गाडी

गाडी बुला रही है़

Submitted by नीलिमा क्षत्रिय on 23 August, 2021 - 05:51

संगम दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख..
गाडी बुला रही है.....
ही साधारणपणे अठरा वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. घरात मारूती 800 आल्या दिवसा पासूनच गाडी शिकण्याची अनावर इच्छा माझ्या मनात उसळ्या मारत होती. नव-याला माझा मनसुबा सांगितल्यावर , "मग चालवायची ना, त्यात काय विशेष आहे, स्कूटरला दोन चाकं, तशी ह्या गाडीला चार चाकं. बाकी काय वेगळं असतं!!"
"अरे वा, म्हटलं सोप्पच आहे अन काय मग!

विषय: 

सरकारी कार्यालयातील एक अनुभव

Submitted by मनीमोहोर on 7 May, 2017 - 14:06

गाडीच लोन फिटलं आणि मग गाडीचं एच पी कॅन्सल करुन घेण्यासाठी आर. टी. ओ. च्या कार्यालयात जावं लागणार असल्याचं कळलं. बँकेतल्या माणसाने ही " बाई, तुमचा कोणी एजंट असेल तर त्याला सांगा. तो सगळ नीट करुन देईल. " असा सल्ला दिलाच होता. मैत्रीणीने ही थोड्याच दिवसांपुर्वी आर टी ओ मध्ये जाणं आपल्याला शक्यच नाहीये असं म्हणून तिच काम एजंट मार्फतच करुन घेतल होतं . मी काय करू या म्हणून खूप गोंधळून गेले होते कारण विनाकारण त्या कार्यालयात चार चार चकरा मारायची मानसिक तयारी ही होत नव्हती आणि एजण्ट कडे ही जायच नव्हतं. चार पाच दिवस ह्यातच गेले.

कार इंश्योरन्स कुठला घ्यावा?

Submitted by योकु on 26 October, 2015 - 16:00

भरपूर इंश्योरन्स कंपन्या बाजारात आहेत. प्रत्येकाची काहीतरी खासीयत आणि प्रत्येक कंपनीची जाहीरातबाजी.
तर, कारचा (पर्सनल व्हेइकल) इंश्योरन्स पुढल्या महिन्यात रिन्यू करावयाचा आहे. खाली दिलेला धागा + अजून बाकी साईट्स चाळून झाल्या आहेत. पण तरीही कनफूजन आहेच. Wink
- कुठल्या कंपनीचा करावा? शक्यतो हॅसल फ्री अन क्लिअर गाइडन्स मिळावयाची अपेक्षा. तसेच सर्वीसबाबतीतही.
- गाडी हायपोथिकेशन वर असल्यास झिरो डेप्रिसिएशन घेणं आवश्यक असतं का? (तसाही मी तो करेन पण एक माहीती म्हणून)
- अजून काय काय अ‍ॅड-ऑन घ्यावे?
- एनसीबी बोनस, Voluntary Discount याबद्दलही माहीती

वापरलेली गाडी घेणे/विकणे

Submitted by तोषवी on 7 May, 2012 - 09:17

कार फॅक्स रिपोर्ट मध्ये अ‍ॅक्सीडेंट दाखवलेली गाडी घेणे कितपत ठिक आहे? विकताना अडचण येउ शकते का?मालकाचे म्ह्णणे आहे की बंपर बदलायला लागला होता.

मला पोलिस पकडतो तेव्हा.....भाग १

Submitted by मोहना on 9 May, 2011 - 17:23

चौकात गाडी उभी केली. लाल दिवा हिरवा व्हायची वाट पहात होते. गाडीत पोरं (म्हणजे दोनच बरं का) आणि नवरा भरलेली. हीऽऽऽ बडबड प्रत्येकाची. काय झालं कुणास ठाऊक पण डावीकडे वळण्याचा दिवा चमकत होता आणि मी गाडी नेली सरळ.

"आई.....लाल वरुन नेलीस गाडी"

"पकडलं तुला कॅमेर्‍यात."

"आता येईल तुला पत्र, भरा पैसे." नवरा आणि मुलगा दोघांच्या आवाजात आनंद मावत नव्हता. एकाच्या मनात सुडाचा आनंद, तर एकाला फुकट करमणुक असा मामला.

गुलमोहर: 

गाडी

Submitted by नीलिमा क्षत्रिय on 2 February, 2011 - 09:06

परवा एका मैत्रिणीच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला गेले होते. पहिलाच वाढदिवस असल्यामुळे खूप धूमधडाक्यात साजरा होत होता. फुगे, कागदाच्या रंगीबेरंगी झालरींनी संपूर्ण हॉल सजवला होता. सी.डी.वर
" हॅपी बर्थ डे " ची गाणी वाजत होती. चित्रविचित्र कपडे घालून छोटी छोटी मुले सर्वत्र हुंदडत होती. मुलाचे आई-वडील, आजी-आजोबा, नातेवाईक आलेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात गुंतले होते. स्टेजवर एका बाजुला आलेल्या प्रेझेंट्सचा खच पडला होता. मुलगा अजून चालतही नव्हता पण त्याच्यासाठी छोट्या तीन चाकी सायकली, विविध रंगाच्या, आकाराच्या खेळण्यातल्या गाड्या प्रेझेंट आल्या होत्या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गाडी