माणसे

पुन्हा लागली फाटकी माणसे पेटाया

Submitted by दत्तात्रय साळुंके on 8 June, 2023 - 03:00

पुन्हा लागली फाटकी माणसे पेटाया

पुन्हा लागली फाटकी माणसे पेटाया
वाजू लागले पडघम निवडणूका आल्या

पुन्हा जयघोष झाला लोकशाहीचा
आला भाव मताला जरा कम‌ऊया

ऋतू पेटवाया असे चांगला हा
तापला तवा भाकरी भाजूया

जळतील अश्राप कुठे आपले ते
ठेकेदार आपणच वाटणी करुया

कशाला भिती नीती अनितिची
चांगभलं मेंढरांच, कळप राखूया

पक्षनिष्ठा,विचारधारा बाजूला ठेवू
संपत्ती साठी सत्ता धोरण राब‌ऊया

सारी तिकिटं देऊनिया घरातच
पिढ्यानपिढ्या अघोषीत सम्राट होऊया

कार्यकर्ता फुटकळ, बाजारबुणगा
त्यास सतरंजी उचलाया ठेवूया

शब्दखुणा: 

माणसे

Submitted by कुमार जावडेकर on 18 January, 2021 - 13:33

येत होती, जात होती माणसे
गीत अपुले गात होती माणसे!

साथ होती माणसांच्या माणसे
माणसांचे हात होती माणसे...

आज झाली जीवनाची सोबती
काल जी अज्ञात होती माणसे

माणसांचे पीक येथे काढती
येथुनी निर्यात होती माणसे!

हसत त्यांनी सहज अश्रू लपवले...
केवढी निष्णात होती माणसे!

भासली होती विजेचा लोळ ती -
पेटलेली सात होती माणसे!

का घरे मी दुश्मनांची जाळली?
त्या घरांच्या आत होती माणसे....

- कुमार जावडेकर

साधीशीच माणसं ..

Submitted by तुमचा अभिषेक on 2 December, 2013 - 10:54

सकाळी नेहमीपेक्षा वीसेक मिनिटे उशीराच घराबाहेर पडलो. ऑफिसला जायचे नसून ऑफिसच्याच कामासाठी इतरत्र जायचे होते. पुढची ट्रेन पकडायला हरकत नव्हती म्हणून बिछान्यातच पंधरा-वीस मिनिटे जास्तीचा मुक्काम ठोकला. तयारी मात्र नेहमीच्याच वेगाने झरझर आटोपून, मोबाईलमध्ये ट्रेनचा टाईम आणि आता झालेली वेळ, दोन्ही चेक करून रमतगमत चाललो तरी वेळेच्या आधी स्टेशनवर पोहोचेन अश्या हिशोबाने निघालो. पावले मात्र सवयीनेच झपझप पडू लागली, नव्हे किंचित जास्तच उत्साहाने.

विषय: 

ही अशी माणसे

Submitted by gajanan mule on 13 August, 2011 - 16:03

ही अशी माणसे

चेहरा नव्हता तयांना अन् नव्हते नावही
ना कोणता धर्म होता,पंथ, नव्हते गावही
माणसांची जात त्याच माणसांनी होती राखली
दुर्बलांची पापे सारी त्यानीच होती झाकली
जी माझ्याइतकीच जवळची वाटली होती मला
ही अशी माणसे वाटेवर भेटली होती मला

गर्दीत होते मिसळले पण त्याहुनी ते वेगळे
का होते वेगळे ते त्यांचेच त्यांना ना कळे
विलसणारे हास्य होते, गीतात होती वेदना
अंतरांचे प्रांत जिंकू हीच होती कामना
जन त्यांच्या प्राक्तनाची कोठली होती मला
ही अशी माणसे वाटेवर भेटली होती मला

ते न होते वीर कोणी, वा न होते षंढही
सांप्रताच्या या युगाशी त्यांनी न केले बंडही

गुलमोहर: 

अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही (तरही )

Submitted by छाया देसाई on 28 March, 2011 - 04:39

लाऊन ओढ जीवा वळतात माणसे ही
अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही

मातीत जन्मलेली मातीत वाढलेली
कोरी तशीच ओली कळतात माणसे ही

स्वप्नाहुनी प्रियेच्या प्रीतीत प्राण असतो
निष्प्राण करत प्रीती पळतात माणसे ही

प्रीतीस निभवण्याच्या वेळा सुमंगलाशा
पण त्याच ऐनवेळी गळतात माणसे ही

माणूस माणसांचा हो मित्र आणि शत्रू
फळतात माणसेही छळतात माणसे ही

कळते गुरू स्मरोनी स्मरताच मायबापा
छाया निवांत देता जळतात माणसे ही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माणसे