political encounter

Submitted by पार्थ देसले on 10 November, 2010 - 07:17

महाराष्ट्रात आदर्श घोटाळा झाला आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरून जाणार हे निश्चित झाले आणि ते नैतिकतेला धरूनच आहे परंतु या वाहत्या गंगेत राष्ट्रवादीच्या काही " दादांनी " हात धुऊन घेण्यासाठी धावपळ सुरु केली राष्ट्रवादीतही अखेर बदल होत अजित दादा उपमुख्यमंत्री झाले पण छगन भुजबळ यांच्य्सारख्या बहुजन हिताचा विचार करणारा नेता काहीही ठोस कारण नसतांना पायउतार केले हे राजकारणाचे खरे रूप महाराष्ट्र समोर आले . खरतर नाशिक ,धुळे , जळगाव, या उत्तर महाराष्ट्रावर सुरुवातीपासूनच अन्याय होत आला आहे . परंतु भुजबळांच्या निमित्ताने हा अन्याय काहीसा दूर झाला होता परंतु राजकारणात पॉलीटिकल इंकौनटर कायमच होत आले आहे . त्याचाच बळी भुजबळ ठरले आहेत . पण भुजबळ म्हणतात त्या प्रमाणे राजकारणात जर तरच्या प्रश्नांना उत्तर नसतात हेच खरे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भुजबळ स्वतः मन्त्रीपदावर अनेक वर्षे वेटोळे घालून बसले आहेत.शिवाय त्यांचा मुलगा नान्दगावचा आमदार आहे. पुतण्या नाशिकचा खासदार आहे,. भुजबळानी सर्व पदे स्वतःच्या घशात घालून इतर कार्यकर्त्यावर अन्याय केलाय हे दिसत नाही का तुम्हाला?