राजे माफ कराल, पण तुम्हाला भेटायच राहूनच गेल... अहो तिथ शिवभक्तीचा माज दाखवायच्या नादात असलेल्या त्या गर्दीत, तुम्ही कुठ दिसलेच नाही.
__________________
नाही जमल आम्हाला...
आमची शिवभक्ती नाही गाठू शकली त्या सीमा, ज्या तानाजी, बाजीने, स्वतःच्या रक्ताने तयार केलत्या, स्वतःच्या रक्ताने इतिहास लिहिला होता आम्ही फक्त तो पुस्तकात वाचतो
“डोक्यावर चंद्रकोर लावून राजे, कुणी शिवभक्त होत असत का?”
________________________
राजे तुमचा एक वीर हत्तीला हरवत होता, एक मावळा हजार यमनांना पुरून उरत होता, इथं गर्जना करून घसा आणि नाचून नाचून अंग दुखायला लागलंय.
होता बाहुबली विराट जगती राजा शिवाजी असा,
ज्याने गाजविला विशाल भगवा राष्ट्रात चोहीकडे....
सीमापार कुठे टपून बसले होते फ़िरंगी जरी,
कोणाचीच नसे बिशाद बघण्या एकत्र राज्याकडे....
जातीभेद मुळी पसंत नव्हता कोणासही थोडका,
गावोगाव सुखी तमाम जनता नांदायची चांगली..
मो्ठी आक्रमणे करुन जितले साम्राज्य जे जे नवे,
किल्लेकोट तळी नवीन सगळी त्यांनी तिथे बांधली.....
कोळी चर्मकरी सुतार कुणबी युद्धावरी धावले,
न्हावी ब्राम्हण आणखी मरहटे सारे उभे ठाकले......
झाले कैक लढे जिथे यवनही हारविला फ़ारदा,
योद्धे वीर असे तुटून पडता शत्रू रडू लागले.....
तानाजी तगडा मुरार खपला शेलार बाजी प्रभू ,
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला याबाबत फारसे कुठे स्पष्टपणे वाचायला मिळत नाही. इंग्रज, पोर्तुगीज आणि भारतीय अशा तीन्ही इतिहासकारानी वेगळीवेगळी कारणे दिली आहेत.
१. विषमज्वर- टायफाइड
२. आतड्याचा अॅन्थ्रॅक्स.. यात आतड्याला इन्फेक्शन होऊन रक्त्युक्त उलटी जुलाब होतात.
३. महाराजांवर त्यांच्याच एका पत्नीने विषप्रयोग केला.
महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?