मायबोलीवरचे आधार गट

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

मायबोलीकडे सगळेच गरज पडली तर हक्काने मदत मागतात. आणि मायबोलीकरही तितक्याच तत्परतेने मदत करतात. पण कितीही म्हटले तरी सगळ्याच समस्या नेमक्या शब्दात मांडता येत नाही आणि मांडल्या तरी समदु:खी असल्याशिवाय त्या सगळ्याना समजतीलच असे नाही. अशा मायबोलीकरांना एकमेकांचा आधार घेता यावा/देता यावा म्हणून काही आधारगट (Support Groups) सुरु केले आहेत. हळूहळु इतर विषयांवरही असे आधारगट सुरु करू.

मायबोलीकर अश्विनीमामी यांनी हि कल्पना सुचवल्याबद्दल त्यांचे आभार.

कृपया अशा ग्रूपमधे टाईमपास टाळा अशी विनंती. मायबोलीवर इतरत्र त्यासाठी भरपूर जागा आहेत.

सध्या केलेले आधारगट

एकटे पालक

कर्करोगाशी सामना

मधुमेहाबरोबरचं आयुष्य

इतर काही आधारगट हवे असतील तर खाली जरूर प्रतिक्रिया लिहून कळवा.

प्रकार: 

कल्पना खरेच चान्गली आहे! Happy
या ग्रुप मधे सामिल झाल्याखेरीज ते दिसत नाहीत, काहीसे "खाजगी" ठेवले आहे ते देखिल ठीक आहे
मायबोलीवरील "नविन लेखन" बघताना मात्र हे धागे दिसत आहेत Happy

मधुमेहावर बरेच प्रतिसाद येतिल असे वाटते! Happy

एखादा धागा "व्यसनमुक्ती - व्यसनी व्यक्ती, नातलग व समाज" अशा काहीशा अर्थाचा सुरू केला तर बरे होईल Happy माझ्या माहितीप्रमाणे इथे व्यसनमुक्तीबाबत काम केलेले/करणारे सभासद आहेत, तसेच काहीजणान्नी प्रत्यक्ष व्यसनमुक्तिचा अनुभव घेतला असेल तर ते सहभागी होऊ शकतील

आधारगट- ही छानच कल्पना आहे. यातून अजूनही बरेच काही चांगले साध्य होईल. आणि मायबोलीकर ज्या तर्‍हेने एकमेकांना मदत करतात, ते बघता मिळणारा आधार नुसत्या शब्दांपर्यंत सीमित न राहता कृतीपर्यंतही जाईल असे वाटतेय.

अ‍ॅडमिन, यासाठी काही मदत हवी असल्यास करायला तयार आहे.

हो हो, कल्पना फारच सुरेख आहे. Happy
खूप शुभेच्छा आधारगटांना..

व्वा! खुपच सुंदर कल्पना! मायबोलीचे एकुण स्वरूप बघता ही कल्पना नक्कीच यशस्वी होईल.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

पुण्याजवळ ते परीहार केन्द्र आहे ना cancer patients साठी, त्याची माहिती मिळेल का? आपण पोस्ट करू.

मानसिक आधार देणे व माहिती शेअर करणेसुद्धा खूप आहे. आपण मराठी बाण्याचे म्हणजे कर्तबगार हुशार तर आहोतच, कोणी थोडीशी प्रेमळ साहानुभूती (empathy) दिली तर आपले ह्ळवे कोपरे सावरतील.

अश्विनीमामी अशा कल्पना॑च स्वागतच आहे..
पण यासाठी समदु:खीच असाव॑ अस॑ काही नाही ना!!

नाही हो. मी तर रोजचा दिवस आनंदात घालवावा अश्या व्रुत्तिचीच आहे. उत्तम आरोग्य उत्तम मानसिकता असेल तर जीवन फार सुखाचे असते. ते तसे व्हावे म्हनून ही धडपड.

अश्विनि ताइ
तुम्चे विचार मला आवड्ले. मला पोसिटिव विचार करणारे लोक आवड्तात