दलित उद्योजक

Submitted by मधुकर on 23 June, 2010 - 02:30

जूनच्या पहिल्या आठवडय़ात पुणे शहरात एक ऐतिहासिक घटना घडली.. ती घटना होती इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर भरलेल्या दीप एक्सपो २०१०ह्ण नामक व्यावसायिक औद्योगिक प्रदर्शनाची.. दलित समाजातील तरूण, होतकरू, प्रथम पिढीतील उद्योजकांनी आपापल्या उत्पादनांचं मांडलेलं असं होतं ते प्रदर्शन.. आम्ही दलित समाजातले आहोत हे खरं असलं तरी आम्ही उद्योग सुरू करताना ती भूमिका कुठेही मनाशी धरलेली नाही.. त्यासाठीच्या अवास्तव सवलती मागितलेल्या नाहीत, आणि व्यवसायात वा आमच्या उत्पादनांच्या दर्जात कुठेही तडजोड होऊ दिलेली नाही हे आत्मविश्वासानं दाखवून देणारं असं होतं ते प्रदर्शन.. आरक्षणाची मागणी आग्रहानं प्रतिपादित करण्यासाठी पुण्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला पहिला करार आणि आरक्षणासारखे मुद्दे बाजूला ठेवून उद्योगाच्या आघाडीवर तमाम दलित तरूणांनी एकत्र येण्यासाठी डिक्की नामक संघटनेनं केलेला तो दुसरा ऐतिहासिक करार.. एकविसाव्या शतकात पुण्याच्याच पुण्यभूमीवर नियतीशी केलेला जणू दुसरा ऐतिहासिक करार..

अधिक माहितीसाठी ईथे वाचा

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=793...

http://www.indianexpress.com/news/the-dalit-evangelists/636003/

हि डिक्कीची वेबसाईट

http://www.dicci.org/en/

गुलमोहर: 

लोकसत्तातील लेख मी वाचला रविवारीच..

आम्ही दलित समाजातले आहोत हे खरं असलं तरी आम्ही उद्योग सुरू करताना ती भूमिका कुठेही मनाशी धरलेली नाही.. त्यासाठीच्या अवास्तव सवलती मागितलेल्या नाहीत, आणि व्यवसायात वा आमच्या उत्पादनांच्या दर्जात कुठेही तडजोड होऊ दिलेली नाही हे आत्मविश्वासानं दाखवून देणारं असं होतं ते प्रदर्शन..

लेख वाचताना हे वाचले तेव्हा खरेच बरे वाटले. हा दृष्टीकोन ठेवला तरच यशस्वी होता येईल.

सगळ्या मेहनतीवर स्वतःची प्रगती साधणार्‍या उद्योजकांना भरपूर शुभेच्छा Happy तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन वेळोवेळी लाभो.

आम्ही दलित समाजातले आहोत हे खरं असलं तरी आम्ही उद्योग सुरू करताना ती भूमिका कुठेही मनाशी धरलेली नाही.. त्यासाठीच्या अवास्तव सवलती मागितलेल्या नाहीत, आणि व्यवसायात वा आमच्या उत्पादनांच्या दर्जात कुठेही तडजोड होऊ दिलेली नाही हे आत्मविश्वासानं दाखवून देणारं असं होतं ते प्रदर्शन..
>> मनापासून अभिनंदन!

सर्व उद्योजकाना शुभेच्छा.............

पण मनापासुन एक वाटते, आता उद्योजकान्मधे पुन्हा ही "जात" का आली.........?
"दलित उद्योजक" असे वाचताना कसतरिच वाटले...... यशस्वी उद्योग करत असताना त्यात का परत "जात" आणायची?? ... आणि कुठेही सवलती न मागता केलेला हा स्तुत्य प्रयोग असताना, कशाला आपणच "दलित उद्योजक" म्हणवुन घेताय..... तुम्हीही आमच्यासारखेच "यशस्वी उद्योजक" आहात.......... शक्य झाल्यास हा उल्लेख टाळा आणि मुख्य प्रवाहात अभिमानाने सामिल व्हा.....!

पुन्हा एकदा शुभेच्छा.....!

"दलित उद्योजक" असे वाचताना कसतरिच वाटले...... यशस्वी उद्योग करत असताना त्यात का परत "जात" आणायची?? ... आणि कुठेही सवलती न मागता केलेला हा स्तुत्य प्रयोग असताना, कशाला आपणच "दलित उद्योजक" म्हणवुन घेताय..... तुम्हीही आमच्यासारखेच

महिला बचत गट, महिला उद्योजका ही संकल्पना आपण मान्य करतो अन महिला उद्योजकांच्या धडाडीला दाद देतो. त्यांच्या एकत्र येण्याला सबलीकरण समजतो, (महिलासुद्धा शोषीत गटात मोडतात) त्या एकत्र येऊन परिस्थीतीवर मात करतात व व्यवसाय उभारतात तेंव्हा आपण महिला उद्योजक/महिला बचत गट हे नाव लावु नका असे नाही म्हणत. डावलल्या गेलाला गट अडचणीवर मात करतो याचं कौतुक करतो.

ते त्यांचे सबलीकरण आहे हे आपण मान्य करतो. मग हाच न्याय दलित उद्योजकांना का लागु असु नये?

खरेतर अश्या प्रयत्नांची गरज महिला उद्योजकांपेक्षाही दलित उद्योजकांना अधिक आहे. दलित लेबल हे फक्त वस्तुस्थिती दर्शवण्यासाठी एक सामाजिक नोंद आहे. दलित म्हणले म्हणजे त्याचे भांडवल केले असे नाही किंवा कुणी आमच्यावर दया दाखवा असाही नाहि.

तो फक्त आपल्या दलित बांधवना हक्काची जागा वाटावं एवढ्यासाठीच.

दलित म्हणले म्हणजे त्याचे भांडवल केले असे नाही किंवा कुणी आमच्यावर दया दाखवा असाही नाहि.
>>> हे सर्वात जास्त महत्वाचे. हाच विचार अजून दोन पिढ्यापर्यंत राहिला तर समाजामधे "दलित" हा वर्ग शिल्ल्कच राहणार नाही.

सर्व उद्योजकाना हार्दिक शुभेच्छा!!

अभिनंदन आणि शुभेच्छा.
भ्रमरचा मुद्दा पण पटला आणि नंतर महिला उद्योजकवाला मुद्दा पण पटला.
पुढे जाऊन आपण मराठी उद्योजक हे लेबल लावतोच आहोत की असाही विचार आलाच डोक्यात.

पण कुठेतरी लेबलं गळून पडण्याकडे वाटचाल व्हायला हवी असं वाटतं हे निश्चित.

पण कुठेतरी लेबलं गळून पडण्याकडे वाटचाल व्हायला हवी असं वाटतं हे निश्चित. >> अनुमोदन

दिलेल्या दोन्ही वृत्तपत्रीय लिंक्स वाचल्या.

सर्व उद्योजकांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व अभिनंदन! Happy