गझल सहयोगचा २३ मे २०१० चा मुशायरा

Submitted by अ. अ. जोशी on 25 May, 2010 - 12:10

नेहमीप्रमाणेच उत्तम झालेल्या या मुशायर्‍यात
अनंत ढवळे, अजय जोशी, भूषण कटककर(बेफिकीर), समीर चव्हाण, अरूण कटारे, कैलास गायकवाड या गझलकारांनी सहभाग घेतला. तसेच, इलाही जमादार यांनी प्रमुख आतिथ्य स्वीकारले.

नेहमीप्रमाणे बेफिकीर यांनी एकएका गझलकाराचे दोन-तीन शेर प्रस्तुत करून नाव पुकारल्यावर अजय जोशींद्वारे गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कैलास गायकवाड रस्ता चुकल्याने सुमारे २५ मिनिटे उशीराने आले. मात्र त्यांच्यासाठी ते येईपर्यंत मंचावर जागा रिकामीच ठेवली होती. उशीराने आल्यावरही गझल सहयोगच्या पद्धतीप्रमाणे कैलास यांचे दोन शेर वाचून, गुलाबपुष्प देऊन त्यांना आमंत्रित करण्यात आले.

गझलेच्या प्रत्येकी ३ फेर्‍या झाल्या. उत्तरोत्तर रंगत चाललेल्या मुशायर्‍यामध्ये श्रोत्यांमुळे जान आली. त्याचप्रमाणे श्रोत्यांनी आजपर्यंत न ऐकलेल्या गझला श्रोत्यांनाही ऐकायला मिळाल्या. अनंत ढवळे यांनी 'पानगळ' मधील काही गझला व शेर ऐकवले. बेफिकीर यांनी पूर्वी सादर न केलेल्या नवीन रचना ऐकवल्या. तर अजय जोशी यांनी कुठेही प्रकाशित न केलेल्या गझला व शेर ऐकवले. अरूण कटारे यांनीही काही सुरेख आणि वेगळ्या गझला ऐकवल्या. समीर चव्हाण यांनी 'हौस' या त्यांच्या गझलसंग्रहातील निवडक गझला ऐकवल्या. कैलास यांचा अनुभव सर्वांनाच नवीन होता. मात्र, श्रोत्यांनी या सर्वांना दिलेल्या खुल्या प्रोत्साहनामुळे मुशायर्‍यात प्राण आले. त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार.

मिल्या, मधुघट, शरद, प्रमोद खराडे हे गझलकार, तसेच घनःश्याम धेंडे, स्वाती सामक या जुन्या लोकांमुळे गझल सादर करतानाही उत्साह मिळत होता. मुशायरे करणारे अनेक असतात. मात्र, स्वतः गझलकार असून ते ऐकायला येणारे खरेच मोठे असतात. त्यांच्यामुळेच मुशायरा रंगतो.

सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमाचा शेवट इलाही जमादार यांच्या 'जखमा अशा सुगंधी' या गझलेने झाला. आणि श्रोत्यांमधून आलेली एक फर्माईश त्यांनी पूर्ण केली व कार्यक्रम समाप्त झाला.

धन्यवाद!

गुलमोहर: