परागकण यांचे रंगीबेरंगी पान

सुर्वे मास्तर

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सुर्वे मास्तर गेले. काय वाटलं ते सांगणं अवघड आहे. मी त्यांच्या एकूणएक कविता, लेखन वाचलं आहे वगैरे आव मी आणणार नाही. फारच कमी वाचलं आहे त्यांना मी. पण तरीही आत काहीतरी झालं. असो.

ते गेल्याचं समजलं आणि एक जुनी कविता आठवली. त्यांच्याच एका अस्सल कवितेनी जन्माला घातली ही कविता, त्यांनाच अर्पण.

जागर

प्रत्येकात कुठेतरी एक आत्मा असतो
असं नेहमीच ऐकलं आहे,
आजवर फारशी गरज भासली नाही
पण एकदा त्याच्याशी आमने सामने व्हायचं आहे

त्याला विचारण्यासारखं तसं खूप आहे
पण अजून त्याचे प्रश्न बनले नाहीत.
अनेकांचं म्हणणं आहे की
प्रश्न आणि उत्तरे दोन्ही त्याच्याजवळ आहेत,

विषय: 
प्रकार: 

पाऊलखुणा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

4504259708_68281b7326.jpg

जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पहाते

विषय: 

फुलांच्या पायर्‍या ..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

3653958046_f7fd5b5713.jpg

Nikon Coolpix P60 (Point and shoot)

flickr वर पहायचा असल्यास - http://www.flickr.com/photos/paragkan/3653958046/
(या वेळी फोटो थेट इथेच उपलोड केला आहे. सगळ्यांना बघता येईल अशी आशा आहे.)

विषय: 

भारुड हवं आहे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

'सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहिन तुला'

हे भारुड कुणाकडे mp3 स्वरुपात असल्यास मला हवं आहे.
भारुड कुणी इथे लिहू शकलं तरी उत्तम.

धन्यवाद!

विषय: 
प्रकार: 

रस-सुरस

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दोन जिवाभावाच्या गोष्टींचा संगम ..... रुचकर प्रकाशचित्रे ....

Stuffed mushrooms
Stuffed Mushrooms

विषय: 

आर न पार

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आयुष्य
समुद्रासारखं.
आपण मात्र नेहमीच
उभे असतो किनार्‍यावर
अगदी घट्ट पाय रोवून
धृवालाही खुन्नस देत.

आणि मग
भरती-ओहोटीच्या वेळा येतात
ध्यानीमनी नसताना लाटा रोख बदलतात
पायाखालची वाळू ..... वाळूच ती शेवटी ...
सरकू लागते,
तेव्हा

प्रकार: 

बरंच काही सांगायचं आहे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बर्‍याच काळापूर्वी, माझ्या ब्लॉगवर ही कविता पोस्टली होती. अपूर्ण होती म्हणून. आता ती पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही. पण इतक्या दिवसात त्यात काही नवीन भर पडलेली नाही आणि काही फारसे बदलही केले गेले नाहीत. काहीशी पाल्हाळ लागली आहे हा दोष खराच, पण पर्याय सापडला नाही. असो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मला तसं बरंच काही सांगायचं आहे
काहीबाहीच असेल कदाचित ..
पण बर्‍याच गोष्टींबद्दल सांगायचं आहे ...

प्रकार: 

तिरळे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

उधाणते नजर मावळतीला अन
स्मरणओली वेळ विसावते पापण्यांकाठी
... क्षितिजावरच्या भेटीगाठी!
------------------------------------------

अर्थास शब्द माझा पारखा
उरलो न मी माझ्यासारखा
... तडकलेला आरसा ?

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - परागकण यांचे रंगीबेरंगी पान