सांगेन मी Submitted by तुष्कीनागपुरी on 25 January, 2011 - 21:39 आधी जरा साहेन मी केव्हातरी सांगेन मी अंधार जेथे एकटा तेथे दिवा टांगेन मी प्रीतीत बाजी हारलो हारूनही जिंकेन मी जादू तुझ्या डोळ्यातली झाली नशा झिंगेन मी राखेतुनी झालो उभा आता कसा भंगेन मी तुषार जोशी, नागपूर गुलमोहर: मराठी गझलशब्दखुणा: गजलप्रेमआशाछोटी बहरशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail