गप्पागोष्टी

Submitted by मंदार-जोशी on 19 January, 2010 - 06:42

नमस्कार मंडळी,

हे गप्पांचे पान अगदी सर्वांसाठी आहे. या, मस्त मनमोकळ्या गप्पा मारा. ह्या पानावर गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; वय, विषय, वेळ, सामाजिक स्थान - कसलीच मर्यादा नाही.

मैत्री करा, एकमेकांना मदत करा, धम्माल करा. या पानावर नवीन मंडळींनी यावं, मित्र जोडावेत आणि टिकवावेत Happy अशांचे निखळ, निकोप गप्पागोष्टींसाठी माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत.

gago.jpg

कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!

मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा
सौजन्यः कलाकार - पद्मजा_जो (संगणकीय कलाकारी), udayone (मूळ रेखाचित्र).

गगो स्नेहभेट उर्फ डब्बा गटग

दिवाळी २०११ निमित्ताने एक लेख........ मी गगो बोलतोय
- लेखक स्मितहास्य (अमोघ शिंगोर्णीकर).

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपास म्हटलं की लोक चवताळतात. बट इन्टरमिटन्ट फास्टींग इज सो कूल यू नो Wink

चिंतोपंत, नॉर्मल धार्मिक कारणासाठी केलेल्या उपासाला काय काय हादडता बर? (Sorry हे वैयक्तिक होतंय)
नॉर्मल धार्मिक कारणांसाठी केलेल्या उपासाला लोक काय काय हादडतात्त बरं?

मुळात हिंदू धर्मातल्या उपासांना शास्त्रीय बैठक आहे. त्यामुळे उपासांना धार्मिक / इतर कारणांमुळे असे वर्गीकरण करणे खोडसाळपणाचे आहे. इतर कारणे फक्त आजारांमुळे उद्भवलेली वैद्यकीय कारणे असू शकतात. मात्र आम्ही उपास करतो म्हटलं की लोक कुचेष्टा करतात, मात्र इन्टरमिटन्ट फास्टींग म्हटलं की आम्ही कसे कूल, फुरोगामी, वगैरे असल्याचा टेंभा मिरवता येतो. नै? Proud

आता लोक काय हादडतात ते मी कसं सांगणार? पण वैय्यक्तिक प्रश्नाचे उत्तर असे की, उपास करताना मी काहीच हादडत नाही. जेवणाच्या वेळी कधीतरी एखादं केळं किंवा एक ग्लास लिंबूपाणी / कुठला तरी जुस, तो पण सहज उपलब्ध असला तर.

सद्ध्या आयपीएलने वात आणलाय. या हिंदी समालोचनावर बंदी आणली पाहीजे. काहीही बकत असतात. चुकून परवा तो चॅनल लागला आणि

"विकेटका पतन हो गया" हे दिव्य शब्द कानावर पडले. चायला ते काय शीघ्रपतन आहे Rofl

हाय लोक्स Happy
पंताच्या फेबु च्या पोस्टीतली काही वाक्य मला एका धाग्याच्या माझ्या प्रतिक्रीयेसारखी वाटली. Wink

सध्या मी मुर्ख अधिकार्यांना कंटाळले आहे.काम करण्याच्या कंटाळा येतोय हल्ली. Sad