मी "कात" टाकली .... (कीटकांची शारीरिक वाढ !!)

Submitted by पुरंदरे शशांक on 13 May, 2014 - 01:15

मी "कात" टाकली ....

प्रेइंग मँटिसची ही कात/कवच पाहून हा लेख लिहावासा वाटला ..

pm.JPG

कीटकांची शरीरवाढ हा एक गंमतीशीरच प्रकार आहे. कारण आपण (मानव) आपल्या शरीराच्या अंतर्गत जी हाडे असतात त्या सर्व हाडांच्या आधारावर निर्भर असतो. म्हणजे हाडे ही आपल्याला मुख्य आधार देतात आणि या हाडांभोवती जे मसल्स असतात त्यामुळे आपले सगळे शरीर बनते (ढांचा). अशा शरीरात मग वेगवेगळे अवयव (मेंदू, ह्रदय, फुफ्फुसे, इ. ) व विविध संस्था (पचन, किडनी, रक्ताभिसरण, इ.) काम करत असतात.
आता पहा - ही हाडे म्हणजे जसे स्लॅबमधे लोखंडी सळया असतात तसे आहे. आणि मसल्स हे सिमेंट काँक्रिटसारखे - या लोखंडी सळया आणि सिमेंट यांच्या एकत्रित काम करण्याला reinforcing असा शब्द आहे. म्हणजेच आपण आहोत एंडोस्केलेटनवाले (endoskeleton) सजीव. Happy
आपली वाढ होताना हाडांबरोबर मसल्स व इतर सगळ्याच गोष्टींची त्या त्या प्रमाणात वाढ होत असते.

हे सगळे बैजवार (सविस्तर) सांगायचे कारण म्हणजे कीटकांच्याबाबतीत जरा उलटे असते. Happy त्यांना एक्झोस्केलेटन (exoskeleton) असते. म्हणजेच कीटकांच्या शरीराच्या सर्वात बाहेरील जे आवरण असते ती आपल्यासारखी त्वचा नसते तर ते एक प्रकारचे कवच असते. हे कवच त्यांच्या शरीरातील अंतर्गत सगळ्या गोष्टींचे संरक्षण करते. जेव्हा कीटकांची अंतर्गत वाढ होते तेव्हा हे बाहेरचे कवच त्या वाढीला अपुरे पडू लागते, सहाजिकच हे अपुरे पडणारे कवच टाकून दिल्याशिवाय शरीराची वाढ होऊ शकत नाही. जेव्हा त्यांच्या शरीराची वाढ होते तेव्हा हे बाहेरचे कवच नैसर्गिकरित्या फाटून त्यांचे नवे शरीर बाहेर पडते म्हणजेच त्यांची वाढ होते.
जेव्हा एखादा कीटक असे जुने कवच टाकून बाहेर पडत असेल तेव्हा त्याची आई म्हणत असेल - झाला गं बाई माझा बाळ्या(बाळी) अमुक अमुक वर्षाचा (दिवसांचा/ आठवड्यांचा/का महिन्यांचा ???) आणि त्याचे सगळे मित्र त्याला "हॅपी बर्थ डे" म्हणून विश करत असतील .... Happy Wink

मात्र साप जी कात टाकतो त्याचा याच्याशी काही संबंध नाही कारण सापाला आपल्यासारखेच मणके ( व्हर्टिब्रल कॉलम ) असतो - त्यामुळे साप हा endoskeletonवालाच आहे - पण तो रेप्टाईल (सरपटणाराच ना ?? Happy ) आहे त्यामुळे त्याच्या शरीराच्या सगळ्यात बाहेर जे आवरण असते ते खवल्या खवल्यांचे असते. पण हे आवरण एकसंध पिशवीसारखे असते. कात टाकताना हे सगळे आवरण एकदम गळून पडते.

आता आपल्याकडे पहा Happy - आपली त्वचा ही दररोज नवनवीनच असते कारण त्या त्वचेच्या काही पेशी मरुन जातात आणि तिथे नव्या येत रहातात ... म्हणजेच आपले डिस्केलिंग "दररोज" होत असते .....
....त्यामुळे दररोज सकाळी आरशात बघून आपल्यालाही खुश्शाल गायला हरकत नाहीये - मी रात टाकली, मी कात टाकली ..... Happy Wink

-----------------------------------------------------------------------------------------------------
(फोटो आंतरजालावरुन साभार .....)

1C6770126-tdy-130404-grasshopper-skin-03.blocks_desktop_medium.jpghttp://www.insectidentification.org/process-of-molting.asp

http://en.wikipedia.org/wiki/Moulting

---------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, अजुन एक माहितीपूर्ण लेख आणि तोही सोप्या भाषेत. Happy

मला आतापर्यंत फक्त सापच कात टाकतात हे माहित होतं. Happy

मस्त लेख

मी झुरळाला कात टाकताना बघीतलं आहे. त्याला मारायचं सोडून त्याच्या कात टाकण्याचेच फोटो काढत बसले आणि मग त्या फोटोसेशन नंतर त्याला घराबाहेर सोडून दिला.

मस्त लेख.. आमच्याकडे भले मोठे प्रार्थना किटक असतात. अगदी १० सेमी ( डोके ते बूड.. हात पाय अलग. मारून पट्टीने मोजून बघितला. )
झुरळं पण कात टाकतात !

सर्वांचे मनापासून आभार्स ..... Happy

कीटकांचे जग हे आपल्याला कायम विस्मयचकित करणारे असे आहे... पृथ्वीवर अब्जावधी वर्षांपासून हे वावरत आहेत. त्यांच्याकडे जगण्यासाठी, अस्तित्वासाठी जी काय साधने आहेत किंवा अस्तित्वासाठी जे काय बदल त्यांनी स्वतःत घडवून आणले आहेत ते सारे शास्त्रज्ञांना भूल घालणारे असेच आहे ...

शशांक.....

जितका अभ्यासपूर्ण लेख तितकाच तो नाविन्याने सादर करण्याची तुमची हातोटी आहे. प्रेईंग मॅंटिसची ही "एक घर सोडून नवीन घर निर्माण करणे" देणगी त्याना निसर्गाने दिलेली आणि मला वाटते कित्येक कीटकांना ते जन्मजात वरदान आहे.

तुम्हाला माहीत आहेच की, डेव्हिड अ‍ॅटेनबरो यांचे नाव या शास्त्राशी अतिशय निकटचे आहे. बीबीसीने दहा भागात त्यांच्याकडून अशाच विविध विषयावर आधारित अत्यंत अभ्यासपूर्ण अशी डॉक्युमेन्टरी तयार केली आहे. तुमचा हा लेख वाचल्यावर त्यापैकी BBC Life of Insects हा भाग मी पुन्हा पाहिला....थक्क होऊन जातो आपण कीटकांची लाईफ सायकल पाहताना.

मला खात्री आहे की हे १० भाग तुमच्याकडे नक्की असतील. प्रत्येकी १ तासाचा बीबीसी हा खजिना सर्वांनी संग्रही ठेवावा असाच आहे.

मला आतापर्यंत फक्त सापच कात टाकतात हे माहित होतं. >> +१ मलाही..
खुप छान माहिती शशांक..
फोटो कितीही छान असले तरी मला किड्यांची फार म्हणजे फारच किळस वाटते..त्यामुळे मी भर्रकन स्क्रोल केल खाली..तरीही त्यांच्यावरच्या डॉक्युमेंट्रीज मी बघु शकते Happy

अरे वा...शशांकचे मी न वाचलेले लेख वर येताहेत.
मस्त माहिती.
प्रेइन्ग मॅन्टिस कसला हल्ला करतो.....पहा बरं ही लिंक उघडते का.............

https://youtu.be/hc6kdZzkfRE

हाहाहा किती मस्त लेख आहे. परत लेखकाचे नाव वाचले की पुरंदरेच आहे ना. कारण आपले सुंदर अध्यात्मिक लेख व कविता वाचलेल्या आहेत. हा प्रांतही काबीज केल्याबद्दल अभिनंदन.

मस्त लेख आहे. मी चक्राता ट्रिपमध्ये झाडावर अशा किड्यांच्या काती बघितल्या होत्या. तोपर्यंत माहितीच नव्हतं कीटकही कात टाकतात ते.