अजय - गटग - वृतांत १३ नोव्हेंबर, २०१०

Submitted by आयडू on 15 November, 2010 - 12:46

तारीख/वेळ/ठिकाण
१३ नोव्हेंबर, २०१०/ ११:०० ते २:०० (अधिकृत) /मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणा र्‍या रस्त्यावर, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे. ( त्याच दिवशी/ २:०० ते ५:३०/ गटगचे पुढील सत्र @ काफ्का / काफका असेल तो)

मित्रहो, आज आपण वाचणार आहोत एका नाही तर दोन गटगंचे वृतांत.

११:०० वाजताची (नियोजित) वेळ मुंबईकर अगदी थोडक्यासाठी पाळू शकले नाही. ह्यास कारण वाहतूकीची फक्त कोंडीच नसून खात्रीलायक सुत्रांनुसार समजलेली बातमी अशी की गेल्या दहा वर्षात पुण्यात झालेला आमुलाग्र बदल, खड्ड्यातले रस्ते, घाटातल्या दॄतगती महामार्गावरून होणारी चतुष्पाद प्राण्यांची अवैध वाहतूक, उर्मट बाईकस्वार इ. इ. चा होणारा परिणाम आहे. आमच्या बरोबरच्या (म्हणजे आम्ही ज्यांच्या बरोबर होतो त्या) 'नी' ह्यांनी वाटेत एका उर्मट बाईकस्वारास 'समज' देण्याचाही प्रयत्न केला. (त्यांच्या हातात त्यावेळेला तेवढंच होतं नाहीतर... असो. पुन्हा केंव्हातरी...)

तर आम्ही मजल दर मजल करत नियोजित ठिकाणी पोचलो. तेथे कार्याध्यक्ष अन् उत्सवमुर्ती चर्चा करत होते. तर गटग व्यवस्थापक हजेरी घेत होते. अन् मनातल्या मनात काहीतरी आकडेमोड करत होते. चौकशी अंती असे आढळून आले की, ते सेहवागवर पैसे लावताहेत. ह्या जीटीजीस मायबोलीकर - जीएस, प्राची, साजिरा, (बाळू जोशी, झक्की रॉबिनहूड ह्यांची ही उपस्थिती (उल्लेखातून) लाभली तसेच आशूडी माता, आरती२१, रैना, डूआय, फुली न समाई हुई अश्विनीके, नीरजा, बघना फेम स्वाती, देवा, श्रेयस, पूनम, मिल्या, शैलजा, रूमा, अरभाट सर, टण्याराव , ह बा, शंतनु, दिमडू, अग्निपंख, वळसंगीकर, अनंत पावसकर, प्रॉस्पेरिटी अन् बच्चे कंपनीमध्ये मिहिका, नचिकेत अन् अजून एक गोड मुलगी होती (नाव लक्षात नाही.) ह्यांची उपस्थिती लाभली.

इतक्या सगळ्या लोकांची सोय मल्टिस्पाइस मध्ये भारी केली होती. गटग व्यवस्थापकांनी ज्यु मातेच्या मदतीने मेन्यू ठरवला व फटाफट ऑर्डर दिली. अन् मग खमंग विषयांवर चर्चा चालू झाली. त्याची सुरवात ओळख परेडने झाली. ह्या गटगत विविध विषयांवर चर्चा झाल्या - ते विषय असे >>
उद्योजकांच्या टेबलावर - मायबोलीचे बदलतं स्वरूप, revenue generation strategy इ.
संयुक्ता प्रतिनिधी अन् काही पुरूष मायबोलीकर हे संयुक्ता सारखं फोरम पुरूषांसाठीही असणे किती संयुक्तिक ठरेल ह्यावर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात मग्न होते तेंव्हाच सरांचे आगमन झाले व त्यांनीही ह्या चर्चेत साजिरा ह्यांच्या बरोबर उडी घेतली.

अश्विनीके ह्यांनी संयुक्तांसाठी (एकीस एक) भेट म्हणून छोटीशी पर्स आणली होती. पुरूष माबोकरांसाठी मात्र त्या काही आणू शकल्या नाहीत. ह्याचा निषेध म्हणून सर्व माबोकर पुरूषांनी तीव्र नापसंती दर्शवत संयुक्ताकची अधिकॄत घोषणा केली. तिकडे जीएस व अजय मायबोलीचे बदलतं स्वरूप, revenue generation strategy, उद्योजक, ओबामा, आऊटसोर्सिंग, ग्लोबलवॉर्मिंग, अन् ह्यातून निर्माण होतील अश्या उद्योगांच्या विविध संधी ह्या अन् अश्या अनेक गंभीर विषयांवर चर्चा करत होते.

[ती चर्चा सोडून मी संयुक्तांशेजारी बसलो नी त्यांची बोलणी मन लावून ऐकत होतो. तिथं एकीकडे साड्या, शॉपिंग, बालदिनानिमित्तचे कार्यक्रम, अन् एकीकडे अर्भाट, साजिरा ह्या जोडीने सर्व संयुक्तांचा संयुक्तरितत्या सामना केला. (ह्या सगळ्यात चिनुक्सचाही अप्रत्यक्ष सहभाग होता.) बाकीचे सर्व जण ह्या लढ्यात उतरण्यापेक्षा मसाला पापड, सूप्सचा आस्वाद घेत शांत बसून होते. शंतनू आपल्या लेहतल्या पोस्टिंगबद्दल भरभरून बोलत होते. त्यांना मायबोलीचा(च) विरंगुळा तेथे होता असेही ते म्हणाले. एका मायबोलीकरास टण्या व मिल्या ह्यांना भेटण्याची अतिशय उत्सुकता होती. त्यांची ही उत्सुकता मिल्याने लवकरच शमवली. [असेही ऐकण्यात आले आहे की मिल्याने आल्या आल्याच एक नवी गझल पेश केली - बेफिकिरीत सारे काही माफ आहे...] मिल्या, वैनी अन् नचिकेत ह्यांच्याबरोबरच मिल्याची GF ही आली होती. पण ती काही कारणास्तव आत आली नाही. (बहुदा ती माबोकर नसावी.) एक मात्र मान्य करावेच लागेल मिल्याची GF भारी आहे. (पुढील वेळेस अर्भाट सर, मी व डॉकने मिळून निदान एक तरी GF आणायचीच असा विचार आहे.) टण्याने मात्र येण्यास थोडा उशीरच केला. अर्थात तो अन् रजनी पुढील माबो अंकातल्या संवादासाठी भेट ठरवत असल्यामुळे त्याला तेवढी सूट देण्यात आल्याचे कळते. ह्या नंतर एकेरीत माबोकरांनी स्वतःची ओळख करून दिली. सर्वांची ओळख वैनींनी करावी असा ही आग्रह धरण्यात आला पण त्यांनी तो मोह टाळला. मला स्वतःला संयुक्तांशेजारी बसल्याचा थोडा बहुत फायदा झाला... आशुडी, प्राची दिमडू बरोबरच बघना फेम स्वातीचीही ओळख झाली. (ती म्हणे पुपुवर असते.. आधी कुठल्या आयडीने होतीस का असे विचारताच मी काही डूआय नाही असे तिने पुणेरी बाण्यात ठणकावून सांगितले.)
मी ललित कला केंद्रचा - पटियाला, गढवाल साड्यांवर ६० % सूट असा एसेमेस वाचून दाखवत असतानाच साजिर्‍यास काय झाले कळले नाही तो काही काळ रम्य आठवणीत बुडून गेला. पण शेवटपर्यंत त्याने संयुक्तांशेजारची जागा काही केल्या सोडली नाही!
मुंबईकर पावसकर ह्यांनी आवडती गाणी ह्यावरच एक ई बूक सर्वांसाठी आणलं होतं ते त्यांनी सर्वांना वाटताच आशूडी, स्वाती thank you म्हणत आभार व्यक्त केले. तेंव्हा त्यांनी आभार तरी मराठीत माना की असे म्हणताच पुढील वाद टाळण्यासाठी आशूडीने लगेचच धन्यवाद म्हटले. (भावना पोचल्या की झाले भाषा कुठली का असेना असे ती स्वातीला म्हणाल्यावर स्वातीने केवळ बघना म्हटले.) रूचकर जेवणाचा आस्वाद घेऊन माबोकरांनी उभ्या उभ्या गप्पांना सुरूवात केली. थोड्या वेळाने अजय ह्यांनी मला आता निघायलाच हवं असं म्हणत हा गटग आता संपत आल्याची जाणीव करून दिली.

निरोपानिरोपी झाल्यावर आम्ही सीसीडीत जायला निघालो पण तिथं असणारी गर्दी लक्षात घेता काफ्का / काफका त गेलो. जीएस अजयना सोडायला गेलाय म्हणजे त्याने कल्टी मारली असां गोड गैरसमज रैनाने केला पण जीएस आलाच. आल्या आल्या त्यानं तिथल्या सरदारांना जलालुद्दिन वगैरे नावने संबोधन करत?त्यांची चौकशी केली. मला वाटलं की जीएस इथं नेहेमीच येत असल्या कारणानं आता एखादी लैला येऊन अरबी डान्स करते की काय.. पण तसे होणे नव्हते. अर्भाटसरांनी चिनुक्स कडून व्यवस्थापकपदाचा कारभार घेतला व कोणीही ऑर्डर घ्यायला येत नाही असे पाहून वरून पेन व कागद घेऊन स्वतः च ऑर्डर लिहून घेतली. नंतर सरांनी तिथली पुस्तकं पहात उर्मिला, दिपीका, कत्रिना वगैरेंवर चर्चा केली. हळू हळू ती चर्चा वर्षा, अभिषेकवर घसरली. तत्पूर्वी आलेल्या साजिरा व आशूडी आता फोनवरून जोर जोरात काहीतरी बोलत होते. आशूडी भावी उद्योजिका होणार असल्याने अतिशय हळू आवाजात बराच वेळ बोलत होती. काय ते फार कळले नाही पण त्या फोन कॉल मध्ये एकूण २ वेळा Blush ७ वेळा Proud तिनं केलं.
साजिरा मात्र भयानक वैतागला होता फोनवर तो कोणाला तरी झापत होता. २७४०/- ... अरे पण... बघना... च्यायला.... कळत नाही का.... एटीएम मध्ये पैसे काढतात रे.... असं बरंचस काही बोलत होता. एकूणच उद्योजक होणे हे फार कठिण काम आहे असे तो शेवटी म्हणाला देखील. इथं कॉफी पान झाल्यावर आम्ही लोक्स
कॅफेच्या बाहेरच कला, संगीत व साहित्य ह्या विषयांवर चर्चा करत होतो. शेवटी पावसामुळं आम्हाला तात्पुरती रजा घ्यावी लागली नाहीतर आम्ही पुन्हा कॅफेत जायचा प्लॅन केला होता.

ह्या गटगची ठळक वैशीष्ठ्ये:-

स्वातीनं 'बघना', आशूनं फिदीफिदी व मी नवा ( नाव फायनल नाही) आयडी घ्यायच ठरवलं.
प्राचीचा फोन भारी आहे. त्याचे फोटो काढून झाले.
वैनींचा फॅनक्लब काढायची अधिकृत घोषणा आज झाली.
संयुक्ताक (कंपू) असा खास पुरूषांसाठीचा विभाग सूरू करण्यासाठी कार्यकारिणी नेमली गेली.
मिल्या वैनी व GF बरोबर आला होता.
साजिरा पूर्णवेळ फोनवर कुणालातरी झापत होता.
अजय हा आपला डूआय असल्याचं अजय ह्यांनी (जे ऑलमोस्ट सगळ्यांना माहित आहे) सांगितलं.
बाकीची इथं पोस्ट करता येणे अवघड आहे.

दिवे घ्या खूप आहेत Light 1

अजय तसेच सर्वांचे आभार. माबो परिवारातली जीटीजी नेहमीच सॉल्लिड होतात तसेच हे ही झाले. साजिर्‍याचे विशेष आभार. आता फोटो टाक बरंका मित्रा.

गुलमोहर: 

Happy थँक्यु रे डुआय. बरेच डिस्कशन मी मिसले असे वृत्तांतावरुन वाटते आहे.
मज्जा आली खरंच.

बाकी सर्व कॉफीवर्चस्ववादी लोकांचा आणि फिरंगी चहाचाहत्यांचा निषेध. Proud

छान वृत्तांत Happy डुआया, आपण दोघं ठाण्याहून निघून वाशीला नीरजाला भेटून पुण्याला पोहोचेपर्यंतही आपला वेळ झक्कासच गेला Happy

धन्यवाद रे डुआया. Happy वृ साठी तुला डिस्टिंग्शनातले मारकं देण्यात येत आहेत. पण तू माझे आधीच विशेष आभार मानून मोकळा का झालास, ते काय कळले नाही. मारकं मिळाल्यावर मानायचे अरे. Proud

डुआया, कामगिरी चोख बजावल्याबद्दल शाब्बास. माझ्याबद्दलच्या अनेक गोष्टी (वाद नको म्हणून धन्यवाद, भावी उद्योजिका, नवीन आयडी इ इ ) मला तुझ्याकडूनच कळाल्यामुळे अनेकानेक धन्यवाद. Happy
* डुआय ने माबोवरील डुप्लिकेट आयडींची प्रतिमा खराब असल्याने ती उंचावण्यासाठी हा आयडी घेतला असल्याचा निर्वाळा दिला तरी 'अखिल डुप्लिकेट आयडी समाज प्रतिष्ठान' कडून अशा स्वाभिमानाला ठेच देणार्‍या समाजविघातक कृत्याविरुध्द तात्काळ कारवाई व्हावी अशी याचिका दाखल झाल्याचे सूत्रांकडून समजते. Proud

Happy छान. स्वाती, तुला कबूल केल्याप्रमाणे __/\__ आशू, टण्याला जबर गुगली टाकल्याबद्दल तुलाही __/\__
जीएससारखे भांडवलशाहीचे प्रतिनिधी माझ्यासारख्या कामगारांचे शोषण करतात. आता तरी पगार द्या की!
'अजय, खरे सांगा, संयुक्ताचे प्रशासन आता बोस्टनहून नाही तर मंत्रालयातून चालते ना?' या माझ्या प्रश्नाला 'संयुक्ताचे प्रशासन करणे शक्य आहे, असे मुळात वाटते का? का?' असे उत्तर मिळाले.
पुरूषजातीच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी (उदा. पुपुवर आशाकाळे, अलकाकुबल, विद्यासिन्हा इ.चे अनिर्बंध फोटो टाकता न येणे, बायकी खरेदीच्या चर्चा सहन कराव्या लागणे, इ.) एक पुरूषग्रूप सुरू करावा अशी कल्पना (परत एकदा) चर्चिली गेली. त्यावर आशूने 'त्याला संयुक्तिक नाव पाहिजे' असे ठासून सांगितले. तेव्हा 'संयुक्ताक' असे नाव सुचवले गेले.
हबा यांनी आता हणमंत शिंदे असा आयडी घेतला आहे. त्यावरून मी त्यांना "तुम्ही 'मर-हबा' केलेले दिसते" असे म्हणालो. पांचटपणाची खोड.....! पण या विधानावर ते फार गंभीर झाले व त्यांनी माझ्याकडे रोखून पहायला सुरूवात केली. तेव्हा मी गळपटलो (हो! आपण भितो बुवा. नाहीतर 'बेडर' असा आयडी नसता का घेतला?) पण
लागलीच
'तू मला एवढे सिरिअसली नको घेऊ,
पांचटपणात माझ्यापुढे गळतील माणसे

या माणसांएवढा मी निष्ठावान मित्र नाही
सुपाएवढ्या काळजाची साधीभोळी माणसे'

अशी एक गझल तयार करून मनातल्या मनात त्यांना अर्पण केली.

बोलण्यात सहज महाभारताचा विषय निघाला असताना (निघू नये का?) मी श्रेयसला (जुना राकु) एकलव्याबद्दलची लोककथा (म्हणजे खरीच असणार) सांगितली. फिजी बेटावरील हुंदडउदंड या आदिवासी जमातीत ही लोककथा प्रचलित आहे. (तेव्हा सर्व खंड जोडलेलेच होते.) एकलव्याला शब्दवेधी बाण मारायची कला पूनमनेच शिकवली. आवाज ऐकूनच बाण सोडायचा. त्यावर त्याने 'हो बरोबर आहे. अ‍ॅक्च्युअली, तिने फक्त एकलव्यालाच शिकवली होती, पण ती सांगत असताना आख्या जमातीला शिकायला मिळाले' अशी पुस्ती जोडली. श्रेयसचा हुंदडउदंडदांडगा अभ्यास आहे.
गुरूमैया अश्विनीला मी अपरंपार पिडल्यामुळे त्या रात्री माझ्या स्वप्नात चारतोंडी रावण (बैल व मांजरासकट) आला. त्याच्या एका हातात मासोळी होती, दुसर्‍या हातात उर्मिला (मातोंडकरांची) होती. 'अरे ह्यांना कुठे घेऊन चालला आहेस?' असे मी कळवळून विचारले. तेव्हा अचानक मला त्याच्या एका हातात उर्मिला तर दुसर्‍या हातात मासोळी दिसली. त्याने 'हॉहॉहॉ! मी त्यांना जागूकडे घेऊन चाललो आहे' असे उत्तर दिले. असे भयस्वप्न पडले. सारांश, अश्विनीला पिडू नये.
शैलजा, आरती यांच्याशी फार बोलणे होऊ शकले नाही. त्या सुदैवी ठरल्या. (तरी शैलजाने मला वेगळीच ओळख देऊन माझ्या तोंडचे पाणी पळवले Happy ). अजय डिसेंबरात परत गटगसाठी येणार आहेत असे ऐकले. तेव्हा परत भेटूच Proud

>>तरी शैलजाने मला वेगळीच ओळख देऊन >> Proud बचके रहना रे गोट्या!
डूआय, संक्षिप्त पण चांगलं लिहिलं आहेस.
बरीच चर्चा मिसली म्हणायची मी.

अरभाट,! Lol
पांढर्‍या टी शर्टात आलेल्या गोर्‍या टण्याला मी 'ससा' म्हटले तर साजिर्‍याने लगेच, 'पिंजारलेल्या मिशांचा' अशी पुस्ती जोडली. गोर्‍या मुलांना लगेच लग्नाचे विचारुन घ्यावे या माबोशिष्टाचारानुसार मी "एक वर्षासाठी हंगेरीला जातोयस, तर तुझ्या लग्नाचे काय?" विचारताच तो खरंच सशासारखा मल्टिस्पाईसभोवतीच्या झुडूपात पसार झाला. माझी माणसांची पारख बरोब्बर आहे. Proud

हा काल रैनाने पुपुवर टाकलेला वृ.
रैना | 15 November, 2010 - 00:49
अजूनही वृत्तांत नाय? शोभतं का हे तुम्हाला राडा (जी)?
हा नंतर वृत्तांतावर डकवा कोणतरी

माझ्यातर्फे हा धावता वृत्तांत
- वेमा फार्फार तरूण दिसतात. त्यांना एवढी मोठी मुलगी आहे हे ऐकुन बसलेला धक्का अजून ओसरतोय. ते सगळ्यांशीच 'सुहास्य वदने आणि सौजन्यपूर्वक' बोलत होते ते पाहून हेच ते सुप्र वेमा ही खात्री पटली.
- सर्वात फोटोजेनिक चेहरा ऑफ द जीटीजी- जीएस. जीएस आख्ख्या जीटीजीत तिनदा वगैरे आश्चर्यबधिर (नवीन शब्द आहे. जाणकारांना विचारा !) झाला. एकदा नीरजा त्याला मी घाबरते असे म्हणल्यावर, दुसर्यांदा 'मी रैना आहे' असे सांगीतल्यावर आणि तिसर्‍यांदा स्वाती त्याला ' हे म्हातारं झाल्याचं लक्षण आहे' हे म्हणल्यावर. शेवटच्या धक्क्यानंतर भारावून त्याने स्वातीला' बेस्ट डेब्यु ऑफ द यिअर' अशी ट्रॉफी बहाल केली.
- स्वाती अशक्य खतरनाक डायलॉक टाकते. तिने बर्‍याच लोकांच्या डोळ्यासमोर तारे चमकवले. (होहो हीच ती सुप्रसिद्ध नवर्‍याच्या हातात हात घालणारी स्वाती. पण बिचारी एकटीच आली होती त्यामुळे आशूने असले नवर्‍यांबरोबरचे जीटीजी इकडे नाही ना होत अशी खेदयुक्त खंत व्यक्त केली)
- अरभाटाने कुजकेपणा आणि पुवडु डायलॉक बद्दल माझ्या हातचा मार खाल्ला. मल्टीस्पाईसहून काव्हा का कशाततरी जायला मी सभ्यपणे नको वगैरे म्हणाले तर ' तुला आणि नीरजाला घरी काय काम असते नाहीतरी' असले आमच्याबद्दल अनुद्गार काढले. हे कमी की काय हा डायलॉक संपून चिनूक्स त्यातल्या व्याकरणाच्या चुका काढेस्तोवरसुद्धा उसंत न देता, श्रेयस (नवीन आयडी) ने लग्गेच 'ओह तू रैना का" असे विचारले.
- आशूने तेजस्वी वनलायनर्सच्या ओजस्वी परंपरेत खंड न पाडता, टण्याला हंगेरीला चाल्लास तर लग्नाचे काय? असे विचारून एका फटक्यात गारद केले. त्यानंतर टण्या जो गायब झाला तो अजून दृष्टीस पडलेला नाही कोणाच्या.
- चिनूक्सने पूर्णकाळ सुहास्य वदने उभे राहून, धावाधाव करुन लग्नाच्या रिसेप्शनची रंगीत तालीम केली.
- केश्विनीचे माशांवर बौद्धिक घेण्यात आले.
- नीर्जा कंसात तै यांचे आजवर मायबोलीवर कोणाशी वाद झाले नाहीत हा विषय निघून तिने पूर्ण अकरा वर्षांचा आढावा घेतला. बाकी तिची बॅटिंग चौफेर सुरु होती. तिने भावनेच्या भरात टण्याला गाळले वादांच्या यादीतून, यावर टण्याने नाही नाही, तुझे आणि माझे एकदा वाजले होते असे पटवून द्यायचा निष्फळ प्रयत्न केला. आम्ही पटापट, तत्परतेने खुर्च्या टाकल्या, अर्भाटाने तिकीटविक्री चालू केली तत्परतेने, साजिर्‍याने होहो मलाही आठवतेय अशी एक उगाचच काडीही टाकली, पण हाय रे दैवा, ते भांडलेच नाहीत.
- पूनमवैनी आल्या, त्यांनी नेहमीप्रमाणे दणाणून सोडले. मिल्यादांना 'अरे येड्या" बाबत विचारायचे राहिले असे आम्ही नंतर फार्फार हळहळलो. वैंनीचा फॅक्ल काढायचे ठरले आहे
-- आरतीने मायबोली असे भरतकाम (की कशीदा, की क्रोशा, की क्रॉसस्टिच, की स्मॉकिंग) करुन आणले होते. ते खूप मस्त होते. सर्वात कमी टारगट तीच होती आख्ख्या गँग मध्ये.
- प्रॉस्पेरिटी काका, वळसंगीकर, अग्निपंख आणि हबाही खूप शांत होते. शैलजा, रुमा, शंतनु, मुक्ता, श्री पावसकर यांच्याशी खूप बोलणे होऊ शकले नाही, पण ओळख झाली.
- मयुरेश आणि देवाही फारच शांत होते एकुणात. का ते कळले नाही.
-चि. मिहीका/ नचिकेत/ निहिरा यांनी आपापल्या आईबाबांना जराही त्रास दिला नाही. मस्त खेळत होते.
- प्राची आणि तिचा अतिप्रसिद्ध मोबाईल यांचे छायाचित्र घेण्यात आले. ती ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची वस्तु सर्वांनी डोळे भरून पाहिली आणि उपस्थितांने तिनदा टाळ्या वाजवल्या.
- साजिरा भावविव्हल अवस्थेत होता. त्याचा फोन आणि तो आन्सर करणार्‍या विविध स्त्रिया हा इंट्रेस्टिंग विषय निघाला पण त्याने जाम ताकास तूर लागू दिला नाही.
- कोणी राहिले असेल तर माबुदोस. कळावे. धन्यवाद. बाकी बोलून आणि हसून अक्षरश: तोंड दुखले. (इतरांचे डोके किंवा कान दुखले की काय ते ते यो जा सांगतीलच.)
- डु आय औपचारिक वृ टाक रे.
- काही बातम्या (अफवा) फारच आश्वर्यमुग्ध करणार्‍या होता. सिंडी फार शांत आहे (प्रत्यक्ष भेटींमध्ये), झक्की फार गोड आहेत, अमक्यांचे मन सुंदर आहे, वगैरे..
Proud Light 1

आशूडी | 15 November, 2010 - 09:49 नवीन
मस्त वृ गं रैना! बीती ना बितायी रैना, अल्तबक्ष, जीएसच्या म्हातारपणाचे लक्षण, साजिर्‍याचा फोन, वैनीचा फॅक्ल, टण्याचे लग्न, अरभाटाची नवी झापडधारी नोकरी, नि:स्वार्थी मनाचा चिनूक्स, प्राची- शंतनू आणि ढगफुटी, शैलजाचा 'आयटीगर्ल' हा संतूर आयडी, कॉफी चवीने पिणारी चवे, वृच्या जबाबदारीने गपचुप नीट ऐकत बसलेला डुआय .. अहाहाच! Rofl

मी बाइकवाल्याला समज द्यायचा प्रयत्न केला हे मला माहित नव्हते म्हणजे एकतर मी झोपेत गाडी चालवत होते किंवा तू स्वप्नात होतास. मी, केश्वी आणि तू अजून जिवंत आहोत त्याअर्थी मी झोपेत नक्की गाडी चालवत नव्हते. तस्मात किती फेकशील!!

काफ्का / काफका त गेलो.<< अरे तो काफ्का कबरीत उलटापालटा झाला असेल...
कहावा असे नाव होते. सिद्ध झाले तू झोपेत होतास ते.. Proud

मस्त वृत्तांत...
धमाल गटग झाला... नेहमिप्रमाणेच मस्त मज्जा आली.. काही जुने आणी काही नविन मित्र भेटले.. त्यांच्याशी खुप गप्पा मारल्या... संयोजकांचे आभार...

अरे वा, डु आयने खरंच सगळीकडे लक्ष ठेवलेले दिसते, डीटेल वृ आहे की Happy
आशू, बरे केलेस रैनाचाही वृ पेस्ट केलास ते..
अर्भाट! Proud

सगळे वृ मस्त.
टिप ऑफ द गटग- श्रेयस, देवा अशा मितभाषी लोकांपासून सावधान रहावे. ते गप्प असतात असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं ते Proud Light 1

ते शेळ्यांचे कळपच्या कळप शिस्तीत घाटातून चाललेले पाहून (ते ही उलट दिशेने) नीरजा किती हसलीय ! Happy

अरे हो, मिहिका एकदम गोड आहे. ती आणि नचिकेत खूप खेळले. 'आता दर वेळी परिक्षेत असेच मस्त मार्क मिळवणार ना?' असं मी विचारल्यावर अगदी 'no big deal' style मध्ये तिने 'होऽऽऽ' म्हटलं! Happy
निहिराने नेहेमीप्रमाणे नचिकेताला दमवलं Proud

प्राची, तुझी मिहिका खूप आवडली मला Happy लगेच चिकटली, गप्पा मारल्या. खूप गोड आहे. तिला गनीम म्हणत असल्याबद्दल तुझा निषेध! Proud
निहिरा पनीर मागून घेण्यासाठी फक्त बोलली. मया, तुझ्यावर गेलीये! Proud

आता अचानक ट्रॅफिक स्लो घाटात आणि माझी गाडी जुनी यातला जो काय वैताग होता (ड्रायव्हिंग करणार्‍यांना नक्की कळेल..) त्याचा पचकाच झाला ना घाटातल्या दोन लेन उलट्या बाजूने येणार्‍या शेळ्यांमेंढ्याच्या कळपाने काबिज केलेल्या बघून... वेड लागलं हसून हसून...

* डुआया, मी एकाच फोनवर एकदाच आणि एकच मिनिट वैतागलो होतो.
* मला जाहीरपणे 'बाळू जोशी' म्हणणार्‍यांचा जाहीर निषेध. Sad
* सर्वप्रथम येणारे पाच मायबोलीकर- चिनूक्स, मयूरेश, रुमा, अग्निपंख, साजिरा. (चूक असल्यास दुरुस्त करा).
* चिनूक्सने अजयना पुलंची काही दुर्मिळ छायाचित्रे आणि सुनिताबाईंचे लिखाण असलेले कॅलेंडर भेट दिले. ते अत्यंत आणि महान सुंदर आहे. ते मायबोलीवर विकायला ठेवता येईल का, याचीही चर्चा झाली. (पण ते नंतर शेवटी टण्याला आवर्जून का दाखवण्यात आले, ते काही कळले नाही.)
* आशूडीने मागल्याच जीटीजीला अजयकडून अभय मागून घेतल्यामुळे की काय, ती आल्यावर अजयच्याच शेजारी बसली. तेव्हा अजयने 'बापरे. आता काय काय ऐकायला लागेल देव जाणे!' असं काही पुटपुटल्यासारखे वाटले.
* अजयने पुरुषांचाही संयुक्तासारखा ग्रुप करता येईल, असं सांगितलं. त्यावर सर्वांनी 'हे आवश्यक आहे, कारण पुरुषांकडे अधिक जेन्युईन प्रोब्लेम्स, अधिक इंटरेस्टिंग गॉसिप आणि अधिक (इतरांना वाटण्याजोगं) ज्ञान असतं.' हा ठराव संयुक्तांच्या विरोधी आवाजांना आणि कुत्सित नजरांना न जुमानता आवाजी मतदानाने पास केला. (पण आधीच खरंतर 'पृथ्वीराज.. हमारा राज.. ऊर्फ संयुक्ताक' ची घोषणा झाली होती, ते निराळे.)
* स्वातीला कुणीतरी 'तुझे नावही आणि आयडीही 'स्वाती'च?' असं जेव्हा विचारलं, तेव्हा रुसल्यासारखा चेहेरा करून ती जे 'बघ नॉ!' म्हणाली, ते अफाट होतं.
* संयुक्तांच्या शेजारी बसल्यामुळे माझ्यावर अनेकांनी अनेक निशाणे साधले. पण तिथे मी आधीच बसलो होतो, आणि अख्खी संयुक्ता नंतर तिथे येऊन बसली, हे कुणीच लक्षात घेतले नाही. Uhoh इतकेच नाही, तर संयुक्ता वाढल्यावर उदार मनाने मी एक खुर्ची पलीकडे सरकलो. Proud त्या 'हबा' ने तर चक्क 'संयुक्ताची मेंबर्शिप घ्यायचा विचार आहे का?'- सदृश प्रश्न विचारला. 'पृथ्वीराज' ची बाजू लढवायला अरभाट फक्त माझ्या मदतीला आला. 'पुरुषांकडे बायकांपेक्षा जास्त गॉसिप असतं' यासारखे शेकडो मुद्दे सप्रमाण पटवून द्यायला खरंतर माझ्या आणि अरभाटाच्या संयुक्तांशेजारच्या जागांचा चांगलाच उपयोग होत होता. पण लक्षात कोण घेतो? Sad
* 'ती रैना वेगळी होती. ही वेगळी. ही संपादक झाल्यानंतरची रैना.' असं मी 'वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है' या चालीत अर्भाटला म्हटलं, तेव्हा तो म्हणाला, 'अच्छा अच्छा. 'बीती हुई' रैना आहे क्काय?!' त्यावर मी म्हणालो, 'नाही नाही. बिती ना बिताई..!'
* अर्धेअधिक जीटीजी पार पाडल्यानंतर रैना आणि जीएस यांची एकमेकांशी ओळख झाली. तेव्हा दोघांचेही चेहेरे फोटोजेनिक झाले होते. जीएसचा असाच फोटोजेनिक चेहेरा नंतर 'काव्हा'मध्ये स्वाती त्याला 'हे वय वाढल्याचं लक्षण आहे.' असं म्हणाली, तेव्हा झाला होता. तो बहुधा तेव्हा 'आमच्या काळी... गेली ती मज्जा..' वगैरे मोडात होता.
* फुलराईस-दाल-मारके न येता भात वेगळ्या ताटलीत आणि दाल वेगळ्या मायक्रोबादलीमध्ये आली, तेव्हा योगायोगाने 'पौर्णिमा फॅक्ल' चा विषय चालू होता. हा फॅक्ल काय कामे करणार असे भविष्यातले प्रश्न टाळण्यासाठी जीएस ती बादली उंचावून माझ्याकडे तसेच संयुक्तांकडे पास करत म्हणाला, 'हा फॅक्ल गरीबांना अन्नवाटप करणार!'
* अरभाट पुपुवर टाकत असलेले फोटो अत्यंत वाईट असतात, असं रैना म्हणाल्यावर 'तुमच्याकडे तिथे टाकण्यासारखे चिमां, सध, मिसो वगैरेंच्या पलीकडे काय फारसे नसते त्याला आम्ही तरी काय करू?' असे आम्ही (बरेच. एकाचवेळी.) म्हणालो. शिवाय अरभाट म्हणाला, 'ठीक आहे. मी तुम्हाला जॉन अब्राहम देतो. तुम्ही काय देता बोला?'
* उरलेले अर्धे जीटीजी उरलेल्या अर्ध्या मंडळींसह ३ ते ५ असे 'काव्हा' मध्ये झाले. इथे वरच्यापैकी जीएस, अर्भाट, आशूडी, साजिरा, नीरजा, स्वाती, देवा, रैना, डुआय, चिनूक्स, मयूरेश इतके लोक होते.
* इथले अल्ताबक्ष आणि कमालुद्दीन महान होते. त्यांच्या डोक्याला विशिष्ठ पद्धतीने बांधलेल्या रुमालाला बघून 'अरे जरा ओरडून सांगा. झापडे बांधलीयेत त्यांनी!' असं मी म्हणालो. यावर आशूडी म्हणाली, 'अरे कान उघडे असल्याने एकवेळ ऐकू जाईलही पन डोक्यालाच झापडे असल्याने डोक्यात शिरणार नाही!' मी झक्कींच्या डोक्याला असा रुमाल काय अफाट दिसेल अशी अद्भुतरम्य कल्पना आशूच्या कानात सांगितली तेव्हा ती पाण्याचा फुगा फुटल्यागत भस्सकन हसत सुटली. (झक्की, लाईटली घ्या हां, प्लीज. Happy ) यावर इतर जीटीजीकरांच्या 'यांनी यांचे वेगळेच राज्य स्थापन केलेय' अशा कुत्सित कॉमेंट्स आम्ही सहन केल्या. मग अरभाटालाही त्याच्या डोक्यावरच्या अर्धा मिलीमीटर वाढलेल्या केसांवर हा रुमाल बांधण्याचीही कल्पना आली, आणि त्याचं जमालुद्दीन असं नामकरण झालं. पुपुवर 'गोटा नव्हे - उद्दीन' असं नवीन नाव घेऊन त्याने त्याला मान्यताही दिली.
* 'मल्टिस्पाईस ते काव्हा' अशा अ‍ॅडव्हेंचर-ड्राईव्हवर मी आशूच्या अ‍ॅक्टिव्हावर येणार हे कळल्यावर बर्‍याच जणांनी बर्‍याच प्रकारच्या नजरांनी माझ्याकडे पाहिले. त्यांत बहुधा करूणरस ओतप्रोत भरला असावा.
* 'तू एऽऽऽक वर्षभर हंगेरीला जाणार?' असं विचारल्यावर टण्या 'हो' म्हणाला. तशी चालू असलेली गाडी बंद करून, त्याच्या जवळ जाऊन कमरेवर हात ठेवत जाब विचारल्यागत आशू म्हणाली, 'मग तुझ्या लग्नाचं काय?' टण्या 'आयला, हे तर आईने पण नव्हतं विचारलं!' असं डोक्याला किक बसून आणि गाडीला किक मारून जो निघाला, तो बहुधा थेट हंगेरीतच जायला.
* 'व्यक्ती आणि प्रतिमा' या सदरांतर्गत शैलजेचंही नाव घातलं पायजे. 'आता तू पुण्यातच राहणार?' असं मी विचारल्यावर 'का? काही कमी वाटतंय का माझ्यात? मी पुण्यात राहण्याच्या दृष्टीने?' असा स्वीप मारला.
* अनंत पावसकर यांनी सर्वांना 'आठवणीतील गाणी' हे ई-बुक भेट दिले. हा एकदम सही प्रयोग आहे. कंटेंटपण सही आहे. धन्यवाद अनंत. Happy
* 'संयुक्ताला काही प्रश्न आहेत का? कसे सोडवता येतील?' असं मास्तरांनी गांभीर्याने विचारल्यावर पूनम पुरुष सदस्यांकडे तुक टाकत म्हणाली, 'यांच्या नसत्या चवकशा आणि तुक सोडले तर सारे काही ठीक चालले आहे. आम्ही त्यांच्याकडे लक्षच देत नाही.' नंतर संयुक्तावरही थोडी गंभीर चर्चा होऊन सारे काही सुरळित चालले असल्याचा निष्कर्ष काढला गेला. (ते बघून 'संयुक्ताक'चा इरादा अधिकच पक्का झाला).
* 'मी अजून तुझ्याशी भांडलोच नाही' असं टण्या नीरजेला म्हणाला, तेव्हा 'तात्विक भांडणांचा' विषय निघाला. मग टण्याने 'माझ्या बोलण्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा. पण मी म्हटले ते चूकीचे नाही!' हे संतवचन पुन्हा एकदा उधृत केले.
* रैना एकेकाला खोपच्यात घेऊन काय चर्चा करत होती ते एक देवालाच ठाऊक. खरंतर देवाला देखील कळलं नसेल. 'देवा'शी झालेल्या चर्चेला आम्ही 'ग्रेसफुल गप्पा' असं नाव दिलं. (मला मात्र फार पुर्वी वाचलेल्या एका लेखाचं 'देअर इस स्पेस, पेस; बट नो ग्रेस!' असं शीर्षक का कोण जाणे आठवलं. :फिदी:)
* प्रत्येकाच्या प्रत्येक विनोदाला मास्तरांनी त्यांचे तेच फेमस विनिंग स्माईल देऊन साजरे केले. धन्यवाद अजय! Happy
***

(अजून बरेच बाकी असेल, पण आता कंटाळा आला. आठवले आणि वाटले, तर लिहिन. किंवा इतरांनी लिहा. कृपया कुणीही दिवे घेऊ नयेत. 'माझे नाव नको' असं कुणीही म्हणल्यास त्याचा उल्लेख लगेच काढण्यात येईल. Proud कृपया. कळावे. धन्यवाद. नमस्कार. Happy )

साजिर्‍या, भारी क्षणचित्रे! बर्‍याच गोष्टी क्लिअर झाल्या आता.
पण 'संयुक्ताक' म्हणजे ताकाला (?) जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार वाटतो. Wink

आशू - टण्या गोरा आहे? नाही म्हणजे परवा गोरा दिसत होता खरा. Wink

साजिर्‍या पूर्णवेळ तिथेच बसला होता हे मात्र एकदम खरे. सगळ्या बायका एकसाथ बोलत असल्यामुळे नक्की काय बोलत होत्या हे त्याला कळले की नाही कोण जाणे. Wink

नीरजाने तो पुलं कॅलेंडरवरनं टण्याजोक टाकला तो म हा न होता.

जीएसने वातानुकुलनाच्या नावाखाली हाकलले मल्टीस्पाईसमधून आणि स्वत: गायब.

टण्या आणि अरभाट (एकमेकांकडे प्रेमभरे पहात) एका ताटातून जेवत होते तो कोडॅक मोमेंट होता खरंच. कोणाकडे फोटो आहे का?

बिचार्‍या वेबमास्तरांना 'एकटेच आलात का?' असा प्रश्न किमान १० लोकांने विचारला. त्यांनी प्रत्येकाला शांतपणे स्पष्टीकरण दिले. Proud

टण्या आणि अरभाट एका ताटातून जेवत होते तो कोडॅक मोमेंट होता खरंच. >>> अरे हो की ! त्यावरपण काहीतरी जोक झाला होता.

अरे वा, मस्त, मी मिसल , मल्टीस्पाईस म्हणजे माझ्या घराच्या मागेच होत

आपण जिथे लिहीतो, जिथे आपल्याला काही मित्र मिळाले व महत्वाचे म्हणजे हजारो मराठी माणसांना एकत्र आणणारी माबो सुरू करणार्‍या व्यक्तिला भेटण्याचा योग अगदी सहज येतो आहे तर तो गमवता कामा नये असा विचार करून मी या गटग ला गेलो. अजयजींना भेटून आनंद वाटला. इतरांना भेटूनही आनंद वाटला.

आरभाट मला घाबरला असेल असे वाटत नाही. बाकी त्याने लिहीलेल्या, ज्याना तो गझल म्हणतो त्या

'तू मला एवढे सिरिअसली नको घेऊ,
पांचटपणात माझ्यापुढे गळतील माणसे

या माणसांएवढा मी निष्ठावान मित्र नाही
सुपाएवढ्या काळजाची साधीभोळी माणसे'

या ओळी आवडल्या. प्रामाणिकपणे लिहील्या आहेत.

काही लोकांशी बोलणं झालं काहिंशी नाही. गझलकार मिल्याजी भेटले. अश्वीनी के यानी मला हाक मारून 'केवडुसा आहेस... तुला कोण करेल आहो जाहो?' असा सत्कार केला. प्रोस्पॅरीटी काकांशी अर्थकारणावर छान चर्चा झाली. आर्मीत असलेल्या शंतनूला माझ्या मनातले आर्मी विषयीचे, जम्मू कश्मीर आणि चीन विषयीचे सारे प्रश्न विचारून घेतले. त्यानेही मोकळेपणाने समाधानकारक उत्तरे दिली. मयुरेशचा काही कारणांनी माझ्या व्यवसायाशी संबंध असल्याने त्या विषयीही बरीच चर्चा झाली. अग्निपंखचा एकट्याचा उपवास होता, त्याला कंपनी म्हणून मीही माझा उपवास असल्याचे सांगितले... मसाले पापड खात्-खात.

शेवटी कुणीतरी "हबा तुमच्या कवितांविषयी वाचले होते कुलंगच्या लेखात ऐकवा की आता" असे म्हणाले पण नंतर मी लगेच ऐकवीन की काय या भितीने "का त्यासाठी ट्रेकलाच जावे लागते? तसं करू.... हा हा हा..." म्हणत मला शांत केला. मला लवकर निघायचे असल्याने. लगेच बाहेर पडलो.

असं कसं पिवळं दिसत होतं ना? आमरस घातला होता बेस म्हणून बहुतेक कस्टर्ड पावडर ऐवजी. पिवळी फळंच घातली होती, एखाद दुसरी कलिंगडाची फोड आणि एखादी चिकूची, त्यामुळे एकदम बोलभर कांदाबटाटाटॉमेटो रस्सा ठेवलाय असंच वाटत होतं.

Pages