आपल्या सर्वांना प्रिय असलेले कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे काल निधन झाले. त्यांच्या प्रकृती संदर्भात ज्या काही बातम्या विविध वृत्तपत्रांतून प्रकाशित झाल्या आहेत त्यामध्ये पाडगांवकर गेली काही वर्षे "नागीण" (Herpes Zoster) या विकाराने त्रस्त होते असे म्हटले गेले आहे.
कांजिण्याचाच हा एक प्रकार असल्याने सहसा लहान वयात याची बाधा होते असा काहीसा समज आहे (तो कदाचित चुकीचाही असू शकेल) पण वृद्धांतही तो नेमक्या कोणत्या कारणास्तव वाढतो....वा आजच्या आधुनिक तंत्रज्ञानानी सजलेल्या औषधोपचाराच्या काळातही चक्क मृत्यूला कारणीभूत कसा होत असेल याचे विवरण मायबोलीचे सदस्य अमित करकरे यांच्या अभ्यासपूर्ण लेखात दिसत्ये आहे. तो लेख या निमित्ताने मी पुन्हा इथे तमाम लोकांच्या माहितीसाठी देऊ इच्छितो....[आशा आहे की श्री.अमित करकरे आणि मायबोली प्रशासक यांची या कृतीस परवानगी असेल. असे करणे योग्य नसेल तर हा लेख मी लागलीच इथून काढतो.]
===========================================================
अमित करकरे.....२५ एप्रिल २०१३
“डॉक्टर, बाबांना गेले दोन-चार दिवस डाव्या साईडला पाठीत दुखत होतं. काल परवा गरम पाण्याच्या पिशवीने जरा शेकलं, पण पाणी बहुदा जरा जास्तच गरम झालं असावं कारण आज शेकल्याच्या जागी लाल छोटेछोटे फोड आलेत आणि थोडी खाज सुटलीये. काय करू?” संजीवचा सकाळी सकाळीच फोन आला होता.
“संजीव, घरी काही करू नको. दहा वाजता त्यांना दवाखान्यात घेऊन ये, तिथेच बघुया काय ते.”
बरोबर दहा वाजता संजीव त्याच्या ६४ वर्षांच्या वडलांना घेऊन आला, आणि ते फोड बघताच मला लक्षात आले होते की माझा अंदाज खरा ठरला आहे, “संजीव, अरे ही ‘नागीण’ आहे.”
“नागीण !!!” अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रीया आलीच!, “डॉक्टर, नागीण पूर्ण गोल पसरली तर जीवाला धोका असतो नां?”
“संजीव, अरे या सगळ्या ऐकिवात गोष्टी आहेत. प्रत्यक्षात असं काही नसतं!”
= =
‘व्हरीसेला झोस्टर’ या विषाणू (व्हायरस) पासून होणाऱ्या या इन्फेक्शन ला आपण नागीण (हर्पीस झोस्टर) म्हणतो, पण याच विषाणूमुळे आपल्याला लहानपणी कांजिण्या होतात बरं!. खरं सांगायचं म्हणजे लहानपणी कांजिण्या येऊन त्यां बऱ्या झाल्यावरही हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही. पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ठ नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्यभरासाठीच. केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, पण वाढणारं वय, अचानक हवामानात झालेला बदल (थंडी संपून उकाडा सुरु होणे), शारीरिक अथवा मानसिक ताण, किंवा एखाद्या आजारामुळे अथवा केमोथेरपी सारख्या उपचारांमुळे तात्पुरती कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता अशा कारणांमुळे हा निद्रिस्त विषाणू जागृत होऊ शकतो.
लक्षणे:
एकदा का हा विषाणू सक्रीय झाला की काही विशिष्ठ लक्षणे दिसू लागतात. संजीवच्या वडिलांना झाली तशी पाठदुखीने याची सुरवात होते. नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यासारखे किंवा खुपल्यासारखे वाटत राहते. दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे पाणीदार फोड दिसायला लागतात आणि त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो. त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो. याच बरोबर ‘फ्लू’मध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागतात.
पाठीतल्या ज्या नर्व्हला याचा संसर्ग झाला असेल, त्यां नर्व्हच्या प्रभावित क्षेत्रात प्रामुख्याने याची लक्षणे दिसतात. पुरळ सुरु झाल्यापासून एका आठवड्याच्या कालावधीत दुखण्याचा जोर सर्वात जास्त असतो. कांजिण्याप्रमाणेच हे पाणीदार फोड पुढे सुकतात, त्याला खपली धरते आणि ती पडून जाते. साधारण संसर्ग सुरु झाल्यापासून खपली पडून जाण्याची प्रक्रिया साधारण २-६ आठवड्यात पूर्ण होते. आपल्याला किती दिवस याचा त्रास होणार अथवा किती जलद या विषाणू-संसर्गाचा समारोप होणार हे सर्वस्वी आपली नैसर्गिक रोगनिवारक शक्ती, संसर्ग होतानाची आपली निरोगी-स्थिती, स्वच्छता आणि आपले वय या सर्वांवरती ठरते.
काही रुग्णांमध्ये विशेष करून जेष्ठ नागरिकांमध्ये पुरळ गेले तरी त्यां भागात तीव्र स्वरूपाच्या वेदना होण्याचे आणि अगदी दोन-दोन वर्षे त्याचा त्रास राहण्याची उदाहरणे आहेत. यालाच ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’ असे म्हणतात. नागीण झालेल्यांपैकी सुमारे २० ते २५ टक्के रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामध्ये वर त्वचेवर काहीच दिसत नाही पण अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि त्यां भागातील हालचालीवर मर्यादा आल्यामुळे जीव अगदी नकोसा होऊ शकतो.
प्रचलित उपचार:
सर्वसाधारण विषाणू-संसर्गाप्रमाणेच एकदा लक्षणे सुरु झाली की त्यांना पूर्णपणे काबू करणे शक्य होत नाही. पाण्यासारखे द्रव असलेल्या फोडांमध्ये अजून जीवाणू-संसर्ग होणार नाही यासाठी उपचार केले जातात. ‘असायक्लोवीर’ सारख्या विषाणू-मारक औषधाचा उपयोग होतो. त्वचेची दाहकता कमी करण्यासाठी बाहेरून काही मलमे दिली जाऊ शकतात पण त्याचा सीमित परिणाम दिसतो.
होमिओपॅथिक उपचार:
आजवरच्या अनुभवावरून आढळलेला होमिओपॅथिक उपचारांचा विशेष फायदा म्हणजे लक्षणांची सुरवात झाल्या-झाल्या त्या लक्षण-समुहाला अनुसरून योग्य असे होमिओपॅथिक औषध दिले तर लक्षणांची पुढील वाढ तर थांबू शकतेच पण अगदी कमी कालावधीत संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. प्रामुख्याने ऱ्हस टॉक्स, अर्सेनिक अल्ब, मेझेरीयम, आयरिस, रॅननक्युलस बल्बोसस यांसारख्या औषधांचा यासाठी विशेष उपयोग होतो असे आढळून आले आहे. अर्थात, लक्षणांवरून योग्य औषधाची निवड होमिओपॅथिक तज्ञच करू शकतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे जेष्ठ नागरिकांमध्ये राहणारी वेदना आपण होमिओपॅथिक उपचारांनी नक्कीच घालवू शकतो. होमिओपॅथिक औषधांमधील ब्रायोनिया, कोलोसिंथ, कॉस्टिकम्, सिमीसिफुगा, मॅग फॉस यांसारख्या काही औषधांतील योग्य औषधाची निवड करून ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’वर हमखास मात करता येते.
होमिओपॅथिक उपचारपद्धतीमध्ये केवळ आजाराच्या लक्षणावर मात इतकेच मर्यादित लक्ष्य न ठेवता पेशंटच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करणारी औषधे सुद्धा आहेत, ज्यामुळे आरोग्याचे रक्षण होतेच पण पुढील संसर्गाचाही अटकाव होतो.
===================================================================
अन्य अशा एका लेखात विशिष्ट वयानंतर होत असलेल्या पित्तासारख्या आजाराला वा व्याधीला लागलीच पथ्यपाणी चालू करून ते आटोक्यात ठेवल्यास नागीण विकार होण्यापासून रोखले जाऊ शकते असा उल्लेख आहे.
सर्वांच्या माहितीसाठी....धन्यवाद
चांगली माहिती. कांजिण्या आणि
चांगली माहिती. कांजिण्या आणि नागिणीचे विषाणू एकच याची कल्पना नव्हती. नागीण फक्त पाठीला न होता इतरही अवयवांवर होऊ शकते ना? कपाळ, मांडी, दंड, पोट वगैरे.. त्याबद्दल काही उल्लेख करकरेंच्या लेखात आलेला नाही.
यावर मायबोलीवर एक जुना धागा
यावर मायबोलीवर एक जुना धागा आहे, हरपिस नावाचा.
त्यावरही भरपूर माहिती आहे.
http://www.maayboli.com/node/51769
हो सई....मला फक्त कांजिण्या
हो सई....मला फक्त कांजिण्या या प्रकाराविषयी माहिती होती....ग्रामीण भागात त्याची लागण लहान मुलांना होते असेही दिसल्ये....पण पुढे त्याची सांगड नागीणशी घातली जाते हे बिलकुल माहीत नव्हते. याला "नागीण" नावही आयुर्वेदात या विकाराला "विसर्प" या नामाने ओळखले जाते म्हणून त्यावरून नाव पडले असेल असेही म्हणता येईल. पण वयाच्या सत्तरीनंतरही याची पिडा होऊ शकते (पित्तामुळे अधिकतम) ही माहिती अगदी नवीनच.
mi_anu : धन्यवाद. हर्पेस झोस्टरमुळेच हरपिस होतो ही माहिती होती मला....लिंकवर चांगली माहिती दिसत्ये. नक्की वाचतो.
सई.... आत्ताच नेटवर नागीण
सई....
आत्ताच नेटवर नागीण विकाराचे फ़ोटोही पाहिले....शरीराच्या (त्यातही विशेषत: पाठीवर) सर्वच भागावर हा विकार पसरतो असेच दिसत आहे. [फ़ोटो द्यावेसेही वाटत नाही.....]
बापरे, नागिण जीवघेणी असते
बापरे, नागिण जीवघेणी असते हे नुसते ऐकलेले, पण तो गैरसमज असावा असे वाटलेले.
मला आणि माझ्या मुलीला, दोघींनाही नागिणीचा फटका बसलाय. दोघीनाही चेह-याच्या अर्ध्या भागावर, अगदी कानात पण कांजण्या आलेल्या. १५ वर्षांपुर्वी मला झालेली तेव्हा हर्पिस म्हणतात माहित नव्हते. डॉक्टरनी कांजण्या म्हणुन सांगितले आणि या वयातही हिला कांजण्या होतात म्हणुन सगळ्यांनी माझी थट्टाही करुन घेतलेली. माझ्या चेह-यावर अजुनही व्रण आहेत या कांजण्याचे. भयंकर वेदनामय असतो हा प्रकार. मुलीला गेल्या वर्षी झालेल्या. काळजी घ्यायला हवी.
साधना, तुम्हाला आणि लेकीला
साधना, तुम्हाला आणि लेकीला केवळ कांजिण्या झाल्या असाव्यात.
नागिण नाही.
मला कदाचित कांजण्याच झाल्या
मला कदाचित कांजण्याच झाल्या असाव्यात. कारण तेव्हा डॉक्टरच्या तोंडून मी हर्पिस हा शब्द ऐकला नव्हता.
लेकीला मात्र आमच्या नेहमीच्या डॉक्टरने हर्पिसचे निदान करुन स्किन स्पेशलिस्टकडे पाठवलेले आणि त्याने हर्पिस झोस्टर निदान करुन तशी औषधे दिलेली. तिला महिनाभर तरी पुरलेला हा आजार.
बापरे!
बापरे!
अशोकमामा छान माहीती शेअर
अशोकमामा छान माहीती शेअर केलीत. तुम्हाला आणि डॉक्टर केरकर दोघांना धन्यवाद.
सहा महिन्यापुर्वीच मी ह्यातुन गेल्याने मला पुर्ण कल्पना आहे आणि मला नागिण झाल्यावर संसर्ग होऊन मुलाला कांजिण्या झाल्या. माझ्या डॉक्टरांनी दोघांचे विषाणू एकच हि कल्पना मला दिली होती. लहानपणी मला कांजिण्या आल्या होत्या आणि आता नागिण. मुलाला मात्र लहान असताना नव्हत्या आल्या कांजिण्या.
नागीण या रोगावर माझ्या
नागीण या रोगावर माझ्या बाबांना दोनदा हमखास लागू पडलेले औषध - दुर्वांचा ताजा रस तांदुळाच्या पिठीमधे कालवून पुरळ/ जखमा इ.वर दिवसातून दोनदा लावायचा. खूप लवकर आराम पडतो.
माहितीपूर्ण लेख, मामा.
माहितीपूर्ण लेख, मामा.
नागीण रोगाची बरीच माहिती
नागीण रोगाची बरीच माहिती मिळाली. Shingles वर लस पण निघाली आहे.
माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.
माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.
छान माहिती ! “डॉक्टर, नागीण
छान माहिती !
“डॉक्टर, नागीण पूर्ण गोल पसरली तर जीवाला धोका असतो नां?”
>>>>
हे बालपणी आम्हीही ऐकलेले. नागीणीचा विळखा पुर्ण झाला तर सर्किट पुर्ण झाल्यासारखे शॉक लागून आपण जागीच गतप्राण असे काहीसे विचार करायचो. पाठीवर साधे घामोळे उठले तरी नागीणीचा पट्टा तर नाही ना म्हणून आरश्यात चेक करायचो.
माहितीपूर्ण लेख.. होमियोपॅथिक
माहितीपूर्ण लेख..
होमियोपॅथिक च्या औषधी यावर इतक्या परिणामकारक असतात हे नव्हत माहिती..
आणि इकडे सुद्धा नागीण बद्दल भरपूर अंधश्रद्धा आहेत..
आज मी Herpes Zoster club ची
आज मी Herpes Zoster club ची सभासद झाले. चेहऱ्याचा अर्धा भाग, अगदी डोक्यावर केसांच्या मुळापशी सुध्दा ब्लिस्टर्स आले आहेत. Dermatologist कडून औषधे आणली आहेत. पाहु किती दिवस त्रास होतो आहे.
डॉ कुमार (तुम्ही वाचत असलात तर .......), मला आता गेल्या तीन दिवसात तरी ताप, फटीग काही वाटत नाही. फक्त वेदना आणि जळजळ आहे. अशा वेळेस मी जिम, डान्स क्लास करू शकते का? हा आजार contagious असतो का?
अन्य अशा एका लेखात विशिष्ट
अन्य अशा एका लेखात विशिष्ट वयानंतर होत असलेल्या पित्तासारख्या आजाराला वा व्याधीला लागलीच पथ्यपाणी चालू करून ते आटोक्यात ठेवल्यास नागीण विकार होण्यापासून रोखले जाऊ शकते असा उल्लेख आहे.>>>>>
ह्याबद्दल अधिक माहिती मिळेल का?
बाकी लेख उत्तम आहे.
मीरा, लवकररात लवकर बऱ्या व्हा. बेस्ट विशेष फॉर स्पीडी रिकव्हरी.
<<<नागीण या रोगावर माझ्या
<<<नागीण या रोगावर माझ्या बाबांना दोनदा हमखास लागू पडलेले औषध - दुर्वांचा ताजा रस तांदुळाच्या पिठीमधे कालवून पुरळ/ जखमा इ.वर दिवसातून दोनदा लावायचा. खूप लवकर आराम पडतो.
Submitted by सहेली on 1 January, 2016 - 16:29>>>
मीरा, हा उपाय करून बघून अनुभव लिहाल का ?
दुर्वा शरीरातील उष्णता कमी करतात असा अनुभव आहे.
लवकर बर्या व्हा.
मीरा,डॉक्टरांच्या औषधबरोबर 4
मीरा,डॉक्टरांच्या औषधबरोबर 4 दिवसातून एकदा वैद्य पाटणकर काढा घ्याल का? शरीरातील उष्णता कमी होते.माझ्या लेकाला कांजण्या झाल्या असता दिला होता. कांजण्याचा भर कमी झाला होता.
मीरा
मीरा
सर्वप्रथम तुम्हाला लवकर बरे होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! तुमच्यासाठी पाठ्यपुस्तकातील थेट परिच्छेद इथे डकवतो आहे. काळजी घ्याच.
This infection is contagious to persons with no previous immunity to VZV (=chickenpox virus). However, it is estimated to be only one third as contagious as primary chickenpox.
It is transmitted either via direct contact with the lesions or via the respiratory route.
During the acute phase, patients are contagious & should be counseled to avoid direct skin contact with immunocompromised persons, pregnant women, and individuals with no history of chickenpox infection. Infants and babies are especially vulnerable at the acute, contagious stage.
सारांश : अशा रुग्णाने लहान मुले, गर्भवती आणि दीर्घकालीन व्याधी असलेल्या व प्रतिकारदुर्बल / वृद्ध लोकांपासून दूर राहावे.
आभा, धन्यवाद.
आभा, धन्यवाद.
धनवंती, धन्यवाद आणि दुर्वाचा उपाय करून पहाते. रस कसा काढायचा ते माहित असेल तर सांगणार का प्लीज? किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळेल का? पण तो फ्रेश नसेल.
देविका, हो नक्की. आता लगेच मागवते. धन्यवाद.
डॉ कुमार, नेहमीप्रमाणे तत्पर आणि in details उत्तरासाठी आभार. थोडक्यात मी isolate होणं गरजेचं आहे आणि जिम तर नाहीच नाही.
डॉ कुमार सरांचा प्रतिसाद बघून
डॉ कुमार सरांचा प्रतिसाद बघून हॅपाॅ सिनेमात डंबलडोर आल्यावर जसे हुश्श वाटते तसे वाटले
दुर्वा फुलबाजारात मिळतात किंवा सोसायटीत बघा. 15-20 दुर्वा घेऊन धुवून मिक्सरच्या छोट्या भांड्यात एकदम थोडे थोडे पाणी घालत बारीक करून ते गाळून घ्या. त्यात तांदूळ पिठी घाला.
हॅपाॅ सिनेमात डंबलडोर
हॅपाॅ सिनेमात डंबलडोर
>> मी हे बिलकुल वाचलेले किंवा पाहिलेले नाही. थोडेसे गुगल केले. परंतु मला तुमच्या ते इथे लिहिण्याचा नक्की संदर्भ समजला नाही
तो सांगाल का ?
Like a guide and teacher and
Like a guide and teacher and a caring elderly person in Harry's otherwise troubled life. He rescues Harry and his friends from their challenges in the magic world. He is a great magician who has vast knowledge and is respected and lot in the wizard world.
Here you are also helping many people with good advices and your writing indicates your vast knowledge in Medical field..
Sorry for typing in English.
छान माहिती. धन्यवाद !!
छान माहिती.
धन्यवाद !!