छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय ४ : "फिर भी रहेगी निशानीयाँ"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:29

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया-गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय ४: "फिर भी रहेगी निशानीयाँ..."

thasa_0.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत ठसे, निशाणी, खुणा... मनुष्य, प्राणी, किटक, पक्षी इ. इ. यांचे पाय, हात, चोच, दात, नखं वगैरे चे ठसे/निशाणी/ओरखडे/चावल्याच्या खूणा ... उदा वाळूतून चलणारा खेकडा, गोगलगायीची चकचकीत वाटचाल...नखांचे ओरखडे, खारीने कुरतडलेला पावाचा तुकडा वगैरे...बाळाच्या गालावरच काजळाचं बोटं, जन्मखूण, तीळं, टॅटू.. इ इ देखिल चालू शकेल.

स्टँपचे (पोस्टाचे स्टँप नव्हे. लाखेचे किंवा साडी प्रिटिंग किंवा मेंदीचे स्टँप) ठसे, एखादी वस्तु खूप दिवसांनी हलवल्यावर भिंतीवर, जमिनीवर उमटलेले ठसे, तेलकट हाताचे ठसे, माणसाने पर्यावरणावर सोडलेला ठसा, कुठल्याही वस्तुने / प्राण्याने / मनुष्याने दुसर्‍या एखाद्या वस्तुवर कुठल्याही प्रकारे सोडलेली निशाणी

गाणे - कळीचे शब्द: ठसा, छाप, निशाणी, ओळख, मागे, पिछे, छोड, विसरणे, हरवणे इ इ उदा. "...छोड आये हम वो गलियाँ......"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठुनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती
मन वार्‍यावरती झुलते, असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते, सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते

स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडती पुढे

(मालवण येथील सिंधुदुर्ग किल्यातील श्री शिवरायांच्या पाऊलाचा ठसा )

शुभे, दोन्ही फोटो मस्त Happy

दुसर्‍यासाठी गाणे. Happy
आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे

262835_207347515989030_100001413500862_602223_6119404_n.jpg

विसरु नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया

किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले
घेउनी हिंडले सतीचा वसा, प्रिया

अजय Happy

झाले गेले विसरुन जावे
पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे

हे पण चाललं असत.

शुभांगी, येस्स्स्स Happy

झाले गेले विसरुन जावे
पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे>>>>हे परफेक्ट आहे. Happy

या विषयाची व्याप्ती वाढवता येईल काय ? मला तो थोडा संकुचित वाटतोय.
मूळ गाण्यात या ओळींवर छोटे रणधीर, ऋषि आणि चिटू आहेत ना ?

@जिप्सी -- पावलाचा ठसा खोलगट असतो ना. तुमच्या फोटोत फुगीर कसा आला आहे?>>>जयु, तो ठसा खोलगटच आहे. नीट पाहिल्यावर लक्षात येते. ३डी इफेक्ट आलाय Wink

या विषयाची व्याप्ती वाढवता येईल काय ? मला तो थोडा संकुचित वाटतोय.<<<

दिनेशदा,

>>इथे अपेक्षित आहेत ठसे, निशाणी परंतु फक्त मनुष्य, प्राणी, किटक, पक्षी इ. इ. यांचे पाय, हात, चोच वगैरे चे ठसे/निशाणी. उदा वाळूतून चलणारा खेकडा, गोगलगायीची चकचकीत वाटचाल...<<

आपण कृपया सांगु शकाल का की आपल्याला अजुन काय अपेक्षित आहे ते.

धन्यवाद

सगळ्यांचे झब्बू सुंदर.

जाते हल्ली पुर्वीच्या संसाराची निशाणीच राहीली आहे.

तुज्यामाज्या संसाराला आनि काय हवं
तुज्यामाज्या लेकराला घरकूल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं
घरकुलासंगं सम्दं येगळं होईल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल
jate1.JPG

जिप्सी.. पहिला फोटो तुझ्याकडनं अपेक्षित होता..तेरेको दस मेसे दस नंबर!!! Happy
अजय,शुभांगी,प्रज्ञा चे फोटो पण सुरेख आहेत.
प्रज्ञा च्या फोटोतली व्यक्ती चालताना उजव्या पायावर जास्त भार देऊन चालतेय ना???

मंडळी,

प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत ठसे, निशाणी, खुणा... मनुष्य, प्राणी, किटक, पक्षी इ. इ. यांचे पाय, हात, चोच, दात, नखं वगैरे चे ठसे/निशाणी/ओरखडे/चावल्याच्या खूणा ... उदा वाळूतून चलणारा खेकडा, गोगलगायीची चकचकीत वाटचाल...नखांचे ओरखडे, खारीने कुरतडलेला पावाचा तुकडा वगैरे...बाळाच्या गालावरच काजळाचं बोटं, जन्मखूण, तीळं, टॅटू.. इ इ देखिल चालू शकेल.

स्टँपचे (पोस्टाचे स्टँप नव्हे. लाखेचे किंवा साडी प्रिटिंग किंवा मेंदीचे स्टँप) ठसे, एखादी वस्तु खूप दिवसांनी हलवल्यावर भिंतीवर, जमिनीवर उमटलेले ठसे, तेलकट हाताचे ठसे, माणसाने पर्यावरणावर सोडलेला ठसा, कुठल्याही वस्तुने / प्राण्याने / मनुष्याने दुसर्‍या एखाद्या वस्तुवर कुठल्याही प्रकारे सोडलेली निशाणी

विषयाची व्याप्ती वाढवली आहे.

संयोजक बघा बालमनावर कसे परीणाम होतात. एकतर जिप्सी एवढा साधा-सरळ, भोळा मुलगा. Lol

Pages