पेन

कॅलिग्राफी पेन (DIY)

Submitted by हरिहर. on 18 May, 2019 - 04:05

माझ्या मित्राच्या कथांचा संग्रह प्रकाशित करायचे ठरले. मग काय, घरचे कार्य असल्यासारखा मला उत्साह आला. कथांची निवड, थोडेफार एडिटींग, कथासंग्रहाचे नाव या पासुन ते मुहूर्त कधीचा आणि प्रमुख पाहुणे कोण येथपर्यंत सगळ्या गोष्टींची धांदल उडाली. एकदा असच घरी बसलो असताना त्याच्या कथासंग्रहाचे नाव सुचले. मग नावाबरोबरच एक रफ स्केच काढुन मित्राला टेलेग्राम केले. त्याला नाव तर आवडलेच पण त्या स्केचवर तो खुप खुश झाला. त्यानंतर त्याने माझ्या मागे तगादाच लावला की कसेही होवो पण मुखपृष्ठ तुच करायचे. घरचेच पुस्तक आणि घरचेच प्रकाशन असल्याने मीही उत्साहात मुखपृष्ठ तयार केले.

शब्दखुणा: 

ऑईल ॲन्ड पेन

Submitted by हरिहर. on 2 August, 2018 - 22:44

वडीलांच्या वाढदिवसाला त्यांना समोर बसवून मैफीलीत चालल्या गझल्सच्या तालावर काढलेले पोर्ट्रेट. (२०१८)
ऑईल ऑन कॅन्व्हास.
anna.jpg
हा आहे वारीदरम्यान स्टेशनवर बसलेला वारकरी (२०१२)
पेन ऑन पेपर
warkari.jpg

शब्दखुणा: 

लेखणीचे मनोगत...

Submitted by हर्षल_चव्हाण on 28 January, 2013 - 04:33

काल माझा पेन मला, रडवेलासा होत म्हणाला,
"गरज सरो वैद्य मरो"चा खराखुरा प्रत्यय आला...

लिहिण्यासाठी आता नवा साथीदार मिळाला तुला,
हस्ताक्षराचा जुना दागिना, खोटा झालाय कळले मला...

शाईपेन, बॉलपेन, नावापुरता उरलो मी,
'लिहिणे' म्हणजे काय असते, हे ही अता विसरलो मी...

डायरी माझी मैत्रीणसुद्धा अशीच उदास दिसते फार,
पानापानांवरतीसुद्धा छापील असतो दिवस-वार...

दिसामाजी काहितरी, ब्लॉगवरती उमटत जाते,
मिसळपाव तर खातात ना? मनात कायम घोळत राहते...

मायबोलीचा वावर तुझिया 'बोटां'वरती नाचत राहतो...
टंकल्याशिवाय सुचत नाही, असे तुला मी रोज पाहतो...

काळासोबत बदलत जावे, माणसा तुला आहे ठावे,

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पेन