मागोवा

कंट्रोल... कंट्रोल

Submitted by मंजिरी सोमण on 11 August, 2010 - 05:14

आपल्यापैकी प्रत्येकालाच, स्वत:मधील एक तरी अशी गोष्ट असते, जी कंट्रोल कराविशी वाटत असते पण बरेचवेळा जमत नाही, ऐनवेळेला केलेला निश्चय गळून पडतो.

अशा कंट्रोल कराव्याश्या वाटणार्‍या गोष्टींबद्दल इथे लिहा..

सुरुवात माझ्यापासून.......
मला माझ्या रागावर कंट्रोल करावासा वाटतो, पण जमत नाही. Sad

गुलमोहर: 

गप्पागोष्टी स्नेहभेट उर्फ गटग

Submitted by मंदार-जोशी on 1 August, 2010 - 10:51

गप्पागोष्टी ह्या गप्पांच्या पानाला फार काळ लोटलेला नसल्याने आणि इथे येणारी लोकं प्रचंड कार्यमग्न असल्याने पानही फारसे वाहतं नसतं. अनेकांचे भ्रमणध्वनी क्रमांकही एकमेकांकडे नव्हते यामुळे गटगला उपस्थिती किती असेल ह्याबाबत मी जरा साशंकच होतो, तरीही Slow and steady... ह्या इंग्रजी म्हणीप्रमाणे गटग आयोजित करण्याचे धाडस तर करुया या विचाराने सगळ्यांना विपत्र टाकले. त्याप्रमाणे एक ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता कोथरुड येथील किमया हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं.

गुलमोहर: 

दलित उद्योजक

Submitted by मधुकर on 23 June, 2010 - 02:30

जूनच्या पहिल्या आठवडय़ात पुणे शहरात एक ऐतिहासिक घटना घडली.. ती घटना होती इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर भरलेल्या दीप एक्सपो २०१०ह्ण नामक व्यावसायिक औद्योगिक प्रदर्शनाची.. दलित समाजातील तरूण, होतकरू, प्रथम पिढीतील उद्योजकांनी आपापल्या उत्पादनांचं मांडलेलं असं होतं ते प्रदर्शन.. आम्ही दलित समाजातले आहोत हे खरं असलं तरी आम्ही उद्योग सुरू करताना ती भूमिका कुठेही मनाशी धरलेली नाही.. त्यासाठीच्या अवास्तव सवलती मागितलेल्या नाहीत, आणि व्यवसायात वा आमच्या उत्पादनांच्या दर्जात कुठेही तडजोड होऊ दिलेली नाही हे आत्मविश्वासानं दाखवून देणारं असं होतं ते प्रदर्शन..

गुलमोहर: 

२२ जुन १८९७

Submitted by स_सा on 22 June, 2010 - 03:18

एक स्मरण २२ जुन १८९७ चे

आज ह्या घटनेला ११३ वर्षे उलटली आहेत तरी प्रत्तेकवेळेस गणेशखिंड रस्त्याने जाताना ह्या प्रसंगाची आठवण नक्किच येते. ह्याच दिवशी १८९७ मधे ह्याच ठिकाणी दामोदर, बाळकृष्ण आणि वासूदेव ह्या बंधुनी रँड ह्या ब्रिटीष अधिका-याला गोळ्या घालून ठार मारले.

गुलमोहर: 

परीक्षा : असाव्यात की नसाव्यात....

Submitted by मंजिरी सोमण on 19 June, 2010 - 06:24

माझी मुलगी राधा, पहिल्या दिवशी शाळेत जाऊन आल्यावर तिच्या नविन वर्षाच्या डायरीत ८वी पर्यंत फक्त सहामाही आणि वार्षिक अशा २ च परीक्षा वर्षभरात घेणार असल्याचं कळलं. 'सर्व शिक्षा अभियानां'तर्गत, मुलांना जास्तीत जास्त प्रमाणात शाळेकडे खेचण्याचा, तळागाळातल्या मुलांनाही शाळेची, पर्यायाने शिक्षणाची गोडी लावण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या मधे २ मतप्रवाह आहेत .............

गुलमोहर: 

तेलविहीरीला लागली आग

Submitted by आशुतोष०७११ on 17 June, 2010 - 13:03

एप्रिल महिन्यात अमेरिकेतल्या लुझियाना प्रांतात घडलेला हा दुर्दैवी अपघात. दिनांक १२ एप्रिल रोजी ब्रिटीश पेट्रोलियम ( bp ) करता काम करणार्‍या डीपवॉटर होरायझन ( Deepwater Horizon ) नामक एका रीग ला रात्री आग लागली. ही रीग त्यावेळेस मेक्सिकोच्या आखातात ( Gulf of Mexico ) काम करत होती.

ह्या आगीत एकंदर १२ जणांना आपला जीव गमवावा लागला. खनिजतेल उत्खननात घडणार्‍या बहुतेक अपघातांमागे प्रमुख कारण मानवी त्रुटी ( human error ) हेच असते. त्याच दिवशी अगदी शेजारी असणार्‍या दुसर्‍या रीगवरुन घेतलेले हे काही फोटो.

100_1012_4.jpg

गुलमोहर: 

सिंगापुरात वर्षभर ऋतु एकच- उन्हाळा, पण ऋतुगंध किती विविध!

Submitted by अरुण मनोहर on 11 June, 2010 - 06:05

वर्षभरातल्या विविध ऋतुंचा आनंद सिंगापुरात राहून लुटता येत नाही. वर्षभर एकच ऋतु! उष्ण आणि दमट. अशा वातावरणात राहून ऋतुगंध कल्पनेतच शोधावा लागणार. पण हे काही कठीण नाही! मराठी मातीशी जोडलेल्या कल्पना, लेखन, नाट्य, संगीत आदी कलांची उणीव मराठी प्रेमींना जगाच्या पाठीवर कुठेही भासत नाही.

गुलमोहर: 

गझल सहयोगचा २३ मे २०१० चा मुशायरा

Submitted by अ. अ. जोशी on 25 May, 2010 - 12:10

नेहमीप्रमाणेच उत्तम झालेल्या या मुशायर्‍यात
अनंत ढवळे, अजय जोशी, भूषण कटककर(बेफिकीर), समीर चव्हाण, अरूण कटारे, कैलास गायकवाड या गझलकारांनी सहभाग घेतला. तसेच, इलाही जमादार यांनी प्रमुख आतिथ्य स्वीकारले.

नेहमीप्रमाणे बेफिकीर यांनी एकएका गझलकाराचे दोन-तीन शेर प्रस्तुत करून नाव पुकारल्यावर अजय जोशींद्वारे गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कैलास गायकवाड रस्ता चुकल्याने सुमारे २५ मिनिटे उशीराने आले. मात्र त्यांच्यासाठी ते येईपर्यंत मंचावर जागा रिकामीच ठेवली होती. उशीराने आल्यावरही गझल सहयोगच्या पद्धतीप्रमाणे कैलास यांचे दोन शेर वाचून, गुलाबपुष्प देऊन त्यांना आमंत्रित करण्यात आले.

गुलमोहर: 

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"(यु.आय.डी.ए.आय.-भारतीय विशेष ओळख [परीचय]प्राधिकरण)

Submitted by डावखुरा येडिसन on 18 May, 2010 - 15:43

"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल."
कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे. यासाठी प्रत्येक योजनेच्या खर्चाची पडताळणी सरकारने करावी...
इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी योजना अस्तित्वात असताना सामान्य माणसाची प्रगती का होत नाही?

गुलमोहर: 

कोकणातले ‘केरळ’...

Submitted by झुलेलाल on 15 May, 2010 - 02:07

मुंबईहून गोव्याकडे जाताना, संगमेश्वर ओलांडले, की एक मोठ्ठे वळण पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला `ओझरखोल' नावाचे गाव दिसते. टेकडीएवढ्या हिरव्यागार डोंगरावर, शाळेची एक बैठी इमारत आणि झाडांमध्ये लपलेली कौलारू, केंबळी घरे, उजवीकडे एक रोडावलेली खाडी आणि लहानसा डांबरी रस्ता... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. माधवराव मुळ्ये यांचं हे गाव. इथल्या प्राथमिक शाळेला, माधवरावांचं नाव दिल्यामुळे अनेकांना हे माहीत झालंय. संगमेश्वरच्या अलीकडे गोळवलकर गुरुजींचं गोळवली, आणि पलीकडे माधवराव मुळ्यांचं ओझरखोल... गोळवलीत गुरुजींच्या वास्तूस्थानी काही विकास प्रकल्पही सुरू झालेत...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मागोवा