कात

गाव कात टाकतय

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 October, 2017 - 03:26

गाव कात टाकतय

खरं का खोटं पण
काय तरी घडतय
गाव कात टाकतय

ट्रॅक्टरच्या चकारीत
गोधुली शोधतय
गाव कात टाकतय

वसुबारसीलाही
चित्रातली गाय पुजतय
गाव कात टाकतय

मोटंवरचं गाणं
इंजिन धडधडतयं
गाव कात टाकतय

विहीर झाली पालथी
शेततळ पाणी झिरपतय
गाव कात टाकतय

मर्दानी कुस्त्या छबिने
सिनेमापुढं धापतय
गाव कात टाकतय

देवळं पडली वस
बार लई फुलारतय
गाव कात टाकतय

आरोग्य सेवेचं तीनतेरा
म्हातारं सैराट खोकतय
गाव कात टाकतयं

शब्दखुणा: 

मी "कात" टाकली .... (कीटकांची शारीरिक वाढ !!)

Submitted by पुरंदरे शशांक on 13 May, 2014 - 01:15

मी "कात" टाकली ....

प्रेइंग मँटिसची ही कात/कवच पाहून हा लेख लिहावासा वाटला ..

pm.JPG

कीटकांची शरीरवाढ हा एक गंमतीशीरच प्रकार आहे. कारण आपण (मानव) आपल्या शरीराच्या अंतर्गत जी हाडे असतात त्या सर्व हाडांच्या आधारावर निर्भर असतो. म्हणजे हाडे ही आपल्याला मुख्य आधार देतात आणि या हाडांभोवती जे मसल्स असतात त्यामुळे आपले सगळे शरीर बनते (ढांचा). अशा शरीरात मग वेगवेगळे अवयव (मेंदू, ह्रदय, फुफ्फुसे, इ. ) व विविध संस्था (पचन, किडनी, रक्ताभिसरण, इ.) काम करत असतात.

विडा

Submitted by वर्षा_म on 13 July, 2011 - 04:29

बॅकेच्या पासबुकचे पान
तुझ्यासमोर काय उघडले
तू जणु सुपारीच घेतलीस
मला कर्जबाजारी करायची

मोठा चुना लागल्यावर
माझ्या लक्षात आली
माझी चुक

आता मीही कात टाकली
माणसे ओळखायला शिकलोय

शेवटी तुला सुधारण्याचा
विडा उचलावाच लागला!

Subscribe to RSS - कात