन कांदा चरचरित लागले
चिंचेची चटणी आंबट गोड
शेव फरसाण कैरीची फोड
सगळ्याची मिळून केली भेळ
असा आमचा भातुकलीचा खेळ

-----

२.
पुरी फुगली टमाटम
छोल्यांचा वास घमाघम
श्रीखंड खाऊ गप गप
ढेकर देऊ अsब अssब

प्रकार: 

तुझ्यावरची कविता

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

तुझी कविता .. तुझ्यासारखीच
अगदी आठवणीनं जपून ठेवलेली.
पण कितीही शोधली
आत - बाहेर,
तरी नाहीच हाती लागत शेवटी

तुझ्यावरची कविता ...
ती ही अगदी तुझ्यासारखीच !
अखंड शोध; आत - बाहेर
नुसतेच भास; आत - बाहेर
नाहीच सापडत शब्दांत शेवटी ..

शब्दांचे मात्र बघवत नाहीत हाल;
ते अगदी माझ्या वळणावर.
आत - बाहेर घुटमळतात
घुसमटतात;
कधी हुरहुरत
कधी हुळहुळत ...

प्रकार: 

वेळोवेळी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

वेळोवेळी मला
नव्याने समजत जातो ... आपण

तू,
तुझ्या वागण्या बोलण्यातून
शब्द - स्पर्शातून
असण्या - नसण्यातून

आणि मी,
त्यावरच्या माझ्या प्रतिक्रियांमधून

विषय: 
प्रकार: 

--

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

अवकाश आतले
भेदून जावे
-- आकाश व्हावे

____

ऐकवावी कुणाला?
मनातील गाज
.. शब्दांना नाही जाग

प्रकार: 

बेसावध

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

बेसावध

एका बेसावध क्षणी
बांध फुटला ...

काय सरलं
काय उरलं
हिशेब होत राहील
पण,
आत्ता त्याच बांधावर उभा राहून
विचार करतो आहे
त्या क्षणी बेसावध नक्की कोण होतं?

मी?
बांध?
की बांधापलिकडचा निवांतपणे खडे मोजत बसलेला
तरंगमग्न डोह?

प्रकार: 
शब्दखुणा: 

गाण्याचे शब्द

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

या ओळी कुठल्या गाण्यात आहेत कुणाला माहीत आहे का? पूर्ण गाणं मिळालं तर फारच उत्तम.
धन्यवाद.

अदबीने करते पुढती हात मी विड्याचा
पान रामटेकी आहे कात केवड्याचा

प्रकार: 
शब्दखुणा: 

जागा हवी आहे (फ्लॅट)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पुण्यात मगरपट्ट्याला जाणं येणं सोयीचं असेल अशी जागा (भाडेतत्त्वाने - फ्लॅट - २बीएचके) शोधत आहे. कुणाची असल्यास किंवा ओळखीत असल्यास कृपया अवश्य कळवा. बजेट साधारण महिना १२००० रु. हांडेवाडी, कोंढवा वगैरे भागात नको आहे. मराठी शेजार असल्यास उत्तम. माझ्या विचारपुशीत निरोप ठेवलात किंवा व्यक्तिगत ईमेलद्वारा संपर्क केल्यास बरे. धन्यवाद.

प्रकार: 

भारुडाचा अर्थ

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'दादला नको गं बाई मला नवरा नको ग बाई' या भारुडाच अर्थ कुणी उलगडून सांगू शकेल का? माझ्या गंजलेल्या बुद्धी पलिकडलं आहे ते.

आगाऊ धन्यवाद!

प्रकार: 

निसर्गचित्रे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

यंदाच्या उन्हाळ्यात अमेरिकेच्या दोन टोकांना असलेल्या दोन निसर्गरम्य राज्यांना भेट देण्याचा योग आला. तिथली ही काही निसर्गचित्रं.

Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून दिसणारा सूर्योदय
4. Maui - sunrise.jpg

Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून परत खाली उतरायला लागतानाचे दृश्य.
6. Maui - Clouds.jpg

Maui (Hawaii) - समुद्र

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - परागकण यांचे रंगीबेरंगी पान