आकाशवाणी

आकाशवाणी : फिरूनी नवी जन्मेन मी

Submitted by DJ.. on 14 February, 2020 - 02:20

मागील आठवड्यात विकेंडला गावी जाऊन यावे म्हणुन शुक्रवारी भल्या पहाटे उठुन आवरुन बॅग भरुन ८ वाजताच ऑफिसमधे आलो. येताना ऑफीसच्या बसमधे ड्रायव्हरने मोठ्याने रेडिओ लावलेला होता. अगदी नव्या सळसळत-फेसाळत-उसळणार्‍या गाण्यांनी आणि निवेदकाच्या आरडा-ओरडा करीत कानावर आदळणार्‍या गोंगाटाने जीव मेटाकुटीस आला होता. अधेमधे जाहिरातींचा भडिमार सुरू होताच. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त शब्द कानावर आदळत एकामागोमाग एक जाहिराती येऊन फेर धरत होत्या. त्यातली एक कसलीशी इंशुरन्स गाठ पॉलिसीची जाहिरात एका ब्रेकमधे ३-४ दा येत होती आणि ती सतत ऐकुन पोटात गोळा उठत होता.

शब्दखुणा: 

आकाशवाणी केंद्र, यवतमाळ - कविसम्मेलन प्रसारण

Submitted by अभय आर्वीकर on 8 September, 2012 - 08:38

आकाशवाणी केंद्र, यवतमाळ - कविसम्मेलन प्रसारण

दि. २ सप्टेंबर २०१२ ला आकाशवाणी केंद्र, यवतमाळ येथे कविसम्मेलन संपन्न झाले. कविसम्मेलनात नितिन देशमुख, सिद्धार्थ भगत, लक्ष्मण जेवणे, अनंत नांदुरकर, विद्यानंद हाडके, आबेद शेख, मसुद पटेल, किरण मडावी, उज्ज्वल सरदार इत्यादि गझलकारांचाही सहभाग होता. या कवीसम्मेलनाचे प्रसारण आकाशवाणी केंद्र, यवतमाळ वरून शनिवार दि. ८ सप्टेंबर २०१२ ला आणि दि. ९ सप्टेंबर २०१२ ला रात्री ९.३० वाजता करण्यात येणार आहे. सबंधितांनी अवश्य लाभ घ्यावा.

शब्दखुणा: 

आकाशवाणीवर गझल मुशायरा

Submitted by अभय आर्वीकर on 2 June, 2012 - 23:24

आकाशवाणीवर मराठी गझल मुशायरा

दि. ०३ जुन २०१२ ला यवतमाळ आकाशवाणी वरून (१०२.७) रात्री ९.३० वाजता मराठी गझल मुशायर्‍याचे प्रसारण करण्यात आले.

या मुशायर्‍यात सिद्धार्थ भगत, ललित सोनवणे, मसूद पटेल, प्रा. रुपेश देशमुख, गंगाधर मुटे, पवन नालट, प्रमोद चोबितकर. विनय मिरासे, उज्वल सरदार यांचेसह अनेक गझकारांचा सहभाग होता.

यवतमाळ आकाशवाणी प्रसारणाचा संपादीत भाग येथे ऐकता येईल.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - आकाशवाणी