मराठी रेडिओ

Submitted by rmd on 14 January, 2021 - 13:15

देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता.
अमेरिकेत आल्यावर बर्‍याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती. यूट्यूब किंवा गाना वगैरे सारख्या ठिकाणी गाणी ऐकून दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न केला गेला. पण त्यात ती रँडम गाणी ऐकण्याची मजा येईना. आपल्याला कधीही माहिती नसलेल्या चित्रपटांची गाणी अचानक कानावर पडण्यात जी धमाल आहे ती त्यात नव्हती.
असेच कधीतरी ट्यून इन रेडिओ वगैरे सारख्या गोष्टी सापडल्या जिथे मुंबई अस्मिता वाहिनी ऐकता येत होती. मग प्रॉपर रेडिओ ऐकणं सुरू झालं. काही काळाने प्रसारभारतीवर देशभरातल्या रेडिओ चॅनल्सचा खजिना सापडला आणि लॉटरी लागल्यासारखंच वाटलं. महाराष्ट्रातल्या इतक्या शहरांमधून आकाशवाणी ऑनलाईन ऐकता येते हा नवीनच शोध लागला. मग काय, चॅनल सर्फींग करत करत भरपूर मराठी गाणी, कार्यक्रम ऐकणं सुरू झालं.
पण नुकतेच प्रसारभारतीने हे रेडिओचे पेज काढून टाकले आणि अ‍ॅप सुरू केले. आणि मला अ‍ॅप नको होते. मग अजून शोधाशोध करत बसण्यापेक्षा आपणच एक पेज बनवून आपल्या ब्लॉगवर का टाकू नये असा विचार मनात आला. आणि त्याप्रमाणे onlineradiofm.in वरच्या लिंक्स जमा करून महाराष्ट्रातल्या विविध शहरातली आकाशवाणी एका पेजवर मिळेल अशी व्यवस्था केली. त्यामुळे अ‍ॅपशिवाय मराठी रेडिओ ऐकणं आता खूप सोपं झालं.
माझ्यासारखेच आकाशवाणीचे चाहते इथे मायबोलीवर खूप असतील असं वाटलं आणि म्हणूनच सर्व मायबोलीकरांसाठी ही लिंक इथे देते आहे.

https://marathiradiostations.blogspot.com/p/marathi-radio.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, मस्त कल्पना आहे. थँक्स.
माझ्या सासूबाईंना इंडियात रेडियो ऐकायची सवय आहे. आता त्या टॅबवरून इथे अमेरिकेतही ऐकू शकतील. त्यांना ही लिंक देते

वेल डन!

फक्त संदर्भासाठी सांगतो की प्रसारभारती वरून गेलेली रेडिओ ची लिंक http://newsonair.com/ वर आहे. वेबपेज वर उजवीकडे खाली 'लाईव्ह स्ट्रिमिंग' वर क्लिक केलं की रेडिओ ची विंडो उघडते (http://allindiaradio.gov.in/radio/live.php?channel=1) , तिथे तुम्ही हवं ते स्टेशन ट्यून करू शकता.

धन्यवाद!

@फेरफटका, बरोबर आहे. पण त्या लिंकवर महाराष्ट्रातल्या बाकी शहरांच्या रेडिओ लिंक्स दिसत नाहीत, उदा: Air Nashik, Air Ratnagiri वगैरे. म्हणून तर मला हा उद्योग करावा लागला.

गुड जॉब रमड
newsonair app वरुन कास्ट करता येत नाही म्हणुन त्यांच्या काही लिंक मी सेव्ह करुन घेतल्या होत्या आणि क्रोम मधुन स्मार्ट स्पिकर वर कास्ट करत होतो.
तुझ्या साईट वर प्लेयर वर कास्टींग एनेबल करता येईल का?

तुझ्या साईट वर प्लेयर वर कास्टींग एनेबल करता येईल का? >>> बहुतेक जमेल. उद्या ट्राय करते.
>>> आता चेक कर मॅक्स

वा खुपच छान!!!
या मेहनतीसाठी खुप खुप धन्यवाद!

धन्यवाद.
लॉकडाऊन मधे मला प्रसार भारतीचा शोध आणि शौक लागला..
परवा अचानक ही लोकल मराठी केंद्रे *सातारा, रत्नागिरी, सांगली , नाशिक वगैरे)असलेलं पान गायब झालं.
पण आता बरं झालं तुम्ही ते परत उपलब्ध करून दिलंत.
बघतो लावून आजच्..

रमड,
आम्ही पण ट्राय केलं. परफेक्ट वर्क होतंय. वीणा सहस्त्रबुद्धे यांचं शास्त्रीय गायन ऐकायला साबांना फार छान वाटलं.
Thanks a million!

चांगलं काम रमड. मला फक्त सकाळी लवकर मराठी रेडिओ ऐकायला आवडायचा. महालक्ष्मी अय्यरच्या आवाजातली देवीस्तुती खूप आवडायची. आता शोधूनही कुठे सापडत नाही.

आज दिवसभर काम करताना मुंबई अ आणि अस्मिता वाहिनी ऐकली. मग सतारीवर दरबारी कानडा ऐकला. मग एक थोडं नभोनाट्य ऐकलं. मजा आली.
कामगार सभेचं म्युझिक अचानक कित्येक वर्षांनी ऐकलं तरी बरोब्बर आठवलं. Happy
भारतात गेल्यावर हल्ली फडतुस एफएम ऐकुन डोकं फिरवुन घेतलंय. आकाशवाणी रॉक्स.

मुम्बई एफेम रेन्बो इस्ट्रेन टाईम संध्याकाळी ६/७ वाजता मराठी प्रोग्रम ऐकला. चांगला वाटला. मराठी आर जे चांगलं आणि व्यवस्थित बोलत होते.
विविध भारती सोडल्यास हिंदी आर जे बहुतेक वेळेस आवरा कॅटेगरी असतात.

थँक्यू सगळ्यांना! Happy

विविध भारती सोडल्यास हिंदी आर जे बहुतेक वेळेस आवरा कॅटेगरी असतात >>> अगदी अगदी

भारतात गेल्यावर हल्ली फडतुस एफएम ऐकुन डोकं फिरवुन घेतलंय >>> खरंय. एफएम अगदीच फडतूस झालंय.

आधी आकाशवाणी मुंबैचं एफेम गोल्ड पण खरंच गोल्ड होतं. आता जेव्हा लावावं तेव्हा सरकारी बातम्या नाहीतर कार्यक्रम चालू असतात.

एक नंबर काम केलेत तुम्ही. तुमची हरकत नसेल तर तुमच्या ब्लॉगच्या लिंक सहित हि माहिती अन्यत्र शेअर करू का?

छान काम.
"आपली आवड" या मराठी कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यून मी हुडकतोय. कुठे मिळेल ?

एक नंबर काम केलेत तुम्ही. तुमची हरकत नसेल तर तुमच्या ब्लॉगच्या लिंक सहित हि माहिती अन्यत्र शेअर करू का? >>> जरूर करा. नावानिशी शेअर करायला काहीच हरकत नाही.

Pages