दिवाळीची सुट्टी लागण्याच्या जवळ जवळ महिनाभर आधी एक दिवस सहज बोलता बोलता ठरलं ह्या दिवाळीत देखील एक ट्रेक मुलांसाठी न्यायचा. ठिकाण ठरलं "नाणेघाट".त्यादृष्टीने आखणी सुरु झाली आणि मी मायबोलीवर पण नाणेघाटला जायचंय हे जाहीर केलं. जाहीर केल्या केल्या पहिला इमेल मला वाटतं पूनम आणि गुब्बीचा आला. मग पुन्हा पुणेकरांना बरोबर घ्यायचं तर नाणेघाट तस गैरसोयीचं ठरेल म्हणून काथ्याकुट होऊन शेवटी राजमाचीवर शिक्कामोर्तब झालं.
तारीख/वेळ/ठिकाण
१३ नोव्हेंबर, २०१०/ ११:०० ते २:०० (अधिकृत) /मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणा र्या रस्त्यावर, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे. ( त्याच दिवशी/ २:०० ते ५:३०/ गटगचे पुढील सत्र @ काफ्का / काफका असेल तो)
मित्रहो, आज आपण वाचणार आहोत एका नाही तर दोन गटगंचे वृतांत.
महाराष्ट्रात आदर्श घोटाळा झाला आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरून जाणार हे निश्चित झाले आणि ते नैतिकतेला धरूनच आहे परंतु या वाहत्या गंगेत राष्ट्रवादीच्या काही " दादांनी " हात धुऊन घेण्यासाठी धावपळ सुरु केली राष्ट्रवादीतही अखेर बदल होत अजित दादा उपमुख्यमंत्री झाले पण छगन भुजबळ यांच्य्सारख्या बहुजन हिताचा विचार करणारा नेता काहीही ठोस कारण नसतांना पायउतार केले हे राजकारणाचे खरे रूप महाराष्ट्र समोर आले . खरतर नाशिक ,धुळे , जळगाव, या उत्तर महाराष्ट्रावर सुरुवातीपासूनच अन्याय होत आला आहे .
दिवाळीच्या दिवसांनी अडवलेला एक रिकामटेकडा शनीवार ठाण्याच्या गटग साठी निवडला गेला असल्यामुळे बरीच लोकं उपस्थित असणार हे साहजीक होतं. योगमहे आणि मी सकाळी ९.३० पर्यंत ठाणे स्टेशनला भेटुन मग गडकरीला एकत्र जायचं ठरवलं होतं. प्रमाणबद्द भारतीय वेळेचा शक्य तितका मान राखुन आम्ही १० ला भेटलो आणी पाचच मिनीटांत गडकरीला पोहोचलो.
मायबोलीचे सर्वेसर्वा वेबमास्टर श्री. अजय गल्लेवाले यांनी १०-१५ दिवसांपूर्वी पुण्यातले पुणेकर वर "माझ्यासारख्या नविन माणसाला पुणेकरांना भेटायचं असेल तर काय करावं लागेल?" अशी विचारणा केली आणि कार्याध्यक्षांसमवेत खंद्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळण्याचा विडा उचलला. दिवाळीत वेबमास्टर येणार असूनही ६ नोव्हेंबरच्या भाकड दिवशी भेटीच्या कल्पनेवर बर्याच माबोकरांनी तीव्र शब्दात निषेध तर स्क्रीनवर तुच्छ कटाक्ष नोंदवले. त्यामुळे फेरविचार होऊन १ नोव्हे आणि १३ नोव्हे असे दोन जीटीजी करायचे असे ठरले आणि सभासदांनी मूक संमती नोंदवली.
सोनियांच्या रॅलीसाठीच्या फंड कलेक्शनचं काँग्रेसी वास्तव
वर्ध्याला उद्या सेवाग्राममध्ये होणारी सोनिया गांधींची रॅली आता वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. तसं पाहिलं तर कुठल्याही पक्षाच्या आणि पक्षनेत्यांच्या रॅल्या किंवा जाहीर सभा कशा आयोजित केल्या जातात. हे सर्वांसाठीच एक उघड वास्तव असतं. पण आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच हे वास्तव प्रसारमाध्यमांसमोर त्यांच्याही नकळत उघड केलंय.
गप्पागोष्टी हे पान सुरू करून आता बरेच दिवस झाले. त्यावर भेटणार्या मंडळींची संख्याही दिवसेदिवस वाढत चालली आणि मग सहाजिकच विषय छेडला गेला तो गटगचा. हे गटगचे गुर्हाळ आपले २ महिने तसेच चालू... शेवटी मी (भुंगा - श्री. मिलिंद पाध्ये) आणि आपले डॉक्टर (डॉ. कैलास गायकवाड) यांनी येत्या शनिवारी आम्ही दोघे पुण्यात येतोय ज्यांना शक्य असेल त्यांनी भेटायचे असा फतवाच काढला. कुठे कधी कसे भेटायचे हे आमच्या दोघांचे नक्की झाले होते. डॉक्टरांचा "बेफिकिरजींशी" पुर्वपरिचय असल्याने तेही नक्की भेटणार असे ठरले होते. अगदी शुक्रवार संध्याकाळपर्यंत आम्ही तिघे भेटणार आणि मग मंदारच्या (श्री.
भारतीय नेव्हीतील कमांडर दिलीप दोंदे (वय ४२ वर्षे) ह्यांना त्यांनी पुर्ण केलेल्या सागर परीक्रमाबद्दल एका परीसंवादात ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी सांगितलेल्या माहीतीचा थोडक्यात सारांश खाली दिला आहे. अधिक माहीती त्यांच्या अनुदिनीवर आहे. ह्या अवघड कामगिरीला पार पाडण्यात त्यांच्या आईने त्यांना सतत प्रोत्साहन दिले व ते त्याबद्दल आईचे आभार मानतात.
गेल्यावेळचा कँपचा अनुभव बघता अजून एका कँपची मागणी झालेली. पण तेव्हा लगेच नेणं शक्य झालं नव्हतं. आता ह्या दिवाळी सुट्टीत लहान मुलांना बरोबर घेऊन एक विकांत "राजमाची" ला जायचा प्लॅन केलाय. (नाणेघाट पुण्याहून येणार्यांसाठी गैरसोयीचा होईल म्हणून हा बदल केलाय. शिवाय गेल्या आठवड्यात आमच्या गृपच्या कॅप्टनने बरोबर ४-५ जणांना घेऊन फिनिक्स ह्या शारिरीक अपंगांच्या संस्थेच्या लोकांना घेऊन राजमाचीला ट्रेक केला आहे)
तारिख आहे १३-१४ नोव्हेंबर २०१०
मुंबईकरांसाठी बसची सोय असेल. पुणेकरांना लोणावळ्याजवळ बस पिक अप करेल.
माझी तर एवेएठि च्या आधी पासून तारंबळ ऊडाली होती. झक्कींची खास योजना होती २५ तारखेला बारा हून फिली ला जाताना वाटेत सुमा फुड्स मधून उकडीचे मोदक घ्यायचे. मुख्य म्हणजे कोणी विचारलं तर त्यांना " फचिन आणि टण्या ह्यांच्याकरता मुली सांगून आल्या आहेत आणि त्यांना भेटून आपण पुढे प्रस्थान करणार आहोत" असं ते सांगणार होते. कोणाला आजिबात काहीच सांगू नका असा दम पण भरला मला. आता घ्या! मी आपलं ह्या कार्यक्रमामुळे उशीर होईल म्हणुन हळूच पोस्टींमधून , जरा लवकरच निघूयात का असं आडून आडून सुचवत होतो.