सानिकाचं "सेल्फ पोर्ट्रेट" : आनंदीआनंद गडे !!

Submitted by maitreyee on 3 September, 2009 - 10:40

"सेल्फ पोर्ट्रेट" !! : आनंदी आनंद गडे!!
सानिका - वय ४
सानिका (तिच्या वयानुसार अन टिपिकल मुलगी असल्यामुळे) कायम स्वप्नांच्या दुनियेतच असते!! तिच्या गोष्टीत, चित्रात अन एरव्हीच्या बोलण्यात पण कायम जादू, पर्‍या, राजकन्या, यांच्याशिवाय कशाची बात नसते! सगळं कसं गोड गोड अन मुख्य म्हणजे दिसायला सुंदर !! तिचं हे चित्र मला आवडलं ते त्यातल्या भयंकर (!) आनंदी मूड मुळे Happy ती मुलगी ( ती म्हणजे ती स्वतः असं तिचं म्हणणं!), फुलं, ते पाखरु , सगळे आपले हसतायत !! Happy
सानिकाच्या चित्रात डीटेलिंग भारी असतं, (ते पर्फेक्ट्ली मिरर इमेज सिग्नेचर चे काय गौडबंगाल करते अधे मधे ते सोडून द्या Wink ) मुलीचे केस, फ्रॉक चा घोळ, हातात टिपिकल "पिन्क, हार्ट शेपचा बलून", "डिझायनर फुलपाखरू" इत्यादि इत्यादि!! ( याबाबतीत डीजेमावशीला टक्कर आहे! Happy )
sanikapic.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसल क्युट काढलय ग.. डिझायनर बटरफ्लाय एकदम गोड

जुई पण अगदी टिपीकल मुलगी आहे.. आधी तिने मरमेड काढलेली भारी डिटेलींग होत त्यात.. आणि बाजुला मरमॅन आणि त्याच्या डोक्यावर छोटासा क्लाउड काढुन त्याचे विचार काय तर "I hope she likes me" :p

चित्र खरच खूप गोड आहे. टुटुस्टाईल फ्रॉकचा घेर, फुलपाखरु आणि चेहेर्‍यावरचे भाव तर फारच मस्त!

मस्तच! माझि लेक पण सध्या प्रिन्सेस, जादु अशाच्( थोडक्यात खर्चिक )गोश्टि करत असते.

Proud आवडलं चित्र.
डिझायनर फुलपाखरु... हम्म, डिजे मावशीने बाळगुटीतून एक दोन फॅशनचे वळसे चाटवले की काय? Wink

मस्तच! चेहेर्‍याचे प्रपोर्शन्स, जागच्या जागी डोळे, नाक, हसरं तोंड... एकदम सहीच... लगे रहो सानिका... Happy

मस्त आलय. सानिका नावाच्या मुली अशाच असतात काय? माझी सानिका पण अशीच कायम पर्‍यांच्या दुनियेत. आणि ते मिरर इमेज वाली गोष्ट पण अधुन मधुन करत असते Happy

हे चार वर्षाच्या मुलीने काढलंय ?? - खरंच वाटत नाहीये - फारच सुरेख जाण आहे सानिकाला चित्र, रेषा, रंगांचीही... आणि इमॅजिनेशन पण जबरीच ....

रच्याकने - आता काय करते ही ?

अरे! खूप दिवसांनी हा बाफ वर आला!
प्रीती, शशांक , सानिका आता ९ वर्षाची होईल काही महिन्यांत. चित्रकला अजून आवडतेच! आर्ट क्लास ला जातेय, त्यामुळे जरा फाइन ट्यून होतायत स्किल्स... तिची काही निवडक चित्रे टाकेन जमले तर.
सध्या वॉटर कलर टेक्निक्स शिकतेय! Happy
हे लेटेस्ट चित्र - पुस्तकातले बघून तिने स्वतःच काढलेय :
s2_0.jpg

Pages