बडबडगीते

खादाड बडबडगीते

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

१.
पापडी चुरमुरे कुरकुरीत लागले
मिरची अन कांदा चरचरित लागले
चिंचेची चटणी आंबट गोड
शेव फरसाण कैरीची फोड
सगळ्याची मिळून केली भेळ
असा आमचा भातुकलीचा खेळ

-----

२.
पुरी फुगली टमाटम
छोल्यांचा वास घमाघम
श्रीखंड खाऊ गप गप
ढेकर देऊ अsब अssब

प्रकार: 

दोन बडबडगीते

Submitted by पाषाणभेद on 23 October, 2011 - 01:38

दोन बडबडगीते

१) ढग वाजले ढम ढम ढम
ढग वाजले ढम ढम ढम
विज चमकली चम चम चम
पाऊस पडला छम छम छम
नाच नाचूनी भिजले कोण?
भिजले कोण?

२) चिमणे चिमणे

चिमणे चिमणे हे दाणे घे हे दाणे घे
आमच्या बाळाला खेळायला ने खेळायला ने

काऊदादा काऊदादा भुर्रकन ये भुर्रकन ये
आमच्या बाळाला युक्ती दे युक्ती दे

ईकडे ये रे भु भु
बाळाशी खेळतोस का तू?

हम्मा हम्मा शेपूट हलव
आमच्या बाळाला पाळण्यात झुलव

- पाषाणभेद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

Submitted by अभय आर्वीकर on 14 August, 2010 - 01:31

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

मोरा मोरा नाच रे
अंकलिपी वाच रे
वाचता वाचता बोल रे
पृथ्वी कशी गोल रे

गोल चेंडू उडला
सुर्यावरती पडला
कान त्याचा कापला
म्हणून सुर्य तापला

ऊन, हवा आणि
गरम झाले पाणी
पाणी गरम झाले
वाफ़ होऊन आले

सोडूनिया धरती
वाफ़ गेली वरती
आभाळात मगं
तिचे झाले ढगं

ढग वाजे गडगड
वीज चमके कडकड
वारा सुटला सो-सो
पाऊस आला धो-धो

मोरा मोरा नाच रे
श्रावणाचा मास रे
नाचता नाचता सारा
फ़ुलवून दे पिसारा

गुलमोहर: 
Subscribe to RSS - बडबडगीते